गुरुवारचा सगळा दिवस भास अभासां मध्येच गेला, नीनाची प्रकृती पहिल्यापेक्षा जास्तच खालावली होती. तिच्या डोळ्याखाली काळि वर्तुळ जमायला लागली होती. ती मध्येच घाबरुन ओरडायला लागे किवा एकटिच काहितर बडबड करत असे. नीनाची हि अशी अवस्था पाहुन, रात्री सुजीतन निर्णय घेतला कि उद्या सकाळी नीनाला डॉ. मानसी काणेंकडे घेऊन जायचच. नीनाच्या आईन पण त्याला दुजोरा दिला, तिच म्हणण फक्त एवढचं होत कि काहिहि करा पण नीनाला ह्यातुन बरी करा. अप्पा मात्र काहि तरी वेगळाच विचार करत होते. दुसर्या दिवशी सकाळि सुजीत आणि नीना डॉ. काणेंकडे गेले. त्या नीनाशी खूप अपुलकिनं बोलल्या. त्यांनी नीनाला गेले काहि दिवस तिच्या आयुष्यात जे काहि घडत आहे त्यावर आपला पूर्णपणे विश्वास असल्याचं पटवुन दिल. त्यांनी नीनाशी बराच वेळ मनमोकळ्या गप्पा मारल्या. नीनाला पण खूप छान वाटल, थोड मन हलक झाल्यासारख वाटल. नीनाशी बोलुन झाल्यावर डॉक्टरांनी प्रथम दर्शनी हे सगळे भास आहेत असच सांगीतलं अणि त्यावर उपचार सुरू केले.
इथे अप्प्पांनी त्यांची धाकटि बहिण म्हणजे नीनाची आत्या सुरेखाला बॅंगलोरला फोन लावला. सुरेखा साधारण अप्पांपेक्षा दोन वर्षांनी लहान असेन. सुरेखानं मंत्र, तंत्र, आणि उपचार ह्या विषयावर बरच रीसर्च केल होत. तिची ह्या विषयावरची काहि पुस्तक पण प्रसिध्द होती. तिचे पती सुरेश हे एक फॉरेस्ट ऑफिसर होते, त्यामुळे त्यांच्याबरोबर सुरेखाच पण बर्याच जंगलातुन फिरण झाल होत ज्याची तिला तिच्या रीसर्चमध्ये खूपच मदत झली होती. आता सुरेश रीटायर्ड होऊन बॅंगलोरला स्थायीक झाले होते. अप्पांनी सुरेखाला नीनाला दिसणार्या तिच्या मृत सासूबाईंपासून ते तिच्या डॉ. काणेंबरोबरच्या भेटिबद्दल सगळ्या घटना सांगीतल्या. सुरेखानं सगळ्या घटना अगदि लक्षपूर्वक ऐकल्या. तिन त्यांना नीनाला ह्यातुन बर करण्याचा प्रयत्न करेन अस अश्वासन दिल.
दुसर्या दिवशी म्हणजे शनिवारी पहिल्या फ्लाईटनी आत्या पुण्यात पोहोचली ते थेट नीनाच्या घरी. तिन नीनाची अवस्था पाहिली आणि तिला खूप वाईट वाटल, नीना तिची लाडकि भाची होती. नीनालापण आत्याला पाहुन खूप बर वाटल, तिच्या डोळ्यतुन एकदम अश्रु वाहु लागले. आत्यानं तिचे अश्रु पुसले मग तिच्या डोक्यावरुन हात फिरवत तिला म्हणली.
"आता मी आले आहे ना सगळ काहि ठिक होईल."
तिन नीना अणि तिच्या आईशी बराच वेळ गप्पा मारल्या. थोड्यावेळानी सुजीतपण आला आत्याला पाहुन त्यला पण खूप आनंद झाला. तोहि त्यांच्याबरोबर गप्पांमध्ये सामील झाला. दोघ त्यांना संदेशच्या गमती जमती सांगत होते. बोलता बोलता नीना अचानक स्तब्ध झाली, तिचा चेहरा एकदम गंभीर झाला होता, ती दरवाजाकडे एकटक नुसतीच पहात होती. तिच्या चेहर्यावर एक वेगळिच भीतीची रेषा उमटली होती. तिला दरदरुन घाम फुटला होता. नीनाच्या आईन तिला हलवुन शुध्दिवर आणल. आत्यानं नीनाला विचारल.
"काय ग नीना त्या दरवाजाकडे अशी एक्टक काय पहात होतीस?"
नीनान सुजीतकडे पाहिल आणि आत्याला म्हणाली.
"काहि नाहि असच, जरा तंद्रि लागली होती"
"ठिक आहे." अस म्हणत अत्यान जाणीवपूर्वक तो विषय बदलला.
