वीक-END - भाग - २

थोड्याच वेळात ते एका टुमदार इमारतीसमोर येऊन उभे राहिले. तांबड्या रंगाची ती एक मजली इमारत खूपच छान दिसत होती. इमारतीच्या चहोबाजूंनी भरपूर झाडि होती, समोर मोठे आवार होत. आवारात बसण्यासाठी दगडि बाक लावले होते. आवार छान हिरवंगार होत पण खर्‍या अर्थानं आवाराची शोभा वाढवत होती ती मनमोहक अशी रंगीबेरंगी फुलांची झाडे. आवारातच एका बाजुला लहान मुलांकरता एक छोटीशी बाग होती. ईमारतीच्या मागच्या बाजुला दरी असावी पण आवारातल्या गर्द झाडांमुळे प्रवेशद्वारावर उभं राहुन नीटपणे दिसत नव्हतं. माऊंटन व्ह्यूच ते मनमोहक रुपडं पाहुन मीताचा मुड एकदम बदलून गेला. हॉटेलमध्ये तशी बरीच वर्दळ दिसत होती. मीतानं आनंदानं सागर कडे पाहिल, दोघं चालतच रिसेप्शनमध्ये गेले. तिथे त्यांचं एका पारसी बाईंनी तोंडभर हसून स्वागत केलं. मीताला प्रथमदर्शनीच ती बाई खूपच छान वाटली. पांढरा फुलाफुलांचा फ्रॉक घातलेली, जाड देहाची, गोर्‍यापान वर्णाची ती बाई पक्की पारसी वाटत होती. ती साधारण सत्तरीची असेल पण तिचा उत्साह सतराच्या मुलीला पण लाजवेल असा होता.
"मी हेलिना आणि तुम्ही मि. ऍन्ड मिसेस सागर चव्हाण?"
"हो"
"हो कारण आज इथे फक्त तुम्हीच येणार होतात."
ती गोड हसत त्यांना म्हणाली.
"इफ़ यू डोन्ट माईंन्ड, तुम्हाला दहा मिनिट बसाव लागेल तुमची रूम तयार होत आहे. आधीच्या कस्टमरला निघायला थोडासा उशीर झाला, तो पर्यंत आपण इतर फॉर्म्यालिटी पूर्ण करू?"
"हो, नक्कीच"
सागर आणि हेलिना रिसेप्शनच्या टेबलजवळ गेले. मीतानं उभ्या उभ्याच रिसेप्शनच्या त्या रूममध्ये नजर फिरवली. तिथे भींतींवर ब्रिटिश कालीन लोकांचे भारतात काढ्लेले फोटो आणि पेंटिग्ज लावले होते. मीता अगदि शांतपणे त्या तसबीरींच निरीक्षण करत होती. ती रूम एखाद्या आर्ट गॅलरीसारखी फोटोंनी सजवली होती. तेवढ्या सागार आणि हेलिनापण तिच्या जवळ आले, सागरनी फोटोकडे पहात मीताच्या खांद्यावर हात ठेवला तशी ती एक्दम दचकलीच आणि ते तिघहि हसु लागले. मग मीतानं हेलिनाला विचारल.
"हे फोटो?"
"ते आमच्या मालकांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे आहेत."
"म्हणजे?"
"म्हणजे असं होत कि सर जॉन थॉमसनी हि प्रॉपर्टी जवळ जवळ शंभर पेक्षा जास्त वर्षापूर्वी बांधली. ते रहायचे मुंबईलाच पण सुट्टी असली कि यायचे इथे आपल्या फॅमिली बरोबर. त्या काळात माझे वडिल त्यांचे अगदी जवळचे सहकारी होते."
दोघं शांतपणे हेलिनाच बोलण ऐकत होते.
"जेव्हा ब्रिटिश निघुन गेले तेव्हा जॉन साहेबांनी हि प्रॉपर्टी माझ्या वडिलांना दिली. माझ्या इतर भावंडांना ह्या प्रॉपर्टीत काहिच रस नव्हता त्यामुळे वडिलांनंतर हि प्रॉपर्टी मला मिळाली."
हेलिना अगदी वर्षानुवर्षाची ओळख असल्यासारखी त्यांना सांगत होती. तेवढ्यात एक गोल साडी नेसलेली, थोडा काळसर बांधा असलेली, साधारण साठीतली बाई तिथं आली.
"हि सरला आमची सगळ्यात जुनी एंम्प्लॉइ हि तुम्हाला तुमची रूम दाखवेल."
हेलिनाचा निरोप घेऊन ते दोघही सरला बाईंच्या मागे मागे जाऊ लागले. त्यांची रूम वरच्या मजल्यावर होती. खोलीची रचना जुनाट पद्धतीची होती. रूमच्या बरोबर मध्ये भीतिला लागून जुन्या काळात असायचे तसे दोन लाकडि पलंग एकमेकांना जोडून डबल बेड केला होता. बेडच्या बरोबर समोर भिंतीला लागून एक मोठ लाकडि कपाट होत आणि त्याला मोठा आरसा होता. त्याच्या अगदी बाजुला एक लाकडि टेबल होत त्यावर दोन काचेचे ग्लास आणि काचेचा जग ठेवला होता. खोलीच्या डाव्या बाजुला एका कोपर्‍यात तॉयलेटचा दरवाजा होता आणि त्याच्या बाजुला एक खिडकी होती. सरलाबाई त्यांना रूम दाखवून निघुन गेल्या तसं सागरनी रूमचा दरवाजा बंद केला, खांद्यावरची सॅक टेबलवर ठेवली आणि मीताकडे पाहिलं. मीता बेडवर बसून रुमचं निरीक्षण करत होती.
"काय बाईसाहेब कसं वाटल?"
"छान, एकदम एक्सॉटिक आहे. कुठेतरी इतिहासात आल्यासारखं वाटतय. पण टिव्ही नाहि आणि हे बघ माझ्या मोबाईलला साधी रेंज पण नाहि."
तिनं एवढेसे तोंड करत म्हटल.
"मग बर आहे, आता फक्त तू आणि मी. झाला तू म्हणत होतीस तसा परफेक्ट वीकएन्ड."
तिच्या जवळ बसत आणि तिच्या खांद्यावर स्वताचा हात ठेवत सागर म्हणाला.
"अरे टिव्ही नाहि ठिक आहे पण लाईटही नाहियेत रे इथे"
"अगं त्या हेलिनाबाई म्हणाल्या ना कि पाऊस पडतोय त्यामुळे लाईट गेलेत पण येतील उद्या सकाळपर्यंत."
"अरे हो ते सगळ ठिक आहे रे पण आता उजेड आहे त्यामुळे काहि वाटत नाहिये पण रात्रीच काय."
"रात्री! तेव्हा लाईट कशाला हवाय?"
"झालं का तुझा चावटपणा सुरू. तुला माहिती आहे ना मला भीती वाटते अंधाराची ते"
मग तिला स्वतःच्या मिठीत घेत म्हणाला.
"मी असताना तुला कसली भीती."
तसं तिनं सुद्धा स्वतःला त्याच्या उबदार मिठीत झोकून दिलं.
"चल आवर पटकन थोड बाहेर आवारत फिरून येऊ. आणि येताना जेवण पण करून येऊ."

