पूर्वसुत्र
पुढे दोन दिवस दोघेही आपापल्या कामात खूपच बिझी होते. तिसऱ्या दिवशी सोनलनी परत जतिनला फोन केला.
"काय साहेब कुठे आहात?"
"सोनल... अगं मी इथेच आहे जरा बिझी होतो एवढच. बोल आज कशी आठवण झाली?"
"काहि नाहि सहजच, आज दुपारी थोडा वेळ होता म्हंटलं तुला जर वेळ असेल तर थोडं शॉपिंग करुया."
"शॉपिंग... अं... आज थोडं बिझी आहे परत कधी तरी जाऊया?"
"का रे घाबरलास का, माझ्याबरोबर तुला कोणी पाहिल आणि तुझ्या बायकोला सांगितलं तर?"
आणि ती हसायला लागली.
"नाहि गं तसं काहि नाहि, खरच आज जरा बिझी आहे पण प्रॉमीस उद्या आपण नक्की जाउ शकतो. तसं पण उद्या शुक्रवार आहे आणि परवा सुट्टी त्यामुळे वर्कलोड पण कमी असेल"
"बर ठिक आहे, उद्या सकाळी मी फोन करेन"
असं म्हणून तिनं फोन ठेवला. इथे जतिन मात्र स्वतःशीच विचार करु लागला. ’मी सोनलला नाहि का म्हटल, आज तर तस काहिच विशेष काम नाहिये. मग मी तिला टाळल? पण का? का खरच सोनल म्हणाली तसं मी घाबरलो होतो आणि त्याच भरात तिला नाहि म्हणालो. पण मग उद्याच काय शॉपिंग म्हणजे पब्लिक प्लेसमध्ये खरच कुणी पाहिल आणि नीताला सांगितलं तर नसते गैरसमज होतील. काय कराव?’ तो स्वतःच्या जागेवरून उठला आणि खिडकीजवळ जाऊन बाहेर बघत विचार करू लागला. ’मी असं कसं वागु शकतो सोनलशी! एके काळि मी तिच्यावर अगदी जिवापाड प्रेम केल होत, आजही ती मला मनापासून आवडते. ठिक आहे आम्ही एकत्र येऊ शकलो नाहि पण मैत्री तर कधीच तुटू शकत नाहि ना. आज ती मला तिचा एक चांगला मित्र मानते आहे मग मी तिच्या मैत्री खातर एवढपण करु शकत नाहि का? आज इथे ती एकटि आहे तिला माझ्या मैत्रीची खूप गरज आहे त्यामुळे मला तिला एका चांगल्या मित्राचा आधार दिलाच पाहिजे. राहिली गोष्ट नीताची तर बघून घेऊ तेव्हा काय सांगायच ते.’ असा विचार करताच जतिनला थोडं हलक वाटल. एकिकडे त्यालाही हे माहिती होत कि नीताला जे कारण तो सांगणार होता ते तिला पटण्यासारखं नव्हत पण तो त्या गोष्टीचा विचार करण्याच्या तयारीत आता नव्हता.
