आऊटहाऊस - २

पूर्वसुत्र

टिव्हिवर पिक्चर चालु होता, पण रीयाच लक्ष टिव्हीकडे नव्हतच, ती समोरच्या टिपॉयवर ठेवलेल्या पाण्याच्या ग्लासकडे एकटक पहात होती. अचानक तो ग्लास वर उचलला गेला आणि हवेतुनच रीयाच्या दिशेने आला. रीयाने ग्लासमधलं पाणी प्यायलं आणि ग्लास परत हवेतच ठेवला. ग्लास परत टिपॉयवर जाऊन बसला. रवी डोळे विस्फारुन समोरच द्रुष्य पहातच राहिला. क्षणार्धात रीयाच्या तॊंडातुन रक्त येऊ लागलं आणि ती सोफ्यावरुन खाली पडली, ती मेलेली होती. समोरच द्रुष्य रवीला अनाकलनीय होत, तो काहिहि बोलणार इतक्यात खिडकिच्या वरच्या दिशेने दोन हात रवीच्या गळ्याभोवती आवळले गेले. रवीला काय चालल आहे काहिच कळत नव्हत, समोर रीयाच प्रेत आणि आता त्याची स्वताची पाळी आली होती. रवी आपल्या दोन्हि हातांनी ती पक्कड ढिली करण्याचा प्रयत्न करु लागला. ह्याच प्रयत्नात त्याने स्वतला जोरात मागच्या बाजुनं हिसका दिला तशी त्याच्या गळ्याभोवतीची ती पक्कड सुटली आणि तो मगच्यामागे जमिनीवर पडला. त्यानं समोर पाहिल तर ते दोन हात त्याच्या दिशेने पुढे सरकत होते. तो कसाबसा ऊठला आणि गेटच्या दिशेने धावु लागला. तो गेटपर्यंत आला आणि गेटच दार ऊघडायला लागला. ऎवढ्यात त्याच लक्ष बाहेर गेलं, बाहेर गेटच्या दिशेने दोन मोठे बिबटे वाघ येत होते. रवीनं त्यातल्या एका बिबट्याकडे पाहिल तशी त्याने जोरात डरकाळि फोडली.

रवी परत मागे वळला आणि आऊटहाऊसच्या मागच्या गेटच्या दिशेने पळु लागला. धावताना रवी आचानक थांबला, त्याच्यापासुन दोन मिटर अंतरावर जवळजवळ १०० एक साप त्याच्या दिशेने वळवळत येत होते. त्याने लगेच बाजुच्या झाडित उडी मारली आणि. तसाच धडपडत गवतातुन मागच्या गेटकेडे पळु लागला. धावताना अचानक त्याचा पाय एका झुडुपात आडकला आणि तो जोरात पडला. त्याच डोक जमिनीवर सणसणीत आपटल. डोक इतक जोरात आपटल कि त्याला आजुबाजुच काहिच समजत नव्हत. पुढचे पाच मिनिट तो तसाच पडुन होता, जेव्हा त्याला शुढ्द आली तेव्हा त्यला अस जाणवल कि त्याचे पाय कशानी तरी आवळले जात आहेत. त्यानं पायाकडे पाहिल तर त्या झाडांच्या वेली त्याच्या पायाला वेढे घालत होत्या. तो एकदम सुन्न झाला होता, त्याला काहिच सुचत नव्हतं तो सरळ होऊन बसला आणि दोन्ही हातांनी त्या वेलींची पक्कड ढिली करु लागला. बराच वेळ प्रयत्न करुन सुध्दा ती पक्कड काहि सुटत नव्हती, ती आजुनच घट्ट होत चालली होती. तो तसाच केवीलवाण्या नजरेने आपल्या पायाकडे पहात राहिला. आणि अचानक ती पक्कड सुटली, त्याच्या पायाला आणि अंगावर खूप जखमा झाल्या होत्या, आणि त्यातुन रक्तहि वाहत होत. तो परत ऊठला आणि पळायचा प्रयत्न करु लागला पण आता त्याला ते जमत नव्हत. त्यान आजुबाजुअला नजर फिरवली, आता बंगल्यतले दिवे पण बंद झाले होते. फक्त बागेतले दिवे तेवढे चालु होते.

