"अम्मा"

नेहमीप्रमणे माझी WagonR इमोझेसच्या सिग्नलवर थांबवली. गाडी हॅन्ड्ब्रेकवर लावून मी समोरच्या काउंटडाउनकडे पाहीले तो १२० सेकंद दाखवत होता म्हणजे मला पुढचे दोन मिनिटे इथेचं थांबायच होत. सवयीप्रमाणे right side ची काच खाली करुन बाहेर पाहीलं, नजर भिरभिरत त्या समोरच्या फुट्पाथवर गेली तिथे पाहुन थोड विचित्र वाटल कारण आज तिथे सगळं शांत होत. नेहमीसारखा कलकलाट नव्हता. मी थोड आजुबाजुला वाकुन पाहिल पण कोणीच दिसत नव्हत फक्त येणारी जाणारी लोक दिसत होती. मी परत काच वर केली आता समोरचा काउंटडाउन २ सेकंद दाखवत होता. मी गाडि स्टार्ट केली आणि पुढे निघालो पण मनात एकच विचार घोळत होता "आज कोणीच कस नाहि इथे?".


हा इमोझेसचा सिग्नल म्हणजे माझ्या रोजच्या ऑफिसच्या रस्त्यावरील एक सिग्नल. ह्या सिग्नल च्या उजव्या बाजुला एक फुट्पाथ आहे. इथे अस विषेश काहि नाहि पण तरीहि रोजच्या पहाण्यामुळे इथले काहि चेहेरे ओळखिचे वाटायला लागले होते. मला त्यांची नावं माहित नाहित पण तरीहि कोणास ठाउक पण एक वेगळिच attachment झाली होती. खुप प्रकरचे लोक इथे रहातात, प्रत्येकाच आपल अस स्वतःच आयुष्य, सुख, दुख. ह्या सगळ्यांमध्ये एक वृध्दा नेहमीच ल्क्ष वेधून घेते. सधारण हि बाई आसेन सत्तर एक वर्षाची, काळी सावळी, थोडी स्थूल, बुटकी, केस पिकलेले अशी हि बाई एका स्ट्रीट लाईटच्या खाली गोणपाट टाकुन बसलेली असते. लोक तिला ’अम्मा’ म्हणतात. हि ’अम्मा’ म्हणजे तिथलं एक बुजुर्ग व्यक्तिमत्व त्यामुळे तिला ह्या लोकांमध्ये खुप मान. ’अम्मा’ पण हे सगळ खूप enjoy करायची. माझ्या observation प्रमाणे हि बाई खूप हेल्पफुल होती, इथल्या लोकांच कुठल्याहि अडचणीवर एकच उत्तर असायचं ’अम्मा’. ती नेहमी सगळ्यांमध्ये मिळुन मिसळुन राहताना दिसते. ती कधी तरुणांशी चर्चा करताना दिसते, तर कधी तिथल्या बायकांना काहि तरी समजवताना दिसते. हि ’अम्मा’ लहान मुलांची पण लाडकी, पुष्कळवेळा ती भटक्या मुलांच्या गराड्यात बसलेली असते जणू त्यांना आजीच ममत्व द्यायची. कधी कधी ती बेबीसिटींग हि करताना दिसायची. तिथल्या लोकांची भांडण सोडवायची जबाबदारी जणू ह्या अम्माचीच. मला एक प्रश्न मात्र नेहमीच पडतो कि हि ’अम्मा’ आपल्या उदरनीर्वाहा करता काय करत आसेन!!! तस बरेचदा तिला कागदाच्या पुडीतुन काहितरी विकताना पाहिलं होत, नंतर कळल ती काहितरी "दवाई" विकते. पण ओव्हरऑल मला ह्या ’अम्मा’ बद्दल भारी कौतुक वाटायला लागलं होत.


दुस़या दिवशी पण त्या फूट्पाथवर कोणीच नव्हतं. तिस़या दिवशी न रहावुन एका मुलाला विचारल.

"अरे यहा के सब लोग कहा गये?"

"हकाल दिया ना पुलिस ने सबको यहासे."

अस उत्तर देउन तो निघुन गेला. मी गाडी स्टार्ट केली, पण मनात एकच विचार हकलुन दिलं, मग कुठे गेले असतिल सगळॆ.... आणि ’अम्मा’? काय झाल तिच? काय करत असेन? कुठे असेन?.... असे शेकडो विचारं.... मग शेवटी विचार केला जाउदेयार मी का एवढा विचार करतोय.... असेन कुठे तरी.... ह्यांच आयुष्य आसच भटकं असतं....


चौथ्या दिवशी सिग्नलवर ओळखिचा मामा (trafic police) दिसला त्याने हात केला, मग थोड्या जनरल गप्पा झाल्यावर न रहावुन मी

विचारल"काय मामा हि ह्या फुट्पाथवरची सगळी लोक कुठे गेली?"

"काय माहित, गेली असतील दुसरीकडे घाण करायला."

"आणि अम्मा?"

"तिला पकडलं ना पोलिसांनी"

मी एक्दम सुन्न, मला क्षणभर काहि कळतच नव्हतं कि हा काय बोलतो आहे?.... अम्माला पोलिसांनी पकडल पण का?.... काहितरी गोंधळ आहे, मनात विचारांच नुसतं वादळं उठलं होतं.

"का?"

"म्हातारी ड्रग्ज विकायची ना..."

हा दुसरा मोठा शॉक ’अम्मा’ आणि ड्रग्ज हा काय प्रकार आहे... तो पुढे सांगु लागला...

"पुड्यातुन लोकांना ड्रग्ज विकायची... आता काहि खर नाहि तिचं गेली बिचारी बाराच्या भावात."

तेवढ्यात सिग्नल पडला मी गाडि स्टार्ट केली पण मनात विचारांच काहुर माजलं होत. ’अम्मा’ च हे दुसरं रुप मनाला चटका लावुन गेल हे मात्र नक्की.

३ टिप्पण्या:

  1. As usual, this blog is also amazing..i like the way you play with words...they just touch your heart..keep it up

    उत्तर द्याहटवा
  2. Unpredictable......!

    thats the word for ur post. what will happen next is unpredictable...

    Most of the time reader knows about the post after reading some lines but in ur case it is not and thats the nice quality for any writer\blogger\storyteller...

    उत्तर द्याहटवा

प्रतिक्रिया नोंदवा