मी थोड त्रासीक चेहर्यानीच माझ्या हातातल्या घड्याळात पाहिल तर साडेनऊ वाजले होते. ’आता पाचच मिनिटात हि लोकल सुटणार, कुठे आहे हि प्रीती यार’. लोकलच्या विंडोतुन शोधक नजरेने मी ठाण्याच्या प्लॅटफॉर्म नं. १ वर पहात स्वत:शीच विचार करत होतो. सकाळची गडबडिची वेळ असल्यामुळे प्लॅटफॉर्मवर गर्दिपण खूप होती. ’हे हिच नेहमीचच आहे, रोज उशीरा येते. अरे इथे हिची जागा पकडुन ठेवायची म्हणजे दहा लोकांची वाकडि झालेली तोंड बघायची. त्यातुन एखाद दिवशी एखाद्याशी भांडण वगैरे होत ते वेगळच. बस्स झाल आता, आजच सांगुन टाकतो तिला कि उद्यापासून तू तुझी वेगळि जा आणि मी माझा वेगळा जाईन.’ माझ्या रागाचा पारा चढतच होता. ’ह्या बायकांना वेळेची अजिबात कदर नसते. अरे दुसरा आपली वाट पहात ताटकळत बसला असेन ह्याचे तरी भान ठेवायला पाहिजे ना.’ मी स्वत:शीच चरफडत खिडकितुन बाहेर पहात होतो. तेवढ्यात लांबुन ती ब्रीज उतरताना दिसली. स्काय ब्लू कलरचा चुरीदार आणि कुर्ती त्यावर मानेबोवती घेतलेली ओढणी तिच्या त्या बांधेसुद गोर्या कायेवर अगदि अप्रतिम दिसत होती. लंबगोल हसरा चेहरा, त्यावर शोभुन दिसणारे ते टपोरे काळे भोर डोळे. मध्येच ती तिचे मोकळे सोडलेले सरळ केस हळुच आपल्या नाजुक हातांनी मागे सारत होती. जशी तिची नजर माझ्यावर पडली तस तिन मला छान असं गोड स्माईल देत हात केला, मी पण तिला खूणेनीच लवकर ये असं सांगितल ती दरवाजातुन आत शिरली आणि लगेच गाडि सुरु झाली म्हणजे फक्त काहि सेकंदाचा फरक पडला होता. ती माझ्या जवळ येऊन बसली, तसा तिच्या परफ्यूमचा तो मनमोहक सुगंध आला आणि माझा राग एकदम विरघळुन गेला. मी तिला हसत तक्रारीच्या सुरात विचारल.
"काय हे?"
"सॉरी! उद्यापासून नक्कि लवकर येइन." अस म्हणत तिन परत एक छान गोड स्माइल दिलं.
’अग कमीत कमी सोमवारी तरी वेळेवर येत जा" मी मगाचचा तक्रारीचा सूर कायम ठेवण्याचा प्रयत्न करत म्हंटल.
"अरे हो ना पण दोन दिवस इतके हेक्टिक गेले कि सकाळी लवकर जागच आली नाहि." तिन लाडिक स्वरात मला उत्तर दिलं.
मग तिन आपली पर्स उघडली, त्यातुन पाण्याची बाटली काढुन घोटभर पाणी प्यायल आणि मग मला पण पाणी पिणार का अस विचारल. मी मान हलवुनच नकार दर्शवला. मग तिन बाटली बॅगमध्ये ठेवुन दिली आणि आपले दोन्हि हात जोडुन माझ्यपुढे केले, तिच्या हातावर सुंदर मेंदि काढली होती.
"कशी आहे?" चेहर्यावर हसू आणत एकदा माझ्याकडे तर एकदा हाताकडे पहात तिन विचारलं.
"वा... सुंदर आहे. काहि स्पेशल?"
मग थोड लाजत तिन आपला डावा हात उलटा केला, तिच्या डाव्या हातातल्या अनामिकेत एक सुंदर अंगठि होती, मला दाखवत म्हणाली.
"आंणि हि कशी आहे?" मी थोडा मनातुन चरकलोच म्हणजे हिला म्हणायच तरी काय आहे. मी थोड अडखळतच तिला उत्तर दिल.
"छ...छान आहे. हे काय आहे सगळ?" मी थोड गंभीर होत तिला विचारल. तस तिन लाजत माझी नजर चुकवली अणि मग हळुच माझ्या नजरेला नजर देत म्हणाली.
"I am engaged now." म्हणजे क्षणभरापूर्वी मला ज्याची भीती वाटत होती तेच घडल होत, मला अचानक पायाखालची जमिन सरकल्यासारखी वाटली. मग वाटल कदाचित गंमत करत असेल माझी. मी जरा धीर करत तिला विचारल.
"म्हणजे?"
तस तिन माझ्या कपाळावर लाडिकपणे हात मारत म्हंटल.
"अरे मुर्खा, म्हणजे माझा साखरपुडा झाला काल. अरे सगळ इतक्या घाइत पार पडल कि कशाला वेळच मिळाला नहि. म्हणजे शनिवारी बघण्याचा कार्यक्रम झाला, पण त्याला कालच रात्रीच्या फ्लाईटनी अमेरीकेला जायच होत ते पुढच्या सहा महिन्यांकरता मग काय लगेच दुसर्या दिवशी साखरपुडा ठरला त्यामुळे यु कॅन इमॅजीन आमची केवढि घाई झाली असेल ते." मग माझा हात हातात घेत म्हणाली.
