कोर्टाच्या आवारातून चालत सायली गेटपाशी आली. तिन शेवटचं मागे वळुन पाहिल, सुमित आपल्या कारचा दरवाजा ऊघडुन आत बसण्याच्या तयारीत होता. त्याच्याबरोबर अर्चनापण होती, ती आधीच गाडित बसली होती. सायलीनं सुमितकडे पाहिल, त्यानहि तिच्याकडे पाहिल पण तिची नजर चूकवत तो कारमध्ये बसला. त्याची गाडी सायलीच्या बाजुनं एकदम स्पीड्मध्ये निघुन गेली आणि जाताना मोठा धुरळा ऊडवुन गेली. जशी त्याची गाडी जोरात गेली तसाच सुमितहि सायलीच्या जीवनातुन निघुन गेला होता, दोन वर्षांच्या त्यांच्या संसाराचा धुरळा उडवुन.
सायलीनी लेडिज हॉस्टेलमधल्या आपल्या रुमचं दार उघडल, आत जाऊन दाराच्या सगळ्या कड्या लाउन घेतल्या. पायातल्या चपला काढत तिनं मानेभोवतीची ओढणी कॉटवर फेकली. दोन मिनिट तशीच ऊभी राहुन ती खाली जमिनीवर बसली. आपला चेहरा गुडघ्यात लपवून ती हामसून हामसून रडू लागली. इतका वेळ दाबुन ठेवलेल तिच दु:ख तिच्या डोळ्यातल्या अश्रुवाटे बाहेर येत होतं. मनात नुसत विचारांच वादळ ऊठल होतं. असंख्य प्रश्न तिच्यासमोर आ वाचुन उभे होते. पण आता तिला रडण्याशिवाय काहिच सुचत नव्हतं. जवळ जवळ अर्धा तास ती नुसतीच रडत होती. मग ती ऊठली आणि कॉट्वर जाऊन पडली. परत एकदा तिच्या मनात गतजीवनाच्या आठवणी तरळु लागल्या. सुमितबरोबरचा तिचा दोन वर्षांचा संसार तिच्या डोळ्यासमोरन जाऊ लागला. दाखवायच्या कार्यक्रमात झालेली त्यांची ती पहिली भेट, त्यनंतर त्यांच थाटात झालेलं लग्न, त्यांनी अगदि मनोसोक्त ऍजॉय केलेलं हनीमून ते आगदि सुमितच्या आयुष्यात झालेल्या अर्चनाच्या अगांतुक अगमनापर्यंत. त्या दोन वर्षातल्या प्रत्येक सुखाच्या आणि दु:खाच्या घटना तिच्या डोळ्यासमोरुन फिरु लागल्या. तिचे डोळे परत पाणवले आणि ती पुन्हा रडु लागली. आठवणींच्या ह्या लाटेत तिला झोप कधी लागली हे कळलच नाहि.
सकाळी सात वाजता घड्याळाच्या गजरान सायली ऊठली. ती रोजच्या सवयीप्रमाणे ऑफिसला जायला आवरु लागली. आता तिच्या चेहर्यावर काल जे काहि घडलं त्याबद्दल काहिच भाव नव्हते. तिचा चेहरा अगदि सकाळच्या निळ्या आकाशाप्रमाणे स्वच्छ होता. रात्री झालेल्या वादळानंतरची सकाळ असतेना अगदि तसा. पण आकाश कितीहि स्वच्छ दिसत असलं तरी वादळानं जमिनीवर केलेली हानी मात्र लपून रहात नाही. तिच्या मनाची अवस्था त्या जमिनीप्रमाणेच झालेली होती. ती नेहमीप्रमाणे आवरुन ऑफिसला जायला बाहेर पडली. तिच्या वागण्या चालण्यात काहिच बदल नव्हता. बदल होता तो फक्त एकाच गोष्टित, तिच्या गळ्यातल्या जाड सोन्याच्या मंगळसुत्राची जागा आता एका पातळ चेननी घेतली होती.
Very nice writing...in 3 para you brought the complete picture in front of my eyes...Keep it Up..!!!
उत्तर द्याहटवापण आकाश कितीहि स्वच्छ दिसत असलं तरी वादळानं जमिनीवर केलेली हानी मात्र लपून रहात नाही. जीवनाचे सत्य. चांगली मांडणी. आवडली.
उत्तर द्याहटवावेधक लिखाण,वेगळ्या वाटेने जाणारे,मनाला रुख्ररुख लावणारे!शुभेच्छा!!!
उत्तर द्याहटवा