दोष कुणाचा

आज दोन वर्ष झाली पण मी जेव्हा जेव्हा शीलाला पहतो तेव्हा तेव्हा मनाच्या कुठल्यातरी कोपर्‍यात एक वेगळिच अस्वस्थता जाणवते. शीला म्हणजे माझी एक चांगली मैत्रीण आणि माझा खास मित्र अजीत ह्याची बायको. आम्हि तिघे एकाच ऑफिसमध्ये काम करतो. अजीत आणि मी लहानपणापासूनचे जीवलग मित्र. आम्हि दोघ एकाच शाळेत गेलो, एकाच कॉलेजमध्ये शिकलो, आणि योगायोगच म्हणा पण नोकरी देखील एकाच ठिकाणी करतो आहोत. शीलानं साधारण तीन वर्षापूर्वी आमच ऑफिस जॉईन केलं. शीला दिसायला तशी बर्‍यापैकिच पण तिची राहणी, वागण, आणि बोलण एक्दम डिसेंट असत. तिचा मनमोकळा स्वभाव पटकन समोरच्याला आपलस करुन घेतो. तिच पहिल प्रोजेक्ट माझ्याचबरोबर होत, त्यामुळे आमची ओळख अगदि पहिल्या दिवसापासूनची. नंतर थोड्याच दिवसात तिची अजितशीपण ऒळख झाली. शीला आमच्या ग्रुपमध्ये कधी मिक्स झाली ते कळलच नाहि. रोज लंचला जाण, सिनेमा पाहण ह्या गोष्टि तर नेहमीच्याच झाल्या.

मी आजही तो दिवस विसरू शकणार नाहि जेव्हा अजीतनी मला त्याच्या लग्नाची गोड बातमी दिली होती. तो जाम खुश होता, म्हणाला चल तुला हॉटेलमध्ये दारू पाजतो. अजीतच ज्या मुलीशी लग्न ठरल होत त्या मुलीच नाव गीता होत आणि ती त्याच्या गावाकडची होती. त्याने मला तिचा फोटोहि दाखवला होता. मुलगी दिसायल छान होती. फोटोवरून एक्दम साधी वाटत होती, सलवार कमीज आणि त्यावर गळाभर ओढणी. मला थोड आश्चर्यच वाटल होत, लहानपणापासून शहरी वातावरणात वाढलेल्या ह्या अजीतन गावात वाढलेल्या मुलीला कसा काय होकार दिला. त्याला विचारल्यावर ऊत्तर मिळाल की हि त्याच्या आई वडिलांची इच्छा आहे. मग मी विचारल तुझी इच्छा काय आहे तर मला म्हणाला त्याला हे आजुनहि माहित नाहि कि त्याची इच्छा काय आहे. थोड्याच दिवसात अजीत आणि गीताचा साखरपुडाहि झाला. मी पण तिथे हजर होतो, गीता फोटोत जशी दिसत होती त्याहिपेक्षा जास्त सुंदर वाटत होती. अजीतच्या वडिलांनी साखरपुडा अगदि जोरात म्हणजे हॉल घेऊन केला होता. बरेच लोक उपस्थित होते. गीताकडचे मात्र अगदि थोडे म्हणजे जवळचे लोकच ऊपस्थीत होते. पण साखरपुडा एक्दम छान पार पडला. मुख्य म्हणजे साखरपुड्याच गिफ्ट म्हणून अजीतनं गीताला एक मोबाईल फोन दिला होता अर्थात त्याकरता अजीतच्या वडिलांनी गीताच्या वडिलांची परवानगी घेतली होती.

मग काय लगेच दुसर्‍या दिवसापासूनच अजीत आणि गीताच्या फोनवरून तासनतास गप्पा सुरु झाल्या. पहिले काहि दिवस सगळं छान चालु होत, पण पुढे अजीतला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवु लागली आणि ती म्हणजे दोघांची असलेली भिन्न विचारसरणी. ह्याच काळात शीलानी पण आमचा ग्रुप जॉईन केला होता. मला आठवतय कि जेव्हा शीलाला अजीतच्या लग्नाची बातमी कळली तेव्हा तिने जबरदस्तीने त्याच्याकडुन पार्टिसुध्दा घेतली होती. पण जसे दिवस जात होते तशी एक गोष्ट माझ्या लक्षात येत होती कि अजीत गीतापासून दूर जात होता. त्यामुळेहि असेन कदाचीत पण त्याची शीलाबरोबर जवळिक वाढत चालली होती जी मला सुध्दा कुठेतरी मनातुन सलत होती. कदाचीत शीला मला सुध्दा आवडायला लागली होती.

