गुंफण - भाग २

पूर्वसुत्र

पुढचे तीन दिवस सगळ सुरळित चालल होतं पण हे कायमच नव्हत. बुधवारी रात्री नीना नेहमीप्रमाणे किचनमधलं काम आवरुन बेडरुममध्ये झोपायला गेली. संदेश अधीच झोपी गेला होता. सुजीत कुठल तरी पुस्तक वाचत होता, नीना त्याच्या बाजुला बसली आणि त्याच्या खांद्यावर डोक ठेवत म्हणाली.
"काय असेल रे हे सगळ?"
"नीना.. अग काहि नाहि ग होतत असे भास कधी कधी"
"माझ्यावर विश्वास ठेब सुजीत मला खरच आई दिसतात. हा भास नाहि."
सुजीतनं हातातल पुस्तक बंद केल आणि तिला जवळ घेत म्हणाला.
"नीना माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे गं, पण तू जे काहि सांगते आहेस ते कस शक्य आहे. बर विश्वास जरी ठेवायचा म्हंटला तरी मला सांग आई फक्त तुलाच का दिसते? तिन तर तुला कधी पाहिलदेखिल नाहि. मी तिचा मुलगा आहे म्हणजे खरतर ती मला दिसली पाहिजे. मला अस वाटत नीना कि मागच्या आठवड्यात मामा आला होता आणि त्यान तुला आई बद्दल ज्या काहि गोष्टि सांगितल्या त्या कुठे तरी तुझ्या मनात घर करून राहिल्यात, अणि म्हणुनच असेल कदाचित तुला असे भास झाले असतिल."
नीना त्याच्यापासून थोड दुर जात म्हणाली.
"सुजीत अरे हा भास कसा काय असु शकतो?"
"मला एक सांग मागच्या तीन दिवसात आई तुला दिसली का?" नीनान नकारार्थी मान हलवली.
"नीना आता ह्या गोष्टिचा जास्त विचार करु नकोस. माझ्याकडे बघ. हे बघ कधी कधी आपल्या मनातले विचार आपल्याला स्वप्न किंवा भास यातुन दिसतात. आता खूप रात्र झाली आहे आपण झोपुया." अस म्हणुन तो झोपी गेला. नीना थोडा वेळ तशीच बसून राहिली, मग थोड्याच वेळात ती पण झोपी गेली.
मध्यरात्री नीनाला अचानक जाग आली तिचा घसा कोरडा पडला होता. तिन टेबलावर ठेवलेली पाण्याची बाटली ऊचलली तर त्यातल पाणी आधीच संपल होत. ती बिछान्यावरून ऊठली आणि बेडरूमचा दरवाजा ऊघडुन बाहेर हॉलमध्ये आली आणि किचनकडे पाहिल तर किचनमधला लाईट चालु होता, तिला जरा आश्चर्यच वाटल ’अरे मी तर झोपायला जायच्या आधी हा लाईट बंद केला होता, मग परत चालु कोणी केला. का मीच तो लईट बंद केला नव्हता जाऊदे जास्त विचार नको.’ अस स्वताशीच म्हणत ती किचनच्या दरवाजाशी आली. तिन किचनमध्ये पाहिल आणि समोरच द्रुश्य पाहुन ती जोरात किंचाळलीच. तिच्या तोंडातुन काहि शब्दच फुटत नव्हते ती भीतीन प्रचंड थरथर कापत होती, ती फक्त एवढच बोलु शकली "त...त...तुम्हि?". आणि दुसर्‍याच क्षणाला नीना चक्कर येऊन धाडकन जमिनीवर कोसळली.

नीनाची किंचाळि ऐकुन सुजीत धावतच बाहेर आला, किचनच्या दाराशी बेशुध्द अवस्थेत पडलेल्या नीनाला पाहुन तो एक्दम गांगरुनच गेला. त्यानं नीनाला चटकन ऊचलल आणि हॉल मधल्या सोफ्यावर झोपवल. तिच्या तोंडावर थोड पाणी शिंपडल, तशी तिला शुध्द आली. ती शुध्दिवर येताच ती सुजीतला घट्ट बिलगली. सुजीतन हळुवार तिच्या पाठिवरुन हात फिरवत तिला विचारल.
"नीना तू ठिक तर आहेस ना? आणि तू अशी चक्कर येऊन कशी पडलीस?"
"त्या...त्या... परत आल्या होत्या, किचनमध्ये डायनींग टेबलच्या खुर्चीवर बसल्या होत्या." ती परत थरथर कापायला लागली.
"नीना.... ते कस शक्य आहे आईला जाऊन आज दहा वर्ष झालीत आणि मी स्वता तिचे अंत्यसंस्कार केलेत. ती कशी परत येईल? आता हे बस्स झाल"
"सुजीत.. माझ्यावर विश्वास ठेव, मला त्त्या दिसतात. तोच चेहरा, तेच हास्य, त्या मला काहितरी सांगायचा प्रयत्न करत असतात पण त्यांचा आवाज एक्दम धुसर येतो."
सुजीत काहिच बोलला नाहि.
"सुजीत, काहि तरी बोल ना. मला खूप भीती वाटते रे. हे असच जर चालु राहिल तर मला वेड लागेल."
"नीना, तुला तस काहिहि होणार नाहि" आणि सुजीतन नीनाल घट्ट आपल्या मिठित घेतल.
मग तिला थोड शांत वाटल्यावर त्यान नीनाला प्यायला पाणी दिल. मग तो तिला बेडरुमपर्यंत घेऊन गेला. सुजीतन बाजुला संदेशकडे पाहिल तर तो अगदि शांतपणे झोपला होता. मग नीना झोपेस्तोपर्यंत तो तिच्या उशाशीच बसून राहिला. थोड्याच वेळात नीना झोपली, सुजीत तिच्या चेहर्‍याकडे पहात होता, तिच्या केसातन हात फिरवत त्याच्या मनात विचार आले ’हे काय चाललय! हि अशी का वागतेय? खरच तिला आईच भूत वगैरे दिसत असेन का? कि हा नुसता तिच्या कल्पनेचा खेळ असेल? कल्पनेचा खेळ असेल तर ती अशा व्यक्तीची कल्पना का करते जीला ती कधीच भेटली नव्हती. छे काहि डोकच चालत नाहि. आय मस्ट कंन्सल्ट सायक्रायटिस्ट’ तो बराच वेळ तसाच तिच्या ऊशाशी बसून विचार करत होता.

