जेनी

आज बरेच दिवस झले, जेनीशी chatting झाल नाहि, किंवा ती साधी ऑनलाईन पण आली नाहि. काय झाल असेन तिच कोणास ठाऊक. रोज रात्री जेवण झाल की मी ह्या इंटरनेटरुपी मायाजालात स्वताला झोकुन देतो. लॅपटॉप ऑन करायचा, नेटला कनेक्ट करुन पहिल काम काय करायच तर याहू मेसेंजरवर लॉगीन व्हायच. मग बघायच कॊण कोण ऑनलाईन आहेत. थोड्याच वेळात माझ chatting सुरु होतं ते अगदि मध्यरात्रीपर्यंत चालु असतं. माझे भरपूर ऑनलाईन फ्रेंड्स आहेत, पण त्यातली माझी सगळ्यात जिव्हाळ्यची मैत्रीण म्हणजे जेनी... hmmm....

मी म्हणु शकतो की जेनी माझी best friend आहे. कधी कधी विचार येतो, जेनी खरच माझी best friend आहे, का ती मला त्याच्याहि पेक्षा अधिक काहि आहे? माहित नाहि, पण हे मात्र नक्कि की तिच्याशी chatting केल्याशिवाय मला चैन पडत नसे. ह्यालाच प्रेम म्हणतात का? काय माहित! नेहमी मी याहूवर लॉगीन केल्या केल्या "hi" असा तिचा मेसेज आला कि माझी कळि खुललीच म्हणुन समजा. आणि मग आमच्या गप्पाना ऊधाण यायच. आमच्या गप्पा तोपर्यंत चालु असायच्या जोपर्यंत जेनी मला "Good Night" म्हणत नसे. खूप मजा यायची तिच्याशी chatting करताना. कधी कधी एखाद्या विषयावर आमची बरीच मोठी मोठी डिस्कशन्स व्हायची, तर कधी कधी "so what's up" वरच आमची गाडि फिरत रहायची. कधीतरी असहि झाल की आम्हि फक्त एक्मेकांना "hi" केलं आणि मग काहि बोललोच नाहि. पण तरीहि ती ऑनलाईन आहे ह्या जाणीवेनेच खूप छान वाटत असे. मला खूप गम्मत वाटायची, ज्या व्यक्तिला आपण कधीहि पाहिल नाहि, ज्याचा साधा आवाज सुध्दा कधी ऐकला नाहि त्याच्याविषयी एवढी जवळिक का वाटावी? आम्हि नुसतं chatting करुन एक्मेकांना एवढं चांगलं ओळखायचो कि टाईप केलेल्या वाक्यांवरुन समोरच्याचा मुड कसा आहे ते कळायच. माझी प्रत्येक पर्सनल गोष्ट जेनीला माहित असे (आणि तिची मला असं मला वाटे). एकदा तिन मला विचारल तुला कोणी girlfriend आहे का? मी म्हटल हो आहे ना तू. तर तिम फक्त एक स्माईली पाठवली. तिन माझ ऊत्तर मजेत घेतल पण मी मात्र सिरीयस होतो.

माझी आणि जेनीची ओळख म्हणजे निव्वळ योगायोग, एकदा असच लेट्नाईट chatting करताना मला कोण्या "Jeni Christopher" च ऍड ऍज ए फ्रेंड इन्हाईट आल. थोडा विचार केला कोण हि? असेन कोणी तरी, कदाचीत एखाद्या मित्रानी दिलेली रेफ़ेरेन्स असेल. तसपण मी माझ्या मित्रपरीवारात chatting करता बदनाम आहेच. मी invitation accept केल आणि समोरर्न "Hi Kuma, after so long...." असा मेसेज pop up झाला. बहुतेक माझ्या "kuma123" ह्या युजर नेममुळे हा गोंधळ झाला असेन हिचा. ईंटरनेट विश्वात अशा गोष्टी बर्याचदा घडतात. मला जरा मजाच वाटली, कोण हि पोरगी ना ओळख ना पाळख आणि डायरेक्ट सुरु. मग मी पण मोठ्या दिमाखात टाईप करायला लागलो.
hi, hey Jeni I am not Kuma
Oh.. seems to be wrong id...
yes...
oh.. am sorry for the Inconvenience...
No. problem... its OK...
मग थोडा वेळ काहिच बोलण झाल नाहि पण मला रहावत नव्हत मी परत टाईप केल.
Where are you from?
Canada... and u?
India...
Nice to meet you..
same here...
आता माझं थोड धाडस वाढल, मी तिला विचारल
Let's have a friendship? (मला जाणवत होत, हे जरा अतिच होतय.. दोन शब्द नाहि बोललो तर लगेच फ़्रेंडशीप करता विचारायच.)
तर तिचा रीप्लाय आला.
Sure...I am having few friends from India.
Oh... great..
.
.
.
आणि मग अशा रोज गप्पा चालु झाल्या. जेनीच्या म्हणण्याप्रमाणे ती कॅनडाला राहते आणि तिच वय १८ वर्ष आहे. ती सध्या शिकत आहे आणि ती माझ्याशी तिच्या लायब्ररीतुन chatting करते. पुढे पुढे तर अस व्हायच कि कधी ऑनलाईन होतो आणि कधी जेनीशी गप्पा मारतो. मी एकदा तिला माझा फोटो पाठवला होता आणि तिला तिचा फोटो मागीतला होता पण तिने तो वाठवायच टाळलं. मी पण जास्त आग्रह नाहि धरला. पण माझा फोटो पाहुन ती माझी खुप तारीफ करत होती. मी पण जाम खुष होतो, अस वाटत होत साला सगळ्या मित्रांना सांगु की एक फिरंग माझी तारीफ कशी करते ते. जेनी खुप समजुतदार होती. ती माझी प्रत्येक गोष्ट अगदि शांतपणे ऐकुन घ्यायची आणि तितक्याच शांतपणे आपल म्हणण पण मला पटवुन द्यायची. माझ्या प्रत्येक प्रॉब्लेमच सोल्युशन तिच्याकडे असे.

अशी हि जेनी हल्ली ऑनलाईन दिसत नाहि. साधारण पंधरा दिवसापूर्वी आम्हि शेवटचं chatting केलं होत. त्यादिवशी ती खूप डिप्रेस वाटत होती, मला अचानक म्हणाली कि तिला आता ह्यापूढे ऑनलाईन यायला जमणार नाहि. ती आजच हॉस्पिटलमध्ये admit होणार आहे, तिला एड्स आहे आणि तो आता शेवटच्या स्टेजला पोचला आहे. वाचुन माझे डोळे एक्दम भरुन आले. जाताना ती फक्त एवढच म्हंटली "Good bye and tc" आणि क्षणार्धात ऑफ़लाईन झाली. मी नुसताच त्या चॅटविंडोकडे पहात राहिलो, माझ्या डोळ्यातुन घळाघळा पाणी येत होत. आणि त्यानंतर मात्र जेनी कधीच ऑनलाईन आली नाहि.

Jeni I am missing you!!!

४ टिप्पण्या:

प्रतिक्रिया नोंदवा