तो जिथे उभा होता तिकडन साधारण दोन ते तीन मिटर अंतरावर कंपाऊंडची भींत होती. तो त्या भींतीजवळ गेला आणि भींतीवर चढायचा प्रयत्न करु लागला. पण भींत त्याच्या ऊंचीपेक्शा जरा जास्त होती. तेवढ्यात त्याला बाजुला एक दगड दिसला, त्याने आपला एक पाय त्या दगडावर ठेवला आणि दोन्हि हात त्या भींतीवर ठेवले आणि स्वताच शरीर वर ढकलायला लागला. पण पुढच्याच क्षणाला तो जीवाच्या अकांताने ऒरडुन खाली पडला, त्याचा ऊजवा हात कोपर्यापासुअन कापला गेला होता आणि त्यातुन भळाभळा रक्त वहात होत. रवी आता काहि समजण्याच्या पलीकडे गेला होता. तो त्याच्या तुटलेल्या हाताकडे काहि वेळ निष्प्रभपणे पहात राहुला. तो तसाच ठेचकाळत ऊठला आणि मागच्या गेटच्या दिशेने चालु लागला. आतामात्र रवी प्रचंड थकला होता, असा एकहि अवयव न्व्हता कि ज्यातुन त्याला वेदना होत नव्हत्या. त्याच्यासमोर फक्त एकच लक्ष होत आणि ते म्हणजे जमला तर जो थोडफार जीव आहे तो वाचवायचा आणि इथुन बाहेर पडायच. तो तसाच ठेचकाळत मागच्या गेटच्या दिशेने चालु लागला. पण अचानक त्याच्या गळयाभोवती फास आवळला गेला आणि पुढ्च्याच क्षणाला त्याचे पाय जमिनीवरुन वर उचलले गेले. रवी पाण्यातुन बाहेर काढलेल्या माशाप्रमाणे तशफडत होता आणि काहि क्षणातच रवीचा निर्जीव मृतदेह झाडाच्या फांदिवर लटकत होता.

रवी मोठ्यानी ऒरडत झोपेतुन ऊठला, त्याला प्रचंड घाम आला होता. तो थोडावेळ तसाच बेडवर बसुन राहिला. त्याला त्याच डोक जड झाल्यासारख वाटत होत. त्यान त्याच्या ऊजव्या हाताकडे पाहिल तर तो एकदम व्यवस्थित होता. तो क्षणभर सुखावला म्हणजे मगाचच स्वप्न होत तर.. तो स्वताशीच पुटपुटला ’काय भयानक स्वप्न होत!!!.’. त्यान शेजारी पाहिल तर रीया तिच्या जागेवर नव्हती. त्यान विचार केला बहुतेक टॉयलेटला गेली असेन, त्यानं तिला आवाज दिला पण काहिच उत्तर आल नाहि. तो बेडवरुन ऊठला आणि त्यान टॉयलेटच दार ढकलल तर आत कोणीच नव्हत. त्याने बेडरुमचा दरवाजा ऊघडला तर बाहेर हॉलमध्ये रीया सोफ्यावर बसली होती, समोर टिव्हि चालु होता. पण रीयाच लक्ष टिव्हीकडे नव्हतच, ती समोरच्या टिपॉयवर ठेवलेल्या पाण्याच्या ग्लासकडे एकटक पहात होती. अचानक तो ग्लास वर उचलला गेला आणि हवेतुनच रीयाच्या दिशेने आला. रीयाने ग्लासमधलं पाणी प्यायलं आणि ग्लास परत हवेतच ठेवला. ग्लास परत टिपॉयवर जाऊन बसला. समोरच द्रुष्य पाहुन रवी जमिनीवर कोसळला तो कायमचाच.

२ टिप्पण्या:

प्रतिक्रिया नोंदवा