पूर्वसुत्र
पुढे दोघांच्या भेटि चालूच होत्या, कदाचित कुठेतरी ते एकमेकांच्या परत जवळ यायला लागले होते. जतिन सोनलची कंपनि अगदी मनापासून एन्जॉय करत होता. तो पूर्वीपेक्षा अधिक खूश दिसत होता. नीताला त्याच्यातला हा बदल लक्षात येत होता, पण ती खूश होती कारण तिचा जतिन खूश होता. ती ह्या संपूर्ण प्रकरणापासून संपूर्णपणे अनभिज्ञ होती. एक दिवस असच जतिन, नीता, आणि श्रेयु मॉलमध्ये शॉपिंग करत होते. कपड्यांच्या सेक्शनमध्ये खरेदी करताना अचानक त्यांच्या समोर सोनल आली. जतिन क्षणभर गांगरून गेला, मग सोनलनच त्याच्याशी खूप वर्षानी भेटत आहे अशा अविर्भावात बोलायला लागली. जतिननं सोनलची आणि नीताशी ओळख करुन दिली. सोनल नीताशी खूपच आपुलकीने बोलली. पण सगळ्यात जास्त सोनलला आवडली ती श्रेयु, तिचं ते गोंडस गोजिरवाणं छोटसं रुप सोनलच्या अगदी मनात बसून गेलं होत. श्रेयुलापण तिच्या बाबाची हि मैत्रीण आवडली होती, तिनं तिच्याकडून एक कॅडबरीसुध्दा मिळवली. घरी जाताना नीतानं जतिनसमोर अगदी मोकळेपणाने सोनलच कौतुक केलं, जतिन त्यावर काहिहि न बोलता अगदी शांतपणे सगळ ऐकत होता.
त्या दिवशी सकाळी जेव्हा जतिन ऑफिसमध्ये पोहोचला तसा त्याला एक एस एम एस आला, सोनलचाच होता तो, ती त्याला दुपारी लंच करता बाहेर बोलावत होती. जतिननं सुद्धा तिला लगेच होकार कळवला. बरोबर दुपारी दिड वाजता ते मधुमालती मध्ये भेटले. नेहमीप्रमाणेच सोनल आधीपासून येऊन बसली होती. जतिन टेबलजवळ पोहोचला आणि त्यान तिला एक गोड असं स्मित दिलं, तिनं पण त्याला स्मित दिलं पण तरीही आज ती काहिशी गंभीर वाटत होती, मग जतिनच तिला म्हणाला.
"काय ग! काय झालं? आज अशी गंभीर का वाटतेय?"
सोनलन त्याच्याकडे पाहिल आणि म्हणाली.
"जतिन मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या पण नाजूक विषयावर बोलायचय"
"हो बोल ना, काहि प्रॉब्लेम आहे का?"
"नाहि रे प्रॉब्लेम असा काहिच नाहि."
"जतिन आपल्या आयुष्यात जे काहि घडलं तो आपल्या नशीबाचा भाग होता. आपण एक होऊ शकलो नाहि. गेल्या दहा वर्षात मी नशीबाचे इतके खेळ अनुभवलेत कि आता कशाचेच काहि वाटत नाहि. पण ह्या सगळ्यात एक गोष्ट मात्र नक्की कि आज मी एकटि आहे, संपूर्ण एकटि. मला माझं असं कोणीच नाहि. जे हवे होत त्यांतले काहि मिळाले तर काहि गमावलं, मी तक्रार करत नाहि कारण मी ते हे सगळ मीच स्वीकारल होतं. पण त्या दिवसापासून माझ्या मनात एक वेगळीच इच्छा जागृत झाली आहे."
"वेगळीच इच्छा म्हणजे?"
"त्या दिवशी मी श्रेयुला पाहिल आणि वाटल माझं पण असं कोणी तरी असावं. जे माझं स्वताच असेल."
"असं कोड्यात नको बोलु गं, तुला काय म्हणायचय ते स्पष्ट सांग ना?"
"जतिन, मला आई व्हायचंय"
"आई?"
"पण ते कसं शक्य आहे?"
"हो शक्य आहे आणि मला आई व्हायचंय तेही तुझ्या बाळाची."
"काय... तू काय बोलते आहेस तुला तरी कळतय का?"
"होय मी पूर्णपणे विचार करुनच बोलतेय."
"हे कधीच शक्य नाहि."
"जतिन, का शक्य नाहि हे, मी तुझ्याशी लग्न करायच म्हणत नाहिये रे, फक्त तुझ्याकडे माझं मातृत्व मागते आहे. मी गेले काहि दिवस ह्यावर खूप विचार केला आणि मगच तुझ्याशी बोलते आहे."
"सोनल, हे कधीच शक्य नाहि, मी हे असं काहिच करु शकणार नाहि, मी नीताचा विश्वासघात करू शकत नाहि. ती माझ्यावर अगदी मनापासून प्रेम करते... आणि मी हि तिच्यावर तितकच प्रेम करतो. सोनल, तुला जर आईच बनायचंय देन यू कॅन ऍडॉप्ट अ चाईल्ड, पण तू जो विचार करते आहेस तो पूर्णपणे चुकीचा आहे."
"जतिन, मी जरी कोणाला ऍडॉप्ट केलं तरी ते माझ्या गर्भातून आलेलं नसेल, माझ्या हाडामांसाचं नसेल, तुला कसं सांगु पण एखाद्या जीवाला आपल्या उदरातून जन्म देण हे किती सुखावह असतं ते. हे जाणण्याकरता स्त्रीच व्हाव लागतं. आई होण हि निसर्गानं प्रत्येक स्त्रीला दिलेल एक वरदान आहे आणि मी अजूनही त्यापासून वंचितच आहे. राहिली गोष्ट नीताचा विश्वासघात करण्याची तर आपण आपल्या बाळाला जन्म देऊन तिच्या तुझ्या वरच्या प्रेमाला किंवा तुझ्या तिच्यावरच्या प्रेमाला कुठेच तडा पोहचवत नाहि. मी तुला प्रॉमीस करते मी आपल्या बाळाला तुझ्याबद्दल कधीच काहि सांगणार नाहि, मी तुझं नाव पण त्याला देणार नाहि. आणि मुख्य म्हणजे मी आपल्या बाळासबोत कायमची अमेरीकेला निघून जाईन."
जतिन काहिच बोलला नाहि, तो एका विचित्र अशा द्विधा मन स्थितीत अडकला होता. एकिकडे त्याला सोनलच म्हणण कुठेतरी पटत होत पण दुसरीकडे नीताबद्दलची अपराध्याची भावना त्याला सलत होती. त्याच डोक पूर्णपणे सुन्न झालं होत.
"जतिन, प्लीज नाहि म्हणू नकोस. तू मला लगेच कुठलाच निर्णय देऊ नकोस, पाहिजे तर विचार कर आणि मग सांग. आपण दोन दिवसांनी म्हणजे शुक्रवारी परत भेटु. पण मला खात्री आहे तू मला निराश करणार नाहिस."
जतिनं काहिहि न बोलता तसाच ऊठुन निघून गेला. काय चूक आणि काय बरोबर त्याला काहिच कळत नव्हतं. एकिकडे त्याला कळत होत कि सोनल खूपच एकटि आहे आणि ती म्हणते तशी तिला तिच्या कोणाची तरी गरज आहे, पण मग नीता? ती तर त्याच्यावर आपलं सर्वस्व अर्पण करून त्याच्याबरोबर संसार करत होती. नीतानं जतिनला अशावेळी मानसिक आधार दिला होता जेव्हा त्याला त्याची नितांत अवश्यकता होती. पुढचे दोन दिवस असेच विचार करण्यात गेले. मधे एक दोन वेळा सोनलचे त्याला एस एम एस पण आले होते, प्रत्येकवेळि ती त्याला ती कशी एकटि आहे हेच पटवून द्यायचा प्रयत्न करत होती. जतिनवर आता दडपण वाढत चालल होतं, तो घरातही उदास रहायला लागला होता, त्याच कशातच लक्ष लागत नव्हत, नीताच्या पण हि गोष्ट लक्षात आली होती पण तिनं असेल कदाचित ऑफिसमध्ये टेन्शन असा विचार करत कानाडोळा केला होता आणि असपण जतिन तिच्याशी ऑफिस मधल्या गोष्टींबद्दल कधीच बोलत नसे. गुरुवारी रात्री जतिनला अजिबात झोप येत नव्हती, तो नुसताच बिछान्यावर पडून उद्या सोनलला काय निर्णय द्यायचा ह्याचा विचार करत होता. ’काय कराव काहिच कळत नाहिये, काय हरकत आहे, एके काळी मी सोनलवर जिवापाड प्रेम करत होतो आजही कुठेतरी ती माझ्या ह्रदयात आहे. ती मला तिच्याबद्दल लग्न तर करायला सांगत नाहिये फक्त आमच्या प्रेमाचं प्रतिक मागते आहे. बरे ती म्हणते तसं जर ती कायम अमेरीकेला सेटल होणार असेल तर मग काय बिघडलं. राहिली गोष्ट नीताची तर ती समजुतदार आहे, पुढे काहि दिवसांनी तिला सगळ काहि सांगता येईन. शुड आय से येस टु सोनल?" तो कुठल्याच अशा ठाम निर्णयापर्यंत पोहोचत नव्हता.
दुसऱ्या दिवशी सकाळीच सोनलन त्याला परत मधुमालतीला लंच करता बोलावल. बरोबर दिड वाजत दोघं हॉटेलमध्ये भेटले. दोघांचेही चेहेरे एकदम गंभीर होते. मग सोनलन वेटरला जेवणाची ऑर्डर दिली. तिनं जतिनच्या हातावर आपला हात ठेवला आणि त्याला विचारल.
"जतिन, मग काय ठरलं तुझं? आय होप तू तयार आहेस."
"होय, पण"
"वा, आता प्लीज कुठलाही पण नको. मी उद्याचीच डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेते."
जतिन आता पुन्हा संपूर्णपणे द्विधा मन स्थितीत गेला होता.
"जतिन, अरे तू इतका का विचार करतोयस? अरे आपण आपल्या बाळाला जन्म देतो आहोत आणि तेहि मेडिकल सायन्सची मदत घेऊन कुठलेही शरीर सबंध ठेवून नाहि रे."
जतिन काहिच बोलला नाहि. पुढे सोनल त्याला ती जे काहि म्हणते आहे हे कसे बरोबर आहे पटवून देण्याचा प्रयत्न करत होती आणि ती बरीचशी यशस्वीपण झाली होती.
जतिन अजूनही तसाच डिस्टर्ब वाटत होता. संध्याकाळी जेव्हा तो घरी पोहोचला तसं नेहमीप्रमाणे श्रेयु त्याला येऊन बिलगली, पण जतिननं तिला काहिच प्रतिसाद दिला नाहि. तो नुसताच सोफ्यावर बसून राहिला. मग श्रेयु परत आपल्या खेळात मग्न झाली, नीताच्या मात्र हि गोष्ट खूपच खटकली. ती जतिनच्या जवळ येऊन बसली, मग आगदि प्रेमानं त्याचा हात हातात घेत म्हणाली.
"काय रे सगळ ठिक आहे ना? गेले काहि दिवस मी पाहतेय तू खूपच डिस्टर्ब दिसतोयस. ऑफिसमध्ये काहि प्रॉब्लेम आहे का?"
जतिननं निर्विकारपणे तिच्याकडे पाहिल आणि म्हणाला
"काहि नाहि जरा थकलोय बस."
पण नीताला कळत होत कि त्याच कुठेतरी काहीतरी बिनसलय, मग जास्त ताणत बसता ती म्हणाली.
"ठिक आहे, चल पटकन फ्रेश हो मी जेवायला वाढते."
जतिन फ्रेश होऊन जेवायला बसला, पण त्याच जेवणात लक्षच नव्हत तो स्वतःच्याच तंद्रीत होता. आता मात्र नीताला त्याची खूपच काळजी वाटायला लागली होती. रात्री झोपताना नीता जतिनच्या उशाशी येऊन बसली, मग हळूवारपणे त्याच डोक स्वतःच्या मांडीवर ठेवलं आणि त्याच्या केसांतून हात फिरवत त्याला म्हणाली.
"जतिन, मी तुला आजपर्यंत असं टेन्शनमध्ये कधीच पाहिल नव्हत, तुझं काहि तरी बिनसलय. मी तुला फोर्स करणार नाहि. पण मला सांगितलंस तर कदाचित तुला थोडं हलक वाटेल."
जतिननं तिच्या डोळ्यात पाहिल, त्याला तिच्या डोळ्यात त्याच्याबद्दलची प्रचंड काळजी दिसत होती. ती अगदी मनापासून बोलत होती.
"तुला एक सांगु जेव्हा मी तुझ्याशी लग्न केलं, तेव्हा मी माझं सर्वस्व तुला अर्पण केलं. माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे, आणि तू कधीही चुकीचा निर्णय घेणार नाहिस ह्याची मला खात्री आहे. जेव्हा मी माझ्या बाबांचं घर सोडून तुझा हात पकडला तो तुझी आयुष्यभर साथ देण्याकरता, तेव्हा तू स्वतःला एकट समजु नकोस मी तुझ्याबरोबर कुठल्याही संकटाला सामोरं जायला तयार आहे. पण असा शांत राहु नकोस रे."
जतिननं तिला एक गोड स्मित दिलं आणि म्हणाला.
"काहि नाहि एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा होता म्हणून विचारात पडलो होतो. पण आता मी निर्णय घेतलाय. तू झोप आता खूप रात्र झालीय."
मग जतिन आणि नीता दोघेही झोपी गेले.
दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळि जतिन नेहमीपेक्षा लवकरच उठला, तो संपूर्णपणे तणावमुक्त वाटत होता. नीता अधिच उठली होती ती किचनमध्ये तिची रोजची सकाळची काम आटोपतं होती. जतिनपण उठून किचनमध्ये गेला आणि किचनच्या दरवाज्यात उभा राहुन शांतपणे नीताकडे पहात राहिला. नीता आपल्याच तंद्रीत काम करत होती, तेवढ्यात तिचं लक्ष जतिनकडे गेलं तशी ती एकदम दचकली मग म्हणाली
"अरे, तू इतक्या लवकर उठलास? आज तर शनिवार आहे तुला सुट्टी आहे ना?"
जतिन तिच्याजवळ गेला मग तिचा हात हातात घेत म्हणाला.
"थँक्स नीता."
"कशाबद्दल?"
"काहि नाहि असंच, चल लवकर आवर आपण आता महाबळेश्वरला चाललोय"
"महाबळेश्वर? आणि असं अचानक?"
"बस काहिहि बोलु नकोस आपण तासाभरात निघतोय."
असं म्हणून तो तिथून निघून गेला, नीता स्वतःशीच हसली आणि पुन्हा उत्साहानं कामाला लागली. तासाभरात तिघेही तयार होऊन कारमध्ये बसले. जतिन गाडी स्टार्ट करणार तेवढ्यात त्याचा फोन वाजला, समोरन सोनल फोन करत होती. जतिननं फोन सायलेंट मोडवर टाकला आणि नीताकडे पाहिलं. नीता त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पहात होती. त्यान पटकन एक एस एम स टाईप केला आणि सोनलला पाठवला, मग गाडी स्टार्ट केली आणि महाबळेश्वरचा रस्ता धरला.
इथे सोनल खूपच काळजीत पडली होती कि जतिन फोन का उचलत नाहिये तिनं दोन तीन वेळा ट्राय केला पण समोरन काहिच उत्तर नव्हत, तेवढ्यात तिला जतिनचा एस एम एस मिळाला त्यात लिहिल होत "आय कान्ट डु धीस, सॉरी. मला विसरून जा". सोनलन तो एस एम एस वाचला आणि तिचे डोळे पाणावले, तिनं आपले दोन्ही हात चेहेऱ्यावर ठेवले आणि जोरजोरात रडू लागली.
सोमवारी संध्याकाळि नेहमीप्रमाणे जतिन ऑफिसमधून घरी येत होता, बिल्डिंगच्या पार्किंग लॉटमध्ये गाडी लावून तो घराच्या दिशेने निघाला तेवढ्यात त्याला एक एस एम एस आला त्यान तो ओपन केला तर तो सोनलचाच होता त्यात लिहिल होत "जतिन, थँक्स फॉर एव्हरीथिंग. तुला हा मेसेज जेव्हा मिळेल तेव्हा मी इंडिया सोडून कायमची निघून गेलेली असेल. तुला विसरण ह्या जन्मात तरी शक्य नाहि. फक्त तुझीच सोनल" आणि तो मेसेज वाचून जतिनचे डोळे पाणावले होते.
समाप्त

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
प्रतिक्रिया नोंदवा