काल रात्री "Fox History & Entertainment" वर एक इंटरेस्टिंग कार्यक्रम पहाण्यात आला. "The Cult of the Suicide Bomber", मानवी बॉंम्ब ह्या संकल्पनेचा शोध घेण्याचा प्रयत्न ह्या कार्यक्रमात घेण्यात आला होता. माज्या माहितीप्रमाणे आपल्या भरतीयांन मानवी बॉंम्ब हि संकल्पना प्रथम स्व. राजीव गांधी ह्यांच्या हत्येनंतर कळली. सार्या देशानी ह्या कृत्यावर आश्चर्य व्यक्त केल होत. "The Cult of the Suicide Bomber" ह्या कार्यक्रमात जगात जे मानवी बॉंम्ब हल्ले झाले त्याबद्दलची माहिती फार सुरेख पध्दतीने देण्यात आली होती. हा कार्यक्रम भूतपूर्व CIA Agent, .Bob Baer ह्यांनी प्रस्तुत केला होता.
कार्यक्रमाची सुरूवात जगातला पहिला मानवी बॉंम्ब कोण ह्या विषयाने होते. जगातला पहिला मानवी बॉंम्ब हा ईराणमध्ये जन्माला आला होता आणि त्याच नाव हुसैन फाहमद. तर हा हुसैन अवघा तेरा वर्षाचा असताना मानवी बॉंम्ब बनून मरण पावला. म्हणजे घडल अस कि साधारण १९८० साली ईराकनी आपला शेजारी राष्ट्र असलेल्या ईराणवर हल्ला केला. ह्या हल्ल्याच प्रत्युत्तर देण्याकरता जवळ जवळ प्रत्येक ईराणी रस्त्यावर ऊतरला होता. त्यावेळचे ईराणचे सर्वेसर्वा आयुतुल्हा खोमानी ह्यानी राष्ट्र आणि धर्म वाचवण्याकरता मदतिची हाख दिली, आणि त्यांच्या ह्या हाकेला ईराणी धावुन गेला. आपला देश आपला धर्म ह्याच्या संरक्ष्णाकरता घराघरातुन लोक बाहेर येऊ लागले. त्यातलाच एक हुसैन फाहमद फक्त तेरा वर्षाचा कोवळा मुलगा. जेव्हा ईराणच्या दक्षिणेकडे ईराक मोर्चेबांधणी करण्यात यशस्वी होत होता तेव्हा हा चिमुरडयानं आपल्या अंगावर स्फोटके लावून ईराकि टॅंकरच्याखाली स्वताला झोकुन दिले, ज्यामुळे ईराकि सेनेला मागे हटण्यापासून काहिच पर्याय ऊरला नव्हता. आणि अशाप्रकारे हुसैन फाहमद हा जगातला पहिला मानवी बॉंम्ब ठरला. ईराणची राजधानी असलेल्या तेहरान ह्या शहराच्या बाहेर एक मोठ कबरस्तान आहे. तिथे ह्या युध्दात शहिद झालेल्या हजरो लोकांच्या कबरी आहेत. कबरस्तानच्या मधोमध एक कबर आहे ती म्हणंजे ह्या हुसौनची. आजहि ईराणमध्ये हुसौन हा एक महान शहिद म्हणुन ओळखला जातो.
पुढे बॉब आपल्याला तेहेरानच्या बाहेर असलेल्या हुसैनच्या घरी घेऊन जातो. बॉब आपल्याला हे सांगायला विसरत नाहि कि तो ह्या घराला भेट देणारा पहिला पाश्चिमात्य आहे. तो हुसौनच्या आई वडलांना भेटतो त्यांच्याशी बोलतो. हुसौनच्या आई आणि वडलांना त्याच्या मुलाचा खूप अभिमान वाटतो. त्याची आई सांगते तो एक दिवस शाळेतुन घरी आला आणि आईला युध्दावर जायची परवानगी मागायला लागला. त्याच्या आईनपण त्याला होकार दिला. तिच्या म्हणण्याप्रमाणे हा मार्ग त्याला "खुदा"नी दाखवला होता तेव्हा ती त्याला अडवणारी कोण? हुसौनचे वडिल मोठ्या अभिमानान सांगतात कि ईराणमध्ये शाळेत मुलांना हुसौनच्या हौतात्म्याची कहाणी शिकायला आहे.
असा हा जगातला पहिला मानवी बॉंम्ब हुसैन फाहमद, आपल्या राष्ट्रभूमीच्या संरक्षणाकरता शहिद झाला. पण मानवी बॉंम्ब बद्दलच आजच सत्य हे फारच विदारक आहे. १९८० साली हुसौनन दाखवलेला हा मार्ग पुढे दहशतवाद्यांच प्रमुख अस्त्र बनेल अस तेव्हा कोणाला वाटलहि नसेन. हेपाहुन मनात विचार आला, ईराणकरता असलेल हुसौनच हे बलिदान सार्या जगाला शाप तर ठरल नाहि ना...