आणि तो दिवस आला, साधारण रात्री दहा वाजता अजीतनं मला फोन केला आणि लगेच हॉटेल शिवसागरला भेटायला बोलावल, खूप महत्वाच बोलायच आहे म्हणाला. मी लगेच शिवसागरला पोहोचलो, आमच्या नेहमीच्या टेबलवर अजीत बसला होता. खूप खूश दिसत होता. मी त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसलो तस त्याने लगेच वेटरला आमच्या नेहमीच्या ब्रॅडची बिअर ऑर्डर केली. मग माझ्याकडे मोठ्या आनंदि भावमुद्रेने पहात तो म्हणाला कि तो लवकरच लग्न करणार आहे, मी म्हटल हो लवकर म्हणजे तरी चार महिने आहेत आजून तुझ्या लग्नाला, एक मोठा सुस्कारा देत तो म्हणाला ते लग्न होण आता शक्य नाहि. मी नुसताच त्याच्याकडे बघत बसलो राहिलो, एव्हाना बिअरपण आली होती. त्याने बिअरचा एक सीप घेत म्हणाला मी आणि शीला पुढच्या महिन्यात लग्न करत आहोत. मी एक्दम सुन्न झालो, म्हणजे मला जे वाटत होत तेच झाल. मला त्याच्या ह्या बातमीन मनातुन खूप दुख झाल होत. मी काहिहि प्रतिक्रिया न देता बिअरचा ग्लास उचलला आणि एक मोठा घोट घेतला. अजीत माझ्याकडे बघत म्हणाला तुला हि बातमी ऐकुन आनंद नाहि झाला? तेव्हा उसनं हसु चेहर्‍यावर आणत मी त्याच अभिनंदन केल. पण मग गीताच काय? मी त्याला लगेच प्रतीप्रश्न केला. त्यावर तो म्हणाला आठवतय जेव्हा गीताशी माझ लग्न ठरल होतं तेव्हा तु मला विचारल होतस कि तुझी इच्छा काय आणि मी म्हणालो होतो कि ते मलाच माहित नाहि. पण आता मला ते कळल आहे कि माझी इच्छा हि शीलाच आहे. मी काहिच बोललॊ नाहि, पुढे तासभर तो शीला हि गीतापेक्षा कशी वेगळि आहे हे सांगत होता, पण माझ मन थार्‍यावर नव्हतच ते कुठेतरी दुसरीकडेच भरकटल होत. मला आठवतय त्या रात्री मी नीट झोपलोपण नव्हतो कारण कुठेतरी माझ्यापण एकतर्फि प्रेमाचा अंत झाला होता.

काहि दिवसातच अजीतच गीतशी ठरलेल लग्न मोडल्याची ऑफिशिअल बातमी आली. अजीत एकदा माझ्या घरी आला तेव्हा त्याच्या हातात एक छान डिझाईन पेपरनी गीफ्ट रॅप केलेला बॉक्स होता. त्याने तो माझ्यासमोर ऊघडला तर त्यात त्याने गीताला भेट म्हणुन दिलेला मोबाईल होता. आतमध्ये एक चिठ्ठिपण होती त्यात सुंदर हस्ताक्षरात लिहिल होत "तुम्हि दाखवलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद.". पुढे गीताच काय झाल काहिच कळल नाहि. नंतर महिनाभरातच अजीत आणि शीलाच लग्न झाल मी आणि धीरज साक्षीदार म्हणुन ऊपस्थीत होतो. लग्नानंतर दोघे त्यांनी भाड्याने घेतलेल्या घरात रहायला गेले कारण गीताशी लग्न मोडल्यावर अजीतच्या वडिलांनी त्याला आपल्या घराचा दरवाजा दाखवला होता.

आता दोन वर्ष झाली अजीत आणि शीला अगदि सुखाने संसार करत आहेत. आमच्या तिघांची मैत्रीपण पूर्वीइतकिच गाढ आहे पण तरी माझ्या मनात नेहमी एक विचार येतो कि ह्या सगळ्या प्रकरणात दोष कुणाचा? आपल्या वडलांच्या ईच्छेखातर गीतासारख्या साध्या मुलीच्या आय़ुष्याशी खेळणार्‍या अजीतचा, का शहरी वातावरणात वाढलेल्य अजीतला होकार देऊन नाकापेक्षा जड मोती घालण्याचा प्रयत्न करणार्‍या गीताचा. अजीतच लग्न ठरल आहे हे माहित असूनहि त्याच्याशी प्रेमविवाह करणार्‍या शीलाचा, का काहिहि न बोलता शीलावर एकतर्फि प्रेम करणार्‍या माझा. सगळेच प्रश्न अनुत्तरीत...

२ टिप्पण्या:

  1. तुम्ही हा ब्लोग पोस्ट केला खरा पण जर तुमचा मित्र अजीत ह्याने जर हा वाचला तर .....................??

    उत्तर द्याहटवा
  2. ani tyahi peksha jar sheela ne vachala tar teech kay hoil.....???

    उत्तर द्याहटवा

प्रतिक्रिया नोंदवा