दुसर्‍या दिवशी जेव्हा नीनाला जाग आली तेव्हा तिच अंग खूप दुखत होत, डोक खूप जड झाल्यासारख वाटत होत, तिला फणफणुन ताप पण भरला होता. तिन तिचे डोळे ऊघडले तर तिला आश्चर्याचा धक्काच बसला. तिच्या ऊशाशी तिची आई बसली होती, ती नीनाच्या कपाळावर मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवत होती. समोर अप्पा म्हणजे नीनाचे वडिल आणि सुजीत उभे होते. सगळ्याना आपल्या भोवती बघुन ती चटकन ऊठुन बसली.
"तुम्ही सगळे असे इथे का जमला आहात? आई, अप्पा तुम्हि कधी आलात?"
"नीना.. जास्त प्रश्न विचारु नकोस. तु आता आराम कर. आम्हि आज सकाळीच आलो." नीनाची आई तिला म्हणाली.
"आता कस वाटतय नीना?" सुजीत तिच्या जवळ आला आणि तिचा हात हातात घेत म्हणला.
"आता ठिक वाटतय, पण डोक खूप जड वाटतय." नीना त्याला म्हणाली.
"काल रात्री त्या प्रसंगानंतर तू झोपलीस पण सकाळी तु रोजच्या वेळेस ऊठली नाहिस म्हणुन मी तुला ऊठवायला आलो तर तू परत बेशुध्द झाली होतीस, तुझ अंग तापानी फणफणत होत..मग मी डॉ. कदमना घरीच बोलावल. त्यानी तुला इंजेक्शन दिल, ते म्हणाले घाबरण्याच काहि कारण नाहि. कुठलातरी मानसिक धक्क्यानं अस झालय. मग मी आई अप्पांना पण बोलावुल घेतलं. "
"आणि संदेश? तो कुठे आहे?" नीना शोधक नजरेने सभोवार पहात म्हणाली.
"तो शाळेत गेलाय. मी त्याला मगाशीच सोडुन आलो" नीना परत डोळे मिटुन पडुन राहिली.
दुपारी जेवताना सुजीतनं आई, अप्पाना नीनाला दिसणार्‍या त्याच्या आईबद्दल सांगीतल. नीनाची आई हे सगळ ऐकुन खूपच घाबरुन गेली.अप्पा थोडा विचार करत शांतपणे म्हणाले,
"ह्यावर आपण कहितरी केल पाहिजे."
"हो मी आज ऊद्या मध्ये डॉ. मानसी काणेंना कंन्सल्ट करणार आहे. त्या एक निष्णात सायक्रायटिस्ट आहेत" सुजीतन त्या दोघांसमोर आपला विचार मांडला.
"पण..पण.. माझी नीना वेडि नाहि रे!" नीनाच्या आईला आपल्या डोळ्यातले आश्रु आवरता आले नाहित.
"आहो आई सायक्रायटिस्ट म्हणजे वेड्यांचा डॉक्टर नाहि. मला फक्त माझी नीना बरी झालेली पाहिजे" सुजीत समजावण्याच्या सूरात म्हणाला.

संध्याकाळि नीना बेडरूममध्ये चहा बिस्किट खात होती, सुजीत आणि अप्पा संदेशला घेऊन बाहेर गेले होते, आणि नीनाची आई किचनमध्ये रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती. तेवढ्यात तिला बेडरूममधुन नीनाच्या ओरडण्याचा आवाज आला, तशी ती धावतच बेडरूममध्ये गेली नीना खूपच घाबरली होती, ती त्या समोरच्या खुर्चीकडे घाबरून पहात होती आणि तोंडानी पुटपुटत होती ’क...क....काय पाहिजे तुम्हाला?’. नीनाच्या आईला क्षणभर काहि कळतच नव्हत, ती नीनाला हालवत म्हणाली.
"नीना काय बोलतेस हे? कोण आहे तिथे?"
नीनानी परत त्या खुर्चीकडे पाहिल तर ती खुर्ची रीकामी होती.
"अग आई त्या... त्या... आता समोर त्या खुर्चीवर बसल्या होत्या ग."
"बर ठिक आहे बेटा तू आता आराम कर. सगळ ठिक होईल. मी तुला काहि तरी खायला आणते तु थोड खाऊन घे म्हणजे तुला बर वाटेल."
"नाहि तू कुठेहि जाऊ नकोस त्या येतीलच परत म्हणंजे तुला पण दिसतील."
"बर" अस म्हणत त्यांनी नीनाच डोक आपल्या मांडिवर ठेवल, तिच्या डोक्यावरुन हात फिरवत देवाच स्तोत्र म्हणु लागल्या.
आईच्या मांडित नीनाला बर्‍याच दिवसांनी शांत झोप लागली होती.

पुढिल भाग लवकरच...

२ टिप्पण्या:

प्रतिक्रिया नोंदवा