त्या अथांग समुद्राच्या फेसाळत्या लाटांकडे एकटक पहात मीना आपल्याच विचारात मग्न होती. ती संध्याकाळची वेळ होती, वातावरणात समुद्राचा एक प्रकारचा खारटपणा मिसळला होता. किनारयावरच्या त्या उंचच उंच नारळीच्या झांडांचा सुळसुळ आवाज वातावरणात एक वेगळिच लय टाकत होता. समोर तांबडा सूर्य समुद्राच्या दिशेने रोखुन पहात होता जणू तो पाण्यात सूर मारायची तयारी करत होता. वर आकाश सुंदर नीळ्या तांबड्या रंगाची शाल पांघरुन आपली शोभा दाखवत होता. काठावरची ती सोनेरी वाळु त्या वातावरणात आजुनच गडद वाटत होती. अशावेळी पक्ष्यांचा किलकिलाट वातावरणात एक वेगळाच नाद निर्माण करत होता. दूरवर एक गलबत हळुहळु ठिपका होत त्या अथांग समुद्रात स्वताला झोकुन देत होत. समुद्रात थोड्याच अंतरावर असलेलं ते लाईटहाउस प्रकशझोत सोडत त्या वातावरणात आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन देत होता.
मीनाच्या मनात विचारांच काहुर माजल होत. किती अजब असतात ह्या लाटा, काहि छोट्या तर काहि खुप मोठ्या. छोट्या लाटा जितक्या शांतपणे येतात तितक्याच शांतपणे त्या वाळुत विरुन जातात. पण मोठ्या लाटा जेव्हा येतात तेव्हा जाताना किनाऱ्यावर बरीच उलथपालथ करुन जातात. जेव्हा ह्या लाटा किनऱ्यावर येतात तेव्हा आपल्याबरोबर अनेक उपयोगी आणि निरुपयोगी गोष्टि घेउन येतात. आपल्या आयुष्यातली सुख आणि दुख अशीच ह्या लाटांप्रमाणे आपल्या आयुष्यावर आपटत असतात. जेव्हा एखादि मोठि सुखाची किंवा दुखाची लाट येते तेव्हा ती जाताना आपल्या आयुष्यात बरीच उअलथापालत करुन जाते.
आज मिलिंदला जाउन वीस दिवस झाले. वीस दिवसांपूर्वी मिलिंदनी मीना आणि ह्या जगाचा अखेरचा निरोप घेतला. मीनाच्या आयुष्यावर आदळलेली दुखाची हि सगळ्यात मोठि लाट. हि लाट अजुन ओसरत होती पण जाताना मीनाकडुन बरच काहि घेउन जात होती। मिलिंदच्या अशा अकस्मात झालेल्या मृत्यूमुळे मीना पार कोलमडुन गेली होती। समुद्राकडे एक्टक पहात असताना सगळा भूतकाळ तिच्या डोळ्यसमोरुन सरकत होता. जितक्या अचानकपणे मिलिंद तिच्या आयुष्यात आला होता, तितक्याच अचानकपणे तो निघुनहि गेला होता.
जेव्हा मिलिंद आणि मीना ह्यांचा दाखवण्याचा कार्यक्रम झाला तेव्हाच तिनं त्याला मनातुन आपला पती मानल होत. पोलिसात इंन्स्पेक्टर असलेला मिलिंद, मीनाच्या घरच्यांना फारसा पसंद नव्हता. पण मीनाच्या इच्छेपुढे कोणाचे काहिच चालले नाहि. हे मात्र नक्कि ज्या दिवसापाससून मिलिंद, मीनाच्या आयुष्यात आला होता त्या दिवसापाससून तिच अवघ आयुष्यच बदलुन गेल होत. आधिच सुंदर असलेली मीना लग्नानंतर जरा जास्तच खुलून गेली होती. मुंबईला येउन मीना आपल्या नवीन संसारात अगदि रममाण झाली होती. मुंबईत आलेली हि कोकणकन्या थोड्याच दिवसात पक्कि मुंबईकर झाली होती. प्रेमळ मिलिंदच्या सहवासात तिच आयुष्य एखाद्या पतंगीप्रमाणे आकाशात उडत होत.
बघता बघता मीना आणि मिलिंदच्या लग्नाला पाच वर्ष झाली. लग्नानंतर एका वर्षात मीनाने एका गोंडस बाळाला जन्म दिला. ह्या छोट्या पाहुण्याच्या आगमनाने मीनाच्या जीवनाची बाग एकदम फुलुन गेली होती. मोठ्या प्रेमाने त्यांनी त्याच नाव चिराग ठेवलं. दिवस झपाट्याने सरत होते चिराग आता मोठा होत होता, एकुलता एक असल्यामुळे तो दोघांचा खूप लाडका होता, पण तरीहि त्याच्या बाबांचा त्याच्यावर जरा जास्तच जीव होता. चिराग चार वर्षाचा झाला होता. त्याचा चौथा वाढदिवस दोघांनी मोठ्या थाटात साजरा केला. वाढदिवसाला चिरागला, मिलिंदनी छान रीमोटवर चालणारी खेळण्यातली मोटरगाडि घेउन दिली. सरत्या दिवसागणित, मीना आणि मिलिंद आपल्या संसाराचा गाडा मोठ्या दिमाखात पुढे नेत होते. आणि तो दिवस आला २६ नोव्हेंबर २००८, कोणाला माहित होते कि हा दिवस मिलिंद आणि मीनाच्या सुखी संसाराचा शेवटचा दिवस होता.
मीना आपल्या विचारांच्या तंद्रितुन बाहेर आली जेव्हा चिरागनी तिला जोरात ’आई’ म्हणत मीठि मारली. पाणावलेल्या डोळ्यांनी त्या अथांग समुद्राकडे पहात तिच्या मनानं पक्का निर्धार केला, कि मला जगायचे आहे ते ह्या किनाऱ्यासारखं आयुष्यावर आदळणाऱ्या सुख आणि दुखाच्या लाटांचा सामना करत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
प्रतिक्रिया नोंदवा