सकाळि रोज प्रमाणे. नयना ऑफिसला जायची तयारी करत होती, तिनं कपड्याचं कपाट उघडल आणि नेहमीप्रमाणे पांढ्र्या रंगाचा सलवार कमीज बाहेर काढला आणि.क्षणभर ती तिथेच थबकली, तिला विवेकचे शब्द आठवत होते "पांढर्या रंगाबरोबर इतर रंग सुद्धा खूप सुंदर आहेत. मग त्यांच्यावर असा अन्याय का?.सुंदर गोष्टीवर जर सुंदर रंग चढले तर त्या अधिकच सुंदर दिसतात. विचार कर ह्यावर कधीतरी.", ती स्वतःशीच हसली. मग तिनं कपाटाचा दुसरा कप्पा उघडला व त्यातुन एक फिक्कट निळ्या रंगाचा सलवार कमीज काढला. मोठ्या उत्साहात तिन तो ड्रेस घातला आणि आरशासमोर जाऊन उभी राहिली. गेल्या दोन वर्षात फार क्वचितच तिनं स्वतःला असं आरशात पाहिलं होतं. दोन वर्षापूर्वी सतीशचा अचानक मृत्यू झाला आणि नयना पार कोलमडून गेली होती. जवळ जवळ एक वर्ष तर तिला त्या धक्क्यातून सावरायला लागले होते. सतीशची आणि नयनाची मैत्री तशी कॉलेजपासूनची, दोघे एकमेकांच्या प्रेमात कधी पडले ते त्यांनाच कळल नाहि. अत्यंत मन मोकळ्या स्वभावाची, पटकन कोणाशीही मैत्री करणारी नयना सतीशच्या प्रेमात पूर्णपणे बुडून गेली होती. पण त्यांच्या प्रेमाचा मामला आंतरजातीय असल्यामुळे दोघांच्याही घरच्यांचा लग्नाला विरोध होता. पुढे शिक्षण पूर्ण झाले आणि सतीशला एका चांगल्या फर्ममध्ये नोकरीपण लागली, तसं दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि घरच्यांच्या विरोधाला न जुमानता लग्नही केल. दोघांनी एक भाड्याचं छोटेसेच पण छान घर घेऊन आपल्या संसाराची सुरुवात केली. सगळ कस छान आनंदात चालल होत, पण नियतीच्या मनात काहि वेगळच होत. वर्षभर दोघांनी खूप सुखात संसार केला आणि एक दिवस अचानक एका अपघातात सतीशचा दुर्दैवी मृत्यू झाला. नयनाच तर अवघं आयुष्यच बदलून गेलं. तिला जगण्यातली इच्छाच निघून गेली, तिचं कशातच मन रमत नव्हत. सासरच्यांकडे जाण्याचा तर प्रश्नच येत नव्हता कारण त्यांनी तिला कधीच स्वीकारल नव्हतं, मग अशा परिस्थितीत तिला खंबीर आधार दिला तो तिच्या घरच्यांनी. पुढे त्यांच्याच आग्रहाखातर तिनं नोकरी करायला सुरुवात केली. पण ती पूर्वीची हसरी खेळती नयना मात्र कुठेतरी पार हरवून गेली होती. तिची हौस मौज जणु मरूनच गेली होती. तिनं एखाद्या विधवेचं आयुष्य जगायला सुरुवात केली होती. फक्त पांढरेच कपडे, त्यावर कुठलेच दागिने नाहि, साधे कपाळावर टिकली लावणं सुद्धा तिनं बंद केल होतं. कोणाशी बोलण नाहि कि कोणात विसळणे नाहि. तिनं स्वतःला एका निरस अशा कोशात अडकवून घेतलं होतं. पण आज बर्याच दिवसांनी स्वतःला असं रंगीत कपड्यात बघून नयनाच्या जुन्या आठवणी परत जागृत झाल्या आणि तिचे डोळे पाणावले. तिनं तशीच ऑफिसला जायची पर्स उचलली आणि घरातून बाहेर पडली.
