आऊटहाऊस - १

रवीनं पानवाल्याकडुन एक 555 सिगारेटच पाकिट घेतल. थोड थांबुन जरा आजुबाजुला नजर फिरवली, सगळीकडे मिट्ट काळोख पसरला होता, वातावरणात छान गारवा होता. पानवाल्याकडुन पैसे परत घेऊन रवीनं बाईकची किक मारली आणि आऊटहाउअसच्या दिशेने निघाला. रस्त्यावरचे दिवे बंद होते तरीपण आकाशातल्या त्या चंद्रकोरीचा मंद पांढरा प्रकाश परीसर ऊजळुन टाकत होता. बाईकवरुन जाताना थंडी जरा जास्तच बोचरी वाटत होती. आजुबाजुला रातकिड्यांचा किर्र आवाज एक्दम भेदक वाटत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजुंना दाट झाडी होती. ’वा काय मस्त वातावरण आहे, एकदम ऍडव्हेन्चरस, आणि अशा वातावरणात सिगारेट ओढण्याची मजा काहि औरच’ रवी स्वताशीच पुटपुटला. ’ह्या बायकांना काय माहित हे सुख? बस नवर्‍याला काहिहि करायला विरोध करायचा एवढच माहित’. आणि तो मगाचचा प्रसंग त्याला आठवुन हसायला आलं. ’रीया उगाच घाबरत होती इथे यायला, किती मस्त एकांत आहे इथे. काका घरी नव्हते म्हणुन ह्या आऊटहाऊसची चावी तरी मिळली, नाहितर ते म्हणत होते तिथे नको जाऊस वातावरण चांगलं नाहि. बोला असं वातावरण कुठे मिळेल?.’ रवीच्या नजरेसमोरुन सगळा दिवस जाऊ लागला. ’काय मस्त मजा आली मुंबईहुन बाईकनी इथे आऊटहाऊसपर्यत येताना. काकांनीपण काय छान बांधल आहे हे आऊटहाऊस. चहोबाजूंनी झाडांनी वेढ्लेलं मॊठ आवार आणि त्याच्यामध्ये तो टुमदार बंगला. तीन बेडरुम हॉल किचनचा हा टुमदार बंगला म्हणजे काकांची काळि संपत्तीच.’ अचानक रवीने ब्रेक मारला तो रस्त्याच्यामधुन आडवा जाणारा बैल पाहुन. ’काका म्हणत होते ते खर आहे हि जागा खुपच शांत आहे. मला लवकर गेल पाहिजे. रीया मी निघताना आधीच घाबरली होती आणि एव्हाना तो धोंडिबापण काम अटोपुन त्याच्याघरी गेला असेन.’ रवीनं बाईकचा स्पीड एकदम वाढवला आणि परत विचारांच्या तंद्रित गेला ’धोंडिबा म्हणत होता कि इथे आजुबाजुला नेहमी काहितरी विचित्र भूताप्रेताच्या घटना घडत असतात, छे पण माझा असल्या फालतु गोष्टिंवर अजीबात विश्वास नाहि. पण त्या येड्याच्या ह्या बोलण्यामुळे आधीच घाबरलेली रीया आजुनच घाबरली.’ विचारांच्या नादात रवी आउटहाऊसच्या गेटजवळ कधी अला ते त्याला कळलच नाही.

आवारात बाईक लावुन रवीने बंगल्याकडे नजर टाकली, हॉलचा लाईट आजुनहि चालुच होता. ’रीया आजुनहि बहुतेक टिव्हि पहाते आहे वाटत, मग मी एक सिगारेट इथे नक्कि ओढु शकतो.’ स्वताशीच हासत त्याने एक सिगारेट शिलगावली. सिगारेटचा धूर त्या थंड हवेत सोडत बंगल्याच्या दिशेने चालायला लागला. हळुहळु चालत तो बंगल्याच्या दाराच्या बाहेर येऊन उभा राहिला. आतुन टिव्हिचा आवाज येत होता. बेल न वाजवता सहजच गंमत म्हणुन रवी दरवाजाच्या थोड बाजुला असलेल्या हॉलच्या खिडकिकडे गेला. त्यानं आत डोकावुन पाहिल आणि आतल द्रुश्य तो डोळे विस्फारुन पहातच राहिला..

पुढील भाग लवकरच....

४ टिप्पण्या:

 1. आमची curiosity खाजवलीत राव. आत्ता पुढचा भाग लवकरात लवकर येऊ दे.

  उत्तर द्याहटवा
 2. याला काय अर्थय राव
  आता पुढचा भाग लवकर येऊ द्यात वाट पाहतोय

  उत्तर द्याहटवा
 3. मराठी ब्लॉगर्सचा पहिलावहिला ब्लॉगकॅम्प सिंहगड रोडवरील पु. ल. देशपांडे उद्यानात मोठ्या उत्साहात झाला, १६  जानेवारी १० ला त्याबद्दल सर्व मराठी ब्लॉगेर्सचे अभिनंदन :-) महेश

  उत्तर द्याहटवा
 4. शुद्धलेखनाच्या चुकांमुळे वाचनाची मजा निघून जात आहे. आपण खाली दिलेले फायरफॉक्स एड-ऑन वापरून पाहा.
  https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/12797/

  उत्तर द्याहटवा

प्रतिक्रिया नोंदवा