पुढेचे चार पाच दिवस नीना आपल्या नेहमीच्या कामात खूपच व्यस्त होती, त्यामुळे ती परवाचा तो प्रसंग बर्यापैकी विसरून गेली होती. शनिवारी हाफ डे असल्यामुळे ती ऑफिसमधुन लवकर निघाली. जयाबरोबर थोड शॉपिंग करून ती दादरला ठाणे लोकलमध्ये चढली. गाडिलापण रोजच्यापेक्षा गर्दि कमी होती, कुर्ल्यापर्यंत तर तिला छान विंडोसीट पण मिळाली. एक डुलकी घ्यावी म्हणुन तिनं डोळे मिटले, पण थोड्याच वेळात तिला दचकुन जाग आली. तिन खिडकितुन बाहेर पाहिल तर मुलुंड आल होत. सहजच तिच लक्ष समोरच्या त्या बाकड्याकडे गेल आणि ती स्तंभीत होऊन बघतच रहिली. बाकड्यावर त्या परवाच्याच तिच्या सासुबाईंसारख्या दिसणार्या बाई बसल्या होत्या. आजपण त्यांनी नीनाला छान गोड अस स्मित हास्य दिल. नीना नुसतीच डोळे विस्फारुन त्यांच्याकडे पहात राहिलि, पण नीना काहि करायच्या आतच गाडि सुरु झाली. ती खिडकितुन वाकुन वाकुन बाकड्यावर बसलेल्या त्या बाईंकडे बघायला लागली. जया हे सगळ पहात होती, तिन नीनाचा हालवल तस नीनान दचकुन तिच्याकडे पाहिल. जया नीनाला म्हणाली "नीना, काय झाल गं, त्या रीकाम्या बाकड्याकडे अस वाकुन वाकुन का पहात होतीस?" नीना अवाक होऊन नुसतीच जयाकडे बघत राहिली.
दुसर्या दिवशी संध्याकाळी नीना आणि सुजीत संदेशला घेऊन बागेत गेले. बागेत थोड खेळल्यावर, संदेशनी आकाश पाळण्यात बसण्याचा हट्ट केला, पहिल्यांदा नीनाने भीती वाटते अस कारण सांगुन आकाश पाळण्यात बसायला नकार दिला. पण तिला संदेश आणि सुजीतचा अग्रह मोडता आला नाहि. ते तिघहि मोठ्या मजेत आकाश पाळण्यात बसले. पाळणा सुरु झाला, संदेश तर बेहद खूश होता, आपल्या बाबाच्या मांडित बसुन तो आकाश पाळण्याची मजा लुटत होता. नीना पण आधी थोडि घाबरली होती पण नंतर तिला मजा यायला लागली होती. जेव्हा पाळणा एक्दम वर गेला तेव्हा नीनान सभोवार पाहिल वरुन बाग खूपच सुंदर दिसत होती. सभोवार बघता बघता तिच लक्ष खालच्या पटागणाकडे गेल, आणि खालच ते द्रुश्य पाहुन तिच्या चेहर्यावरचे भावच बदलले. तिच्या चेहर्यावर एक वेगळिच भीतीची रेषा उमटली. खाली पटांगणात तिच्या सासूसारखी दिसणारी ती बाई ऊभी असलेली तिला दिसली. त्या नीनाकडेच पहात होत्या, जस नीनानी त्यांच्याकडे पाहिल तस त्यांनी नेहमीप्रमाणे तिला गोड स्मित हास्य दिल. जसा पाळणा खाली येत होता तसा त्या बाईंचा चेहरा नीनाला अगदि स्पष्ट दिसत होता, त्या अगदि हुबेहुब तिच्या सासुबाईंसारख्याच दिसत होत्या किंबहुना त्या तिच्या सासुबाईच होत्या. पाळणा जसा एकदम खाली आला तसा त्या बाई नीनाला काहितरी सांगायचा प्रयत्न करु लागल्या पण त्या काय बोलत आहेत हे नीनाला काहिच कळत नव्हत त्यांचा आवाज एक्दम धुसर येत होता. नीनानी सुजीतकडे पाहिल तर तो आणि संदेश बाहेरची गंमत बघण्यात व्यस्त होते. पाळणा परत हळुहळु वर जाऊ लागला नीनाला आता चांगलाच घाम फुटला होता. तिच्या पोटात भीतीचा गोळा आला होता, ’हा भास नक्किच नाहि’ तिन मनाशी विचार केला आणि सुजीतला हाक मारली. ती सुजीतला खाली बोट दाखवत म्हणाली "सुजीत त्या बघ आई, तिथं ऊभ्या आहेत." सुजीतन ती बोट दाखवत होती त्या जागी पाहिल तर तिथ कुणीच नव्हत. नीना काय बोलत आहे हे त्याला काहिच कळत नव्हत तो एकदम चक्रावुन गेला होता. त्यान नीनाकडे पाहिल ती खूप घाबरली होती, ती परत सुजीतला म्हणाली, "सुजीत, त्या मला काहितरी सांगायचा प्रयत्न करत आहेत." सुजितन खाली येताच पाळणा थांबवायला सांगीतला. तिघहि खाली ऊतरले, नीना धावतच मगाशी तिच्या सासुबाई उभ्या होत्या त्या जागी गेली पण तिथं कुणीच नव्हतं. तिन घरी येताच सुजीतला आतापर्यंत घडलेल्या सगळ्या घटना सांगीतल्या, पण सुजीतन तिला कदाचीत हे सगळे भास असतिल अस समजावण्याच प्रयत्न केला. पण नीनाच मन हे मानायला तयार नव्हत.
पुढिल भाग लवकरच ...
hi ! nice story i like this ple. send my account next epsoid my account
उत्तर द्याहटवाtejkaran.jadhav@gmail.com