बाकीचा सगळा दिवस त्यांनी हॉटेलमध्येच व्यथित केला. मीता खूप खुश होती. बर्‍याच दिवसांनी त्यांना असा एकांत मिळाला होता. एरवी दोघहि मुंबईच्या त्या धकाधकीत आपापल्या उद्योगात इतके बिझी असतं कि दोघांना एकमेकांशी साधे चार शब्द बोलायला पण वेळ मिळत नसे, मग आधार असायचा तो फोनचा.  रात्रीच जेवण आटोपून दोघही रूमवर आले. रुममध्ये कंदीलाचा अंधूक प्रकाश पसरला होता. वातावरणात कमालीचा गारवा होता. त्या थंड वातावरणात बाहेर चाललेला ढगांचा गडगडाट अंगावर शहारे आणत होता. अशा ह्या रोमॅन्टिक वातावरणात मीता आणि सागर कधी एकमेकांमध्ये मिसळून गेले त्यांनाच कळल नाहि.

सकाळि मीताला पक्षांच्या किलबिलाटाने जाग आली. तिनं एक मोठा आळस दिला आणि अंगावरच ब्लॅन्केट सांभाळत ऊठुन बसली. तेवढ्यात तिच लक्ष बाजुला गेले, सागर तिथे नव्हता, तिला वाटल कदाचित तो टॉयलेटमध्ये असेल. मग तिनं बाजुला पडलेला सलवार कमिज अंगावर चढवला आणि खिडकीजवळ गेली. खिडकीतून एकवार बाहेर नजर फिरवली ती त्या हॉटेलची मागची बाजु होती, आता पाऊस थांबला होता पण बाहेर इतके ढग पसरले होते कि समोरच्या दरीच दृष्य अजिबात दिसत नव्हत. भिरभिरत तिची नजर खाली आवारात गेली आणि समोरच ते दृष्य पाहुन तिनं बेंबीच्या देठापासून किंचाळी फोडली. ती मागे फिरली आणि दरवाजाच्या दिशेने धावली, तिच्या चेहर्‍यावर प्रचंड भीती होती. तिनं कशाबशा पायात चपला चढवल्या आणि झपाझप जीना उतरून हॉटेलच्या मागच्या बाजुला आली. तिच्या समोर जे होत ते कोणाच्याही पायाखालची जमिन पळवेल असच होतं. समोर एका मोठ्या झाडाच्या फांदीवर एक गळफास लावलेला मृतदेह लटकत होत आणि तो सागरचा होता.

पुढिल भाग लवकरचं...

1 टिप्पणी:

  1. Very great post. I simply stumbled upon your blog and wanted to say that I have really enjoyed browsing your weblog posts. After all I’ll be subscribing on your feed and I am hoping you write again very soon!

    उत्तर द्याहटवा

प्रतिक्रिया नोंदवा