दुसऱ्या दिवशी तो ऑफिसला जायला निघाला ते जरा चांगले कपडे घालूनच, नीतान त्याला त्याबद्दल हटकल पण, त्यावर त्यान क्लायंट व्हिजिट असल्याच सांगितलं. कदाचित त्यान आजपर्यंत नीताशी बोललेल हे पहिलंच खोट होत, तो स्वतःशीच खजील झाला. मग काहिहि न बोलता पटकन तयार होऊन ऑफिसला निघून गेला. साधारण साडेअकरा वाजता सोनलनं त्याला फोन केला आणि दुपारी एक वाजता स्प्रिंट मॉलच्या गेटवर बोलावल. सोनलनं पहिले शॉपिंग आणि मग दुपारचं जेवण असा दोन तासाचा कार्यक्रम बनवला होता. जतिन बरोबर एक वाजता मॉलच्या गेटजवळ पोहोचला, सोनल आधीपासूनच येऊन तेथे उभी होती. पार्किंग लॉटमध्ये गाडी पार्क करून दोघंही मॉलमध्ये गेले. सोनलनं भरपूर शॉपिंग केलं, मग निघताना दोघांनी मॅक्डोनाल्डस मध्ये जेवण केल. दुपारी तीन सव्वातीन वाजता त्यान सोनलला तिच्या ऑफीसच्या गेटजवळ सोडल आणि तो स्वतःच्या ऑफिसमध्ये निघून गेला. दुपारी बराच वेळ बाहेर गेल्यामुळे जतिन त्या दिवशी ऑफिसमधून जरा उशीराच निघाला, त्यानं गाडी स्टार्ट केली आणि आपल्या घराच्या दिशेने निघाला. विचारांच्या नादात त्याच्या डोळ्यासमोरून सोनल बरोबर व्यतीत केलेली आजची दुपार एखाद्या सिनेमा सारखी जाऊ लागली. तो स्वतःशीच हसला आणि विचार करु लागला. ’किती छान वेळ गेला आज सोनल बरोबर, खरच तिच्यात एक वेगळाच ग्रेस आहे, तिचं बोलण, तिचं ते खळखळून हसण, तिचं ते मधुन मधुन स्वतःच्याच केसांतून हात फिरवणं खरच आगदी वेड लावत जीवाला. तिच्या बोलण्यातून जो उत्साह ओसंडत असतो तो समोरच्याला आगदी भुलवून टाकतो. परत कधी भेटेल ती आता.’ विचारांच्या तंद्रीत तो कधी घरी आला ते त्यालाच कळल नाहि. आज तो नेहमीपेक्षा जरा जास्तच खूष वाटत होता. नीताला त्याच्यातला हा बदल अगदी प्रकर्षाने जाणवला, पण ती काहिच बोलली नाहि त्याला असं खूष ती कदाचित पहिल्यांदाच बघत होती. दिवसभराचा एवढा थकवा असूनसुद्धा जतिनला बिछान्यावर पडल्या पडल्या लगेच झोप येत नव्हती. कदाचित त्याला ओढ लागली होती सोनलच्या पुढच्या भेटीची.
पुढे दोघांच्या भेटी काहि ना काहि कारणाने होतच राहिल्या. दुपारचं लंच असो किंवा शॉपिंग दोघेही अगदी मनसोक्त एकमेकांच्या सहवासाचा आनंद लुटत असतं. एक दिवस लंच टेबलवर जतिनन परत ती जुनी जखम कुरडली, तो म्हणाला.
"सोनल तू मला सोडून गेलीस, त्यानंतर माझं काय झालं असेल ह्याचा तू कधी विचार केला होतास?"
सोनल काहिच बोलली नाहि ती नुसतीच त्याच्याकडे बघत होती.
"तू गेलीस आणि मी पुरता कोलमडून गेलो होतो. मला कशातच रस वाटत नव्हता. तो दिवस मी कधीच विसरू शकणार नाहि जेव्हा मला माझ्या बाबांच्या निधनाची बातमी कळली आणि मला तातडीनं गावाला जायला लागलं. मला आठवतय त्याच काळात तुझे सुद्धा अमेरीकेला जायचे प्रयत्न चालु होते. पंधरा दिवसांनंतर मी जेव्हा परत आलो तेव्हा तू इथे नव्हतीस. तुझ्या रुममेटनी सांगीतल कि तू अमेरीकेला गेलीस म्हणून, त्यांनीच मला तुझ्या पुण्याच्या घरचा फोन नंबर दिला. मी पुण्याला तुझ्या घरी फोन पण केला होता पण त्यांनी मला काहिच नीट प्रतिसाद दिला नाहि, तुझा साधा अमेरिकेतला फोन नंबर पण दिला नाहि. मग तुला मी भरपूर ई मेल पाठवली. पहिल्यांदा तू एखाद दोन शब्द असलेले रीप्लाय तरी पाठवायची पण नंतर ते पण बंद केलस. वर्षभर मी तसाच वेड्यासारखा वागत होतो. कशातच लक्ष लागत नव्हत, मग विचार केला कि मुंबई सोडून गावाला जायचं ते कायमच. सगळ विसरून जायचं आणि नव्यान आयुष्य परत सुरु करायच. पण त्या काळात मला खऱ्या अर्थानं सावरल तर ते करण आणि प्रियानं. त्यांनी मला खूप आधार दिला, दोघांनी मला खूप समजावलं, हळूहळू मी पण सावरत गेलो, लवकरच मला इथे जॉबही मिळाला. पुढे नीताशी लग्न झालं आणि खऱ्या अर्थानं माझी भटकलेली गाडी रुळांवर आली."
