ती

आज ती भेटली, बयाच दिवसांनी भेटली, दिवसांनी कुठे बयाच वर्षानी भेटली. आजहि ती तेवढिच सुंदर दिसत होती. तिचे ते चमकदार टपोरे डोळे अजहि तेवढेच मोहक होते. तिचे ते मऊ मोकळे केस आजहि वायाबरोबर तिच्या चेहयावर येत होते आणि ती तशीच त्यांना आपल्या हातांनी नाजुकपणे बाजुला सारत होती. हसताना तिच्या गालावर पडणारी ती खळी आजहि तेवढिच खोल वाटत होती. थोड तिन weight gain केल होत तरीहि ती बेढप वाटत नव्हती. तिचा तो मृदु आवाज आजहि तितकाच मधुर वाटत होता. बोलताना तिच्या आवाजात जाणवणारी उत्स्फुर्तता अजिबात कमी झाली नव्हती.

तिला इतक्या वर्षांनी पाहुन मन एकदम प्रफुल्लित झाल होत. अंगात एक प्रकारच वेगळच रोमांच जाणवत होत. आवाजात कंप जाणवत होता. भुतकाळ एकदम जीवंत झल्यासारखा वाटला. तिच हे आचानक माझ्या समोर येण म्हणजे मनाला एक विलक्शण आनंद देत होतं. पण भावनांच्या ह्या सगळ्या खेळात मनातली खपली धरलेली जखम परत ताजी झल्यासारखी वाटली.

तशी तिची आणि माझी ओळख कॉलेज पासुनची. आमची ओळख होण्यासारख आमच्यात अस काहिचं common नव्हतं. मी टिपीकल कॉलेज बॉय.. मित्र, कट्टा, अड्डा, कॅन्टिन ह्यामध्ये रमणारा. आयुष्याचा प्रत्येक दिवस भरपूर enjoy करायचा हे माझ ब्रीदवाक्य होतं. ती तशी साधी सरळ नाकासमोर चालणारी, प्रत्येक लेक्चर मनोभावे अटेंड करणारी, सदैव आपल्या ठरविक मैत्रिणींच्या गराड्यात असणारी, फार क्वचीतच कोणाबरोबर तरी बोलणारी ती. तिची राहणी पण अगदि साधी म्हणजे एखादा डिसेंट पंजाबी ड्रेस.. क्वचितच कधीतरी जीन्सं आणि त्यावर एखादा टॉप. मेकअप म्हणजे काय हे सुद्धा तिला माहित आहे का हे प्रश्न पडत आसे. पण तरीहि ती चारचौघींमध्ये उठुन दिसत आसे.


आमची ओळख Practicals च्या निमित्ताने झाली. म्हणजे झाल असं की ती माझी पार्टनर म्हणुन सिलेक्ट खाली, पहिल्यांदा मित्रानी खुप चिड्वुन घेतलं, मी पण विचार करायचो की कुठुन हि काकुबाई मिळाली. पण हळुहळु तिच्याशी ओळख होत गेली. तिच ते आभ्यासातल concentration, कुठलहि काम मनापासुन करायचि तिची पद्धत मला खुपच भावायला लागली होती. तिच ते छान समजुतदार पणाच बोलण मला तिच्यात गुंतवत होतं. मी लॅब्स रेग्युलर अटेंड करायला लागलो होतो. मला तिचा सहवास हवाहवासा वाटत होता, लेक्चरला पण जायला लागलो, पण लेक्चरकडे कमी आणि तिच्याकडेच जास्त लक्ष असायच. मला नेहमी वाटायच कि मी पण तिला तेवढाच आवडतो का? का ती मला फक्त एक चांगला मित्र मानते? पण काहिहि असो ते माझ्या आयुष्यातले सोनेरी दिवस होते. खुप वेळा विचार केला आपल्या मनातल तिला सांगाव पण कधी हिंम्मतच झाली नाहि.

आज जेव्हा ती भेटली तेव्हा एक्मेकांची चौकशी केली, त्या सोनेरी दिवसांची आठवण काढुन दोघहि भूतकाळात रममाण झालो, खुप गप्प मारल्या. शेवटि निरोपची वेळ आली आणि तिनं निरोप घेतला. ती निघुन गेली परत एकदा... मला माहित नव्हत की ती आता परत कधी भेटेल, सगळच अनुत्तरित. ती गेल्यावरहि डोक्यात फक्त तिचाच विचार चालु होता, गेलेल्या क्षणांची उजळणी सुरु होती. ती तिच्या संसारात खुप सुखात आहे हे ऐकुन खुप बर वाटल, पण तरीहि तिच्या चेहयावर एक वेगळिच उदासी जाणवली. ती नक्कि तिच्या आयुष्यात खुष आहे ना? असा विचार मनात येत होता.. का असा विचार करुन मी माझ्या मनाची तर समजुत घालत नव्हतो...

२ टिप्पण्या:

 1. Hi Kedar
  I am Mohnish from nautanki.tv. I read your blog and found it to be quite interesting. Well I have some information for you..

  Everytime someone comes to your blog, you get paid in return. All you go to do is register with nautanki.tv to get a code for an exclusive media flash player which can be set on your page. This TV screen will play various types of content from humour to songs to religious discources on your website, offering your visitor a bigger reason to come again and again. And everytime someone who visits your blog / website views the content you get paid. While you concentrate on building your blog and website we provide you with revenue. And some of the biggest website owners use our TV screen and earn better than what they earn from others.

  Regards
  Mohnish Modi
  mohnishm@nautanki.tv
  99204 16362

  उत्तर द्याहटवा
 2. hmmmmm.........!

  have u heard the song "Sang sakhya re...." of sandeep khare ?

  may be u like it..

  उत्तर द्याहटवा

प्रतिक्रिया नोंदवा