नयना ऑफिसमध्ये पोहोचली तेव्हा तिच्यात झालेला हा बदल अगदी लक्षात येण्याजोगा होता त्यामुळे ऑफिसमध्ये प्रवेश करताच सगळ्यांच्या नजरा तिच्याचकडे वळल्या. आजपर्यंत फक्त पांढर्या कपड्यांतच पाहिलेल्या नयनाला निळ्या ड्रेसमध्ये पाहुन सगळ्यांना जरा आश्चर्यच वाटत. ती लोकांच्या नजरा चुकवत आपल्या जागेवर जाउन बसली, आपला कॉम्प्यूटर सुरू करुन कामाला सुरुवात केली. तेवढ्यात रीना तिच्या डेस्कजवळ आली. ऑफिसमध्ये तिची रीना हिचं एक जवळची मैत्रीण होती, बाकिच्यांशी ती फक्त कामा पुरतीच बोलत असे.
"वाव! नयना किती छान दिसते आहेस तू. आज काहि विशेष?"
"काहि नाहि गं असच." म्हणत तिनं तो विषयच टाळला. मग थोड्या जुजबी गप्पा मारुन रीना परत आपल्या डेस्कवर निघून गेली आणि नयना आपल्या कामाला लागली. थोड्या वेळान तिनं हळूच तिरक्या नजरेनं विवेक बसतो त्या जागेवर पाहिल पण विवेक जागेवर नव्हता. विवेक हा नयनाच्या ऑफिसमध्ये मार्केटिंग एक्झेक्युटिव्ह म्हणून काम करत होता. आपल्या पेशा प्रमाणेच विवेक अगदी मनमोकळ्या स्वभावच एक उमदा तरुण होता. ऑफिसमधल्या प्रत्येकाबरोबर त्याची मैत्री होती. अत्यंत हुशार असलेला विवेक फार थोड्या काळातच ऑफिसमध्ये सगळ्यांचा चाहता झाला होता. नयनाशी पण विवेकनं स्वतःहूनच ओळख करुन घेतली होती. एकलकोंड्या झालेल्या नयनाने त्याला प्रथम काहिच प्रतिसाद दिला नव्हता, पण हळुहळू त्यांच्यातली मैत्री वाढत गेली होती. पुढे रीनाकडुन विवेकला नयनाच्या पूर्वायुष्याची पण कल्पना मिळाली होती,
नयनानं मग जरा इकडे तिकडे पाहिल पण तिला विवेक कुठेच दिसला नाहि, ती परत आपल्या कामाला लागली. तेवढ्यात तिला तो आवाज आला.
"क्या बात है! आज काहि विशेष? पण छान दिसते आहेस तू." तिनं समोर पाहिल तर विवेक उभा होता.
"थॅंक यू" नयना गालातल्या गालात हसली आणि त्याची नजर चुकवत त्याला म्हणाली.
"हं.. आता कस जरा बर वाटतय तुझ्याकडे पाहुन. जाम कंटाळा आला होता तुला त्या उदासवाण्या कपड्यात पाहुन." नयना काहिच न बोलता पुन्हा गालातल्या गालात हसली. तसं विवेक तिला म्हणाला "पण ह्याच्यावर जर तू मॅचिंग इअरींग्स घातल्या असत्या तर एक छान डिसेन्ट लुक आला असता." ह्यावर नयननी त्याला फक्त स्मित हास्य दिलं, तेवढ्यात विवेकला कोणीतरी बोलावल म्हणून तो तिथुन निघून गेला. तो सगळा दिवस नयना खूप खूश वाटत होती, तिला स्वतःबद्दल एक वेगळाच आत्मविश्वास वाटत होता. पुढचे चार पाच दिवस ती असेच फिक्कट शेड असलेले रंगीत कपडे घालत होती. तिच्यातला हा बदल तिच्या जवळच्या लोकांना खूपच सुखावुन जात होता.
पुढच्या आठवड्यात सोमवारी सकाळि तिनं कपाटातल्या त्या दुसर्या कप्प्यातून एक डार्क शेड असलेला पिवळ्या रंगाचा ड्रेस काढला. त्यावर सुंदर अशी एम्ब्रॉयडरी पण होती. मग तिनं तो ड्रेस घालुन कपाटाच्या आतल्या बाजुला ठेवलेला एक लाकडी बॉक्स बाहेर काढला, त्यातून त्या ड्रेसला मॅचिंग नेकलेस आणि इअररींग्स काढल्या. मग तयार होउन ती आरशासमोर उभी राहिली, तिला स्वतःलाच जाणवलं कि ती छान दिसत होती. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर तिनं आपला कॉम्प्यूटर सुरु केला आणि हळूच विवेककडे पाहिल तर तो तिच्याचकडे पहात होता, त्यानं खुणेनेच तिला खूप सुंदर दिसते आहेस असं सांगीतल. तसं ती गालातल्या गालात हसली आणि आपल्या कामाला लागली. थोड्याच वेळात तिला एक इमेल आले, ते विवेकचच मेल होत, त्यात त्यान पिवळ्या रंगाच्या बांगड्यांच एक फोटो पाठवला होता. नयना समजून गेली होती त्याला काय म्हणायच आहे ते, तिनं त्याच्याकडे पाहिल आणि त्याला गोड असं स्मित हास्य दिलं.