जतिनन सोनलसमोर सगळ भडाभडा बोलून टाकल. सोनल पण अगदी शांतपणे ते सगळ ऐकत होती. जतिनच बोलण ऐकून तिचे डोळे पाणावले होते. तिने आपले दोन्ही हात स्वतःच्या चेहऱ्यावर ठेवले आणि ती मुसमुसून रडू लागली, पण क्षणार्धात ती शांत झाली, आणि आपले डोळे पुसत जतिनला म्हणाली.
"आय एम सॉरी, जतिन बट आय वॉज हेल्पलेस. तुला तर माहितच होतं कि मी किती करीयर ओरिएन्टेंड होते ते. तू गेलास आणि लगेच दुसऱ्या दिवशी मला हॉवर्ड मधुन ऍडमिशन कन्फॉर्मेशन लेटर आलं. मी हि संधी वाया घालवु शकतच नव्हते, आणि तुलाहि ते माहित होतच कि आज ना उद्या मी अमेरीकेला जाणारच होते म्हणून, बर तुला कॉन्टॅक्ट तरी कसा करणार तुझा मोबाईल बंद होता आणि तुझ्या गावाचा नंबर पण माझ्याकडे नव्हता. मग मी प्रिया कडे मेसेज ठेवून पुण्याला गेले. घरच्यांना खूपच आनंद झाला. बोलता बोलता मी तुझ्याबद्दल आणि आपल्या प्रेमाबद्दल पण सांगितलं तर मला घरच्यांनी जवळ जवळ विरोधच केला, आणि पुढे दोनच दिवसांत मला अमेरीकेला जाव लागल."
जतिन तिचं बोलण शांतपणे ऐकत होता.
"तिथे गेल्यावर माझी खरी परीक्षा सुरु झाली होती, नवीन देश, नवीन लोक सगळच निराळं. मला त्या वातावरणात स्वतःला ऍडजस्ट व्हायलाच बरेच दिवस गेले. हॉस्टेलची ती छोटीशी रुम, कुठल्यातरी दुसऱ्याच देशांतून आलेल्या त्या रुम मेट्स आणि त्याच्याबरोबर कराव्या लागणाऱ्या त्या रोजच्या ऍडजेस्टमेन्ट्स. माझं पुरत जगच बदलून गेलं होत रे. तुला सांगते कि स्कॉलरशिप पण इतकी तुटपुंजी मिळायची कि माझा रोजचा खर्च आणि अभ्यासाचं सामान आणताना सगळे पैसे संपून जायचे. त्या काळात फोन पण आजच्या सारखे स्वस्त नव्हते त्यामुळे मी घरी सुद्धा अगदी क्वचितच फोन करत असे. पुढे त्या नव्या वातावरणात ऍड्जस्ट होण आणि तो भयंकर अभ्यास यातच माझा संपूर्ण वेळ जायचा. ई मेलहि हार्डली चेक करायचे आणि तेही कॉलेजच्या लायब्ररीतून आणि थोड्या कालावधीपर्यंत. पण खर सांगु असा एकही दिवस गेला नसेल कि जेव्हा मी तुझी आठवण काढली नसेन. हळूहळू मी तिथे व्यवस्थित सेट झाले, नवीन मित्र मैत्रीणी मिळाले. रोजच्या रुटिनमध्ये इतकी बिझी असायचे कि मला स्वतःला सुद्धा वेळ नव्हता. बघता बघता दोन वर्ष कशी गेली कळलच नाहि. आता परत यायचं होत पण तेवढ्यात माझा परफॉर्मन्स पाहुन युनिव्हर्सिटीनी मला सहा महिन्याच्या एका सर्टिफिकेट कोर्सची ऑफर दिली. माझा वीजा पण अजुन सहा महिन्यांचा बाकि होता. म्हटलं सहा महिने तर आहे हा कोर्स पूर्णं करू आणि मग परत येऊ. पण दोन तीन महिन्यातच प्रियाच इमेल आलं कि तुझं लग्न झालय म्हणून. मग माझी इथे परत यायची इच्छाच निघून गेली. मग मी पण विचार केला भारतात कशाला जायचं? ज्याच्या ओढीन मी इथे येणार होते तो माझा राहिलेलाच नव्हता, मग त्यापेक्षा इथेच जॉब शोधला तर? पण त्याच काळात नुकतेच अमेरीकेत झालेल्या हल्ल्यामुळे वीजा मिळणं तसं कठिणच होत. अशातच माझी स्टिफनशी ओळख झाली, तो मी ज्या कंपनीत प्रोजेक्ट करायला जायचे तिथेच काम करायचा. पुढे आमची मैत्री वाढत गेली त्याला मी खूप आवडायची, आणि एक दिवस त्यान मला लग्नासाठी विचारल मग. मी त्याला निर्णय द्यायला थोडा वेळ मागितला. घरच्यांशी बोलायच तर त्यांनी तुलाच विरोध केला होता त्यामुळे स्टिफनबद्दल बोलायचा प्रश्नच नव्हता. खूप विचार केला त्याच्याशी लग्न करून मला तिकडचं कायमच नागरिकत्व मिळणार होत तर दुसरीकडे इकडच्या सगळ्यांचीच आठवण येत होती. मी पूर्णपणे कन्फ्यूज झाले होते. बराच विचार केला, तिकडच्या मित्र मैत्रिणींनी पण त्याच्याशी लग्न कर असच सजेस्ट केलं आणि मी शेवटि लग्न केल आणि सोनल स्टिफन जॉन्स बनले. ह्या लग्नामुळे मला फायदा झाला तो म्हणजे तिकडचं नागरिकत्व कायमच मिळाले. आधी सगळ ठिक चालल होत पण नंतर आमच्यात खटके उडायला लागले कदाचित त्याला माझं करियरमध्ये त्याच्यापुढे जाण पचनी पडत नव्हत, आणि एक दिवस सगळ संपल. आम्ही अजुनही डिवोर्स घेतलेला नाहि पण आज पाच वर्ष झाली मला स्टिफन कुठे आहे हेही माहिती नाहि. बघ ना नियतीचा खेळ किती अजब असतो ते."
जतिन तिचं सगळ म्हणण शांतपणे ऐकत होता, त्याचे डोळे पाणावले होते. त्यान स्वतःचा हात तिच्या हातावर ठेवला आणि म्हणाला.
"आय एम सॉरी सोनल, मी तुला चुकीची समजलो होतो. पण आता ह्या सगळ्याला खूपच ऊशीर झालाय."
ती नुसतीच हसली आणि मग दोघे परत आपापल्या दिशेला निघून गेले. त्या रात्री जतिनला अजिबात झोप आली नाहि. रात्रभर तो फक्त सोनलचाच विचार करत होता. ’किती चुकीची समजत होतो मी तिला, खरच ह्यात चूक कुणाची, तिची, माझी, कि परिस्थितीची. पण सत्य हेच आहे कि आज आमचे दोघांचे मार्ग वेगळे आहेत. पण सोनल खूपच एकटि आहे, तिला आज तिचं असं कोणीच नाहि, मी काहि नाहि तर कमीत कमी एखाद्या मित्राची तर साथ देऊ शकतो ना. छे सगळच विचित्र आहे.’ तिथे सोनलची अवस्था पण ह्यापेक्षा काहि वेगळी नव्हती.

पुढील भाग लवकरच..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
प्रतिक्रिया नोंदवा