दुपारच्या जेवणानंतर आत्या, अप्पा आणि सुजीत बाहेर हॉलमध्ये गप्पा मारत बसले होते.. गप्पांच्या ओघात आत्यान विषयाला हात घातला. सुजीतनपण आत्याला अतापर्यंत जे काहि घडल ते सविस्तर सांगीतल. थोडा विचार करुन आत्या त्याला म्हणाली.
"तुम्हि दोघ इतक्यात कुठं बाहेर गेला होतात? म्हणजे कुठे आऊट ऑफ स्टेशन?"
"नाहि" सुजीतन ऊत्तर दिल.
"एक विचारू मी नीनाच्या डाव्या हातातल्या अनामिकेत सोन्याची अंगठि पाहिली. तू आणलीस तिला?"
"नाहि, मागच्या आठवड्यात आम्हि घरातलं कपाट आवरल होतो, तेव्हा कपाटाच्या लॉकरमध्ये दागीन्यांच्या लाकडि बॉक्समध्ये आम्हाला ती मिळाली. त्यात काहि जुने दागीनेपण होते. नीनाला ती अंगठि खूप आवडली. मला तिन विचारल मी घेऊ का तर मी तिला म्हटल हे सगळ तुझच आहे. मग तिन ती अंगठि मला घालुन दाखवली तिला ती खूप छान दिसत होती म्हणुन तिन ती घालुनच ठेवली. का तुम्हि असं का विचारलत?"
आत्या काहिच बोलली नाहि मग थोडा विचार करून ती म्हणाली
"मला तो दागिन्यांचा बॉक्स दाखवशील?"
सुजीत आत गेला आणि लॉकरमधुन तो लाकडि बॉक्स घेऊन आला. आत्यानं तो बॉक्स ऊघडला त्यात काहि जुने दागिने होते. आत्यान ते सगळे दागिने नीट पाहिले. दागिने तशे जुन्याकाळातले होते. त्यात दोन पाटल्या, एक नेकलेस, कानातल्या कुड्या, आणि नाकातली मोत्यांची नथ ह्यांचा समावेश होता. दागिने जरी जुने वाटत असले तरी आजुनहि त्यांना छान चकाकि होती. तिन तो बॉक्स बंद केला अणि बॉक्सच सगळ्या बाजुंनी नीट निरीक्षण केल. मग तिनं तो बॉक्स ऊलटा केला, बॉक्सच्या खालच्या बाजुला एक सरकणारी पट्टि होती. तिनं ती हळुच बाजुला केली तर आत अजुन एक कप्पा होता. सुजीत हे सगळ आश्चर्यानं पहात होता, तो आत्याला म्हणाला
"मी हा बॉक्स लहानपणापासून पहातो आहे पण मला हा गुप्त कप्पा पहिल्यांदाच कळला." आत्यानी फक्त त्याच्याकडे पाहुन एक स्मित हास्य दिल.
त्या कप्प्यात विषेश अस काहिच नव्हत फक्त एक डायरी होती. तिन ती डायरी बाहेर कढली, डायरी खूपच जुनी वाटत होती. तिची पान पण बर्यापैकि जीर्ण झाली होती. तिन ती डायरी अगदि काळजीपूर्वक ऊघडली. त्यात प्रत्येक पानावर अत्यंत सुंदर हस्ताक्षरात लिहिलेल्या कविता होत्या आणि प्रत्येक कवितेच्या खाली ’मालती’ अस लिहिल होत.
"सुजीत, तुमच्या घराण्यात कोणी मालती म्हणुन बाई होत्या का?"
"मालती... अस कोणी मला तरी माहित नाहि पण माझ्या आईच माहेरच नाव मालती होत."
आत्यान ती डायरी सुजीतला दिली आणि त्याला विचारल
"हे हस्ताक्षर तुझ्या आईच आहे?"
"हो हे तर माझ्या आईचच हस्ताक्षर आहे. पण माझी आई, कविता करायची?" तो आश्चर्यान त्या डायरीकडे पहात होता.
"मी हि डायरी जरा वाचायला घेतली तर चालेल?"
"हो नक्किच."
अत्यानी सुजीतला ती दागीन्यांची बॉक्स परत आत लॉकरमध्ये ठेवायला सांगीतली.
त्यादिवशी रात्री आत्यान त्या डायरीतल्या सगळ्या कविता वाचल्या पण एका कवितेने तिच लक्ष विषेश वेधुन घेतलं. आत्यान ती कविता चार पाच वेळा लक्षपूर्वक वाचली. मग डायरी बंद करुन स्वताशीच हासली जणू तिला ह्या सगळ्या घटनांच गुढ उकललं होत.
पुढिल भाग लवकरच...
Next part awaited..........
उत्तर द्याहटवा