जसे जसे दिवस सरत होता नयनाचा तो हरवलेला आत्मविश्वास परत जागृत होत होता. हळुहळू ती माणसात यायला लागली होती. छान छान रंगीत कपडे आणि त्यावर मॅचिंग दागिने घालुन ऑफिसमध्ये येत होती. ती आता ऑफिसमधल्या इतर लोकांशी पण बोलायला लागली होती, त्यांच्याबरोबर लंचला जात असे आणि विशेष म्हणजे ती पुन्हा हसायला लागली होती, पूर्वीसारखं खळखळून नसल तरी खूप छान होतं ते सगळ. आपल्या मुलीत होत असलेला हा बदल नयनाच्या आईला पण खूप सुखावुन जात होता.
पुढे असच एक दिवस नयनानं एक ठेवणीतला लाल रंगाचा जरीचा सलवार कमिज घातला, त्यावर लाल रंगाच्या छान बांगड्या, गळ्यात सोन्याची चेन, आणि कानात लाल सोनेरी रंगाच्या कुड्या घातल्या, तिनं तिचे छान मऊ केस मोकळे सोडले. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर कोणाचीही नजर न चुकवता ती आपल्या सीटवर जाऊन बसली. कॉम्प्यूटर सुरु केला, तिनं विवेकच्या सीटवर पाहिल पण तो जागेवर नव्हता तिची नजर त्याला संपूर्ण ऑफिसमध्ये शोधायला लागली., तेवढ्यात तिच्या डेस्क वरचा फोन वाजला, तिनं फोन उचलला तर समोर विवेकच बोलत होता.
"तू आता ऑफिसमध्ये सांभाळून रहा, कारण ह्या इतर सगळ्या मुली तुझ्यावर जेलस व्हायला लागल्या आहेत." ती इकडे तिकडे पहायला लागली. तेवढ्यात तो म्हणाला "समोर कॉन्फरन्स रुममध्ये." तिनं कॉन्फरन्स रुमकडे पाहिल तर विवेक त्या काचेच्या कॉन्फरन्स रुममध्ये बसला होता, तिनं त्याच्याकडे बघताच त्यान तिला हात दाखवला तिनं हासत फोन ठेवून दिला. हळुहळू नयनाची विवेकशी जवळिक वाढत चालली होती आणि हि गोष्ट रीनाच्या चांगलीच लक्षात आली होती. नयनाला विवेकचा सहवास खूप हवाहवासा वाटत होता, त्याच बोलण, त्याच हसण, तिची स्तुती कुरणे सगळ सगळ तिला खूपच भावत होत. त्यान नुसतं बोलत रहाव आणि तिनं नुसतं ऐकत रहाव असच तिला वाटत होतं. तिला आता एका गोष्टीची जाणीव व्हायला लागली होती कि ती कुठेतरी विवेकच्या प्रेमात पडायला लागली होती. पण विवेक्च्या मनात काय चाललं आहे ह्याचा मात्र तिला अजिबात अंदाज येत नव्हता. बर्याचदा नयना अंतर्मुख होऊन स्वतःशीच विचार करत असे, ’कोण हा विवेक? मी त्याच्याशी का बोलते? मला तो का चांगला वाटतो? मला हे सगळ करण्याचा खरच अधिकार आहे का? आज दोन वर्ष झाली पण अजुनही माझं मन सतीशमध्ये अडकलं आहे, मग मी विवेकमध्ये गुंतत चालले आहे हे किती योग्य आहे. बरं माझ्या मनात जे चालल आहे ह्याची जाणिव तरी विवेकला आहे क?’ अशा एक न अनेक प्रश्नांच्या द्वंद्वात ती अडकलेली होती. पण हे काहिही असंलं तरी ती खुप खूष होती.
एक दिवस शुक्रवारी विवेक नयनाच्य डेस्कजवळ आला तो खुपच खूष दिसत होता, त्याच्या हातात पेढ्यांचा बॉक्स होता. तो तिला म्हणाला.
