सुजयनं मनगटावरच्या घड्याळात पाहिल, साडेसहा वाजले होते. त्यानं पुन्हा रेस्टॉरंटच्या दरवाजाकडे पाहिल तसं त्याच्या चेहर्यावरचे त्रासिक भाव आजुनच गडद झाले. त्यान कॉफीचा एक घोट घेतला आणि मोबाईलवर एस एम एस टाईप केला ’आर यू कमिंग?’. तेवढ्यात त्याला रीचा येताना दिसली. ती लगबगीनं त्याच्या समोर बसत त्याला म्हणाली
"अरे सुजय तू आहेस तरी कुठे, किती दिवस झाले तू ना माझा फोन उचलतोयस ना एस एम एस ला उत्तर देतोयस. आणि हे असं अचानक कस काय बोलावलंस? बरं ते जाऊ दे सगळ. आय हॅव ए व्हेरी गुड न्य़ूज टु शेअर विथ यू. माझ पी एच डि च थीसिस सगळ्यांना इतकं आवडल कि यूनिव्हर्सिटीनं ते अमेरिकेला पाठवायच ठरवल आहे. आहे ना छान बातमी."
"हो छान बातमी आहे ना." सुजय ओशाळलेल्या स्वरात म्हणाला.
"का रे तुला आनंद नाहि झाला का?