"प्लीज राग मानुन घेऊ नकोस रे, अरे पण सगळ इतक अचानक घडलं कि साधा फोन करायला पण वेळ नाहि मिळाला." हे ऐकुन माझ्या चेहर्यावरचा रंगच उडुन गेला होता, माझ्या मनात विचारांच वादळ उठायला लागल होत. ’म्हणजे गाडी पकडायला वेळे आधी येणारा मी इथे मात्र थोडा उशीराच पोहोचलो. आजच निघताना मानाचा पक्का निश्चय केला होता कि हिला आज प्रपोज करायचच, पण अस काहि हि सांगेल ह्याचा मी कधी स्वप्नातदेखील विचार केला नव्हता अरे देवा हे काय झाल, हिच्याशिवाय जगायची तर मी कल्पनापण करु शकत नाहि?. आता सगळ संपल तर.’ मी प्रचंड निराशेच्या गर्तेत जात चाललो होतो, तेवढयात तिनं माझ्या तोंडासमोर बोटांनी टिचकि वाजवली तसा मी एकदम भानावर आलो.
"का रे तुला आनंद नाहि झाला हि बातमी ऐकुन?" तिन प्रश्नार्थक नजरेने मला विचारल.
"न...नाहि तस काहि नाहि." मी उसन हसु चेहर्यावर आणत तिला म्हणलो.
"अरे मग साध कॉग्रॅट्स पण नाहि केलस तू?." तिच्या चेहर्यावर परत तेच लाघवी हास्य पसरल.
"अभिनंदन" मी माझा हात पुढे करत तिला म्हणालो, तसा माझ्या हाताला हात मिळवत ती तोंडभर हसून मला म्हणाली
"थॅंक्यू, विचारणार नाहिस कोण मुलगा? काय करतो? ते. मला तर वाटल होत कि तुला खूप आनंद होईन, तू नुसती प्रश्नांची सरबत्ती करशील." मी नुसताच मख्खपणे तिच्याकडे पहात होतो.
"बर मग मीच सांगते..." अस म्हणत ती पुढचा सगळा वेळ तिच्या होणार्या भावी नवर्याबद्दल सांगत होती, पण माझ तिच्या कुठल्याच बोलण्याकडे लक्ष नव्हत.
माटूंगा गेल्यावर ती दादरला उतरण्याकरता जागेवरुन उठली, मला दोन चार वेळा परत सॉरी म्हणत दादरला उतरली, मी मात्र सी एस टि ला ऑफिस असल्यामुळे तसाच तिथे बसून राहिलो. ती उतरुन गेली आणि माझ्या आयुष्यात एक प्रचंड मोठि पोकळि निर्माण करुन गेली. मला काहिच सुचत नव्हत, माझ संपूर्ण अवसानच गळुन गेलं होत. काहिच करण्याची ईच्छा वाटत नव्हती. विचारांच्या नादात सी एस टि कधी आल हे कळलच नाहि. आजुबाजुची सगळी लोक उतरुन गेली पण मी मात्र तिथे तसाच बसून होतो. थोडावेळ बसून मी लोकलमधुन बाहेर आलो, मनात खूप चित्र विचित्र विचार येत होते. ऑफिसला जायची तर अजीबात इच्छाच नव्हती, मला कुठेतरी एकांतात शांतपणे बसून रहावस वाटत होत. मी स्टेशनमधुन बाहेर आलो आणि टॅक्सी केली ती थेट गिरगाव चौपाटिपर्यंत. मी चौपाटिवरच्या मऊ वाळुवर एका झाडाखाली जाऊन शांतपणे बसलो. समोरचा तो विशाल समुद्र शांत होता पण माझ्या मनात मात्र विचारांच तुफान उसळल होत. तेवढ्यात मोबाइलवर एस एम एस आल्याची रींग वाजली. मला तो एस एम एस बघण्यात काहिच स्वारस्य नव्हतं, परंतु जेव्हा ती रींग परत दोन तीन वेळा वाजली तेव्हा खिशातुन मोबाईल काढला आणि पाहिल तर प्रीतीचाच मेसेज होता, ’आता काय नवीन? का लग्नाची तारीख सांगते आहे हि?’ असा विचार करत मी तो एस एम एस उघडला तर त्यात लिहिल होत.
"I am not engaged yet. Will you engage me? - Preeti" मला माझ्य डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता, मी तो मेसेज परत दोन, तीन वेळा वाचला. तेवढ्यात माझ्यासमोर कोणीतरी येऊन उभ राहिल, मी मान वर करुन पाहिल तर ती प्रीती होती. तिच्या चेहर्यावर तेच नेहमीच लाघवी हसू पसरलं होतं तर डोळ्यात आश्रु होते. तिन तिचे दोन्हि हात माझ्यापुढे केले, मी हि माझे हात तिच्या हातात दिले. माझे डोळे आणि उर दोन्हिहि भरुन आलं होत. मी उठुन उभा राहिलो तस ती मला येऊन बिलगली आणि रडत मला विचारल
"सांग ना Will you engage me?"
मी काहिच न बोलता फक्त तिला माझ्या मीठित घट्ट आवळुन घेतल.
superb man zakas jamlay !!!!
उत्तर द्याहटवा(aj.meher@gmail.com)
खूपच सुंदर, शेवट तर छानच आहे...
उत्तर द्याहटवाखरेच खूप सुंदर लिखाण आहे.
उत्तर द्याहटवानवीन पोस्टच्या प्रतीक्षेत.
योगेश कर्डिले
www.amazingsahyadri.com
wwww.yogeshkardile.com