"नयना माझ्याकडे दोन खूप आनंदाच्या बातम्या आहेत." नयना मोठ्या उत्साहानं त्याच्याकडे पहायला लागली.
"पहिली बातमी, माझं प्रमोशन झालं आहे आणि मी आता मार्केटिंग मॅनेजर झालो आहे. आताच तशी ऑर्डर आली, माझी ट्रान्सफर दिल्लीला हेड ऑफिसमध्ये झालेली आहे आणि लगेच सोमवारी मला तिथे रीपोर्ट करायच आहे." नयनाच्या चेहर्यावर एक प्रसन्न हसू आल, .
"अरे वा! अभिनंदन, खूप छान बातमी आहे पण तू दिल्लीला जाणार?" ती थोडं गंभीर होत त्याला म्हणाली.
"हो मग जायला तर पाहिजेच ना. अगं पण दुसरी बातमी तर ह्यापेक्षाही गोड आहे, गेस व्हॉट? आय एम गेटिंग मॅरीड आणि योगायोग असा कि ती मुलगी पण दिल्ली लाच असते." हे शब्द नयनाच्या कानी असे पडले कि जणु आकाशच तिच्यावर कोसळले. तिला क्षणभर काहिच सुचत नव्हत, मग स्वतःला सावरत आणि आपल्या चेहर्यावर फारस काहिही न दाखवता तिनं त्याच परत अभिनंदन केलं.
"मला माहिती आहे नयना मागच्या काहि दिवसात आपली मैत्री खूप छान जमली आहे आणि मी इथून गेल्यावर पण ती अशीच टिकुन राहिल याची मला पूर्णपणे खात्री आहे." नयना काहिही न बोलता त्याच बोलण ऐकत होती. मग तो स्वतःचा हात पुढे करत नयनाल म्हणाला.
"नयना! मला वचन दे मी इथून गेल्यावर तु पुन्हा त्या तुझ्या निरस जगात परत जाणार नाहिस. आयुष्य खूप सुंदर आहे गं, जखमांना कवटाळून बसलीस तर फक्त वेदनाच होतील. तेव्हा किप स्मायलींग. आणि हो केव्हाही कधीही तुला माझी गरज वाटली तर फक्त मला हाक दे मी तुझ्या मदतीला हजर असेन." नयनाच उर एकदम भरुन आल होत, आवंढा गिळत तिनं नुसतच मान हालवून त्याला होकार दिला.
"चल आता मी निघतो खूप तयारी करायची आहे, आपण लवकरच भेटु." असं म्हणून तो निघून गेला. तो गेला तशी नयना तिच्या सीटवरून उठली आणि वॉशरुममध्ये गेली, हे सगळ पहात असलेली रीनापण तिच्या पाठोपाठ गेली. आतमध्ये रीनाच्या खांद्यावर डोक ठेउन नयना खूप रडली. रीनानीपण तिला समजावयाचा खूप प्रयत्न केला पण ती काहिच ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. उरलेला सगळा दिवस ती तशीच उदास होती, रीनाल खूप भीती वाटत होती कि नयना परत पूर्वीसारखी एकलकोंडी तर नाहि ना होणार.
नयना आपल्या विचारांच्या तंद्रीतून एकदम बाहेर आली जेव्हा तिचा फोन वाजत होता, तिनं फोन उचलून कानाशी लावला तर समोरून अजय थोड्या वैतागलेल्या सुरातच बोलत होता.
"काय नयना! किती वेळ? मी कधीपासून गाडी बाहेर काढून खाली गेटजवळ तुझी वाट पाहतो आहे. तुम्हा बायकांना आपल्या नवर्याला वाट पहायला लावण्यात काय गंमत वाटते कुणास ठाऊक?"
"हो आलेच! फक्त दोनच मिनिट." असं म्हणत तिनं फोन डिस्कनेक्ट केला. मग हातातल्या त्या पिवळ्या रंगाच्या बांगड्या तिनं दागिन्यांच्या डब्यात ठेवल्या. टेबलावरच मंगळसूत्र गळ्यात घातलं आणि आरशासमोर उभी राहुन स्वतःशीच म्हणाली "विवेक! मी तुला दिलेल वचन आयुष्यभर पाळेल.."
छान रंग भरलेत....
उत्तर द्याहटवासुंदर....आवडले..
छान....
उत्तर द्याहटवा