दुसर्या दिवशी रवीवार असल्यामुळे घरातले सगळेजण निवांत होते. साधारण सकाळचे आठ वाजले असतील, सुजीत हॉलमध्ये पेपर वाचत बसला होता. संदेश आणि अप्पा खाली गार्डनमध्ये फिरायला गेले होते. नीनाची आई किचनमध्ये नाश्त्याची तयारी करत होती. आत्या नेहमीप्रमाणे सकाळच योगा अटोपुन नीनाच्या बेडरूममध्ये गेली. नीना आजुनहि झोपली होती. ह्या आजारपणामुळे हल्ली सुजीत तिला सकाळी लवकर उठवत नसे. आत्या नीनाच्या उशाशी बसली, तिनं नीनाच्या चेहर्याकडे पाहिल, खूपच क्षीण झाल्यासरखी वाटत होती ती, तिच्या डोळ्याभोवतीची काळी वर्तुळ अधिकच गडद झाली होती, चेहरा खूपच ऒढल्यासारखा वाटत होता. झोपेतसुध्दा तिच्या चेहर्यावर असलेली भीती स्पष्ट दिसत होती. आत्यान ह्ळुच तिचा डावा हात हातात घेतला आणि अनमिकेतल्या त्या सुंदर अंगठिकडे पाहिल. त्या अंगठिच नीट निरीक्षण करुन तिन ती अंगठि तिच्या बोटातुन हळुच काढुन घेतली. जशी तिन ती अंगठि काढली तस नीनानी एकदम डोळे ऊघडले आणि एखादा झटका लागल्यासारखी ती ऊठुन बसली. क्षणभर तिला काहिच कळत नव्हत कि ती कुठे आहे ते. तिन बाजुलाच बसलेल्या आत्याकडे पाहिल, आणि तिला जर हायस वाटलं.
"नीना! ठिक तर आहेस ना?" आत्यान तिच्या डोक्यवरुन हात फिरवत तिला विचारल.
"हं... हो, पण कहि कळत नाहि काय होतय ते, डोक किंचीत दुखतय. अचानक डोक्यावरच मोठ ओझ खाली ठेवल्यावर कस हलक वाटत ना तसच काहिस वाटतय. काहिच कळत नाहिए हे अस काय चाललय ते" नीना अगदि अगतीकपणे आत्याला म्हणाली.
"ठिक आहे! तु थोडावेळ पडतेस का? नाहितर उठुन आवरुन घे म्हणजे तुला कहितरी खाता येईन."
"नको मी थोडावेळ आजुन पडते, माझ्यात उठायच त्राणच वाटत नाहिए."
"ठिक आहे." अस म्हणुन आत्यान तिच्या अंगावर पांघरुण घातल. पुढे थोडावेळ ती तशीच तिच्या उशाशी बसून राहिली. नीना परत झोपी गेल्यावर आत्या बेडरुमचा दरवाजा उघडुन बाहेर गेली. बाहेर येऊन तिन ती अंगठि सुजीतला देत म्हटल
"सुजीत हि अंगठि परत त्या दागिन्यांच्या लाकडि बॉक्समध्ये ठेवुन दे" सुजीतन प्रश्नार्थक नजरेने आत्याकडे पहात विचारल.
"म्हणजे.. मला काहि कळल नाहि. हि आंगठि परत त्या दागिन्यांच्या डब्यात... पण का?"
"सांगते वेळ आली कि सगळ सागेन."
त्यादिवशी नीना दुपारी उशीरापर्यंत झोपली होती, आत्याच्या सांगण्यावरुन घरच्यांनीपण तिला डिस्टर्ब केल नाहि. साधारण दुपारी दोन वाजता नीना बेडरुमचा दरवाजा ऊघडुन बाहेर हॉलमध्ये आली. तिथं सुजीत, नीनची आई, आप्पा, आणि आत्या गप्पा मारत बसले होते. संदेश टिव्हिवर कुठलतरी कार्टुन पहात बसला होता. नीनाला पाहुन संदेश धावत तिच्या जवळ गेला आणि ’आई’ अस म्हणुन तिला बिलगला. नीनानपण त्याला जवळ घेतल, त्याच्या गालावर पापी घेऊन सोफ्यवर सुजीतच्या बाजुला येऊन बसली.
"कस वाटतय नीना आता?" सुजीतन तिची चौकशी केली..
"चांगल वाटतय. खूप हलक हलक झाल्यासारख वाटतय. आता डोक पण दुखत नहिये." नीनाच्या चेहर्यावर बर्याच दिवसानी ऊत्साह आल्यासारखा वाटत होता.
"आजुनहि तुला अस काहि वाटत का कि तुझ्या सासुबाई इथेच कुठे तरी आहेत? जस तुला गेले काहि दिवस जाणवत होत" आत्यान नीनला विचारल. नीनान घाबरतच हॉलच्या चोहोबाजुला नजर फिरवली.
"नाहि... मला असं काहिच जाणवत नाहिये." नीनाच्या आवाजात आत्मविश्वास वाटत होता.
"आत्या, तुम्हि मला आज सकाळी अंगठि परत दागिन्यांच्या बॉक्समध्ये ठेवायला सांगीतली, त्याचा आणि नीनाच्या आजारपणाचा काहि सबंध?" सुजीतन गंभीर होत अत्याला विचारल.
"हो... त्याचा आणि नीनाच्या आजारपणाचा खूप महत्वाचा सबंध आहे. काल रात्री आपल्याला त्या दागिन्यांच्या पेटित हि डायरी सापडली होती." तिन ती डायरी सुजीतला देत म्हंट्ल.
"तर ह्या डायरीत तुझ्या आईनं लिहिलेल्या कविता आहेत, कवितेच्या खाली ’मालती’ अशी स्वाक्षरी आहे, त्यावरुन त्यांनी ह्या कविता त्यांच्या लग्नाआधी लिहिल्या असाव्यात. मी त्यातल्या काहि कविता वाचल्या, खूपच सुंदर आहेत त्या कविता. पण त्यातली ’गुंफण’ अस शिर्षक असलेली एक कविता जरा वेगळि वाटली. हि कविता मालतीन त्या अंगठिवर रचली होती. मी ती कविता तीन, चार वेळा वाचली तेव्हा मालतीला हि अगठि किती जिव्हाळ्याची होती हे लक्षात आल. कवितेत मालती सांगते कि हि आंगठि तिच्या आईची होती, मालती लहान असतानाच तिच्या आईच निधन झाल, पण मरण्याच्या आधी तिन मालतीला हि आंगठि भेट म्हणुन दिली होती. पुढे आईच्या मायेला पोरकि झालेल्या मालतीला हि अंगठि अगदि प्राणापलिकडे प्रिय होती, जणु ती आपल्या आईलाच त्यात पहात होती. मालतीची त्या अंगठि बरोबर एक वेगळिच गुंफण तयार झाली होती. तिच्या हयातीत तिन ती अंगठि खूप सांभाळुन ठेवली होती. कवितेतुन मला ह्या गोष्टि कळल्या. आता ह्या कवितेचा आणि मालती म्हणेजे तुझ्या आईच नीनाला दिसण ह्यांचा काहि सबंध असेन तर तो फक्त त्या अंगठिमुळेच ह्यावर माझा पक्का विश्वास बसला. त्या नीनाशी संवाद साधायचा सतत प्रयत्न करत होत्या, पण आपण ज्या जैवीक कक्षेत राहतो ती कक्षा त्यांना नीनाशी संवाद साधु देत नव्हती. म्हणजे ह्यावरुन आपण अंदाज करु शकतो कि ह्या अंगठित त्यांचे मनं किती गुंतले आहे ते. म्हणुनच जेव्हा ती अंगठि दुसर्या कोणीतरी घातली तेव्हा त्यांना त्या अंगठिच्या सुरक्षेची काळजी वाटु लागली आणि इथूनच त्यांनी नीनाचा पाठलाग सुरु केला. माझ्या मते त्या तिला ती अंगठि परत ठेऊन दे किंवा नीट वापर असे काहि तरी सांगत असाव्यात. पुढे जशी नीनाची मन:शक्ति कमकुवत व्हायला लागली तसा त्यांच्या आत्म्यानं नीनावर ताबा मिळवायचा प्रयत्न करायला सुरुवात केली जेणेक्रुन त्यांना सतत अंगठिच्या जवळ राहता येईल आणि हे साधण्यासाठि त्यंनी अंगठि हेच एक माध्यम म्हणुन वापरायला सुरुवात केली. त्यामुळे जेव्हा मी हि अंगठि नीनाच्या बोटातुन काढुन घेतली तेव्हा आपोआपच त्यांच्या आत्म्यान नीनाची सुटका केली." सगळे जण एकदम शांतपणे आत्याच बोलण ऐकत होते.
"पण नीनाच का? मी तर तिचा मुलगा मग ती मला का नव्हती दिसत? ती मलाहि ते सांगु शकली असती ना?" सुजीत आत्याकडे पाहुन म्हणाला.
आत्यान स्मित हास्य देत म्हंटल "सुजीत आत्मा नाती ओळखत नाहि रे, तो फक्त त्याच्या इच्छेत अडकलेला असतो. तुझ्या आईचा आत्मा त्या अंगठित आडकलेला आहे. आणि ती अंगठि नीनानं घातली होती. दुसरं म्हणजे आपल्याला अस वाटत कि आत्मे आपल्याला घाबरवायला येतात पण प्रत्यक्षात ते जीवीत योनीलाच जास्त घाबरत असतात. त्यामुळे कुठेल्याहि आत्म्याच एखाद्या माणसाला दिसण किंवा जवळ येण हे त्या माणसाच्या मन:शक्तिवर अवलंबुन असत. तु ती अंगठि घातली असतीस तर कदाचित त्या तुला दिसल्याहि नसत्या."
" म्हणजे आईच्या आत्म्याला आजुनहि मुक्ति लाभलेली नाहि? तो आजुनहि भटकतोच आहे?" सुजीतन काळजीच्या सुरात विचारल.
"हो त्यांच्या आत्म्याला आजुनहि मुक्ति मिळाली नाहि पण तो आत्मा भटकत नाहिए कारण त्याची ज्या वस्तूबरोबर गुंफण झाली आहे ती त्यांच्या समोरच आहे. फक्त एवढच कि त्यांना हि गुंफण सोडवता येत नाहिये आणि म्हणुनच त्यांचा आत्मा अंगठि भोवतीच घुट्मळत असतो."
आत्याच बोलणा ऐकुन सुजीत आणि नीनाच्या अंगावर काटा आला.
"पण मग ह्यातुन तिची मुक्तता कशी होणार?" सुजीतन चिंतेच्या सुरात तिला विचारल.
"ह्या ससारात प्रत्येक गोष्टिला अंत आहे सुजीत. कुठ्लीहि गोष्ट जशी क्षीण होत जाते तशी ती नष्ट होत जाते. आत्मे पण क्षीण होऊन नष्ट होतात, पण त्याला काहि ठराविक कलावधी नाहि. ते त्या आत्म्याच्या इच्छेच्या तीव्रतेवर अवलंबुन असत. त्यामुळे पहिला मार्ग म्हणजे वाट पाहणे. जेव्हा तू तुझ्या आईच श्राध्द करशील तेव्हा ती अंगठि समोर ठेव आणि ’मी ह्या अंगठिच हयात असे पर्यंत संरक्षण करेन’ अस म्हण त्यामुळे त्यांच्या आत्म्याला मुक्तिची चालना मिळेल. दुसरा मार्ग म्हणजे मंत्र, तंत्रचा उपयोग करुन आत्म्याला मुक्ति देणे शक्य आहे, पण ह्यात बराच धोका असतो कारण कधी कधी ह्याचे विपरीत परीणाम पण होतात आणि त्याचा त्रास त्या आत्म्याला आणि हे मंत्र, तंत्र कुरवुन घेणार्याला पण होतो. त्यामुळे मी तरी तुला पहिलाच मार्ग सुचविन." आत्यान आपल मत अगदि ठामपणे मांडला. सुजीतसकट सगळेच विचारात पडले. बराच विचार केल्यावर सगळ्यांनी पहिल्या मार्गानी जायच असच ठरवल.
पुढंचा संपूर्ण आठवडा नीनाच्या रिकव्हरीत गेला. आत्या मंगळवारीच बॅंगलोरला निघुन गेली. आई आणि अप्पा शुक्रवारपर्यंत नीनाकडेच राहिले होते. नीनाची तब्येत आता बरीच सुधारली होती. रवीवारी सकाळि सुजीत नेहमीप्रमणे पेपर वाचत होता, संदेश आजुनहि झोपला होता. तेवढ्यात नीनानं मस्तपैकि गरमा गरम कांदे पोहे करुन आणले. पहिला घास खाऊन सुजीत तिला म्हणाला.
"वा.... मस्त झालेत पोहे."
"हो ना आई आल्या होत्या मगाशी त्यांनीच करुन दिले आपल्या लाडक्या लेका करता." सुजीत एक्दम गंभीर चेहर्यानी नीनाकडे पाहु लागला. तस नीनानं त्याला मीठि मारली आणि म्हणाली "गंमत केली रे!" आणि ते दोघ जोरजोरात हसु लागले.
समाप्त
Sundar, pharach chan gumfali hoti katha.
उत्तर द्याहटवाAnpekshit shevat.
Pudhachya lekhanasathi Shubhechchya.
(Apologies, unable to write in Marathi)
जबरदस्त भाऊ. मी सगळे भाग एकत्र वाचले म्हणून आत्ता कॉमेंट देतोय. खूप आवडली कथा. असेच उत्तम कथा देत रहा आम्हाला!
उत्तर द्याहटवाKhoop mast aahe kathaa..
उत्तर द्याहटवाSagale bhaag ektrach vaachale...!!! kharech chaan aahe khoop..!!
Mast lihile ahe katha!! sagle bhag ektrach vachle tyamule gunfan agadi manala bhavali!!!
उत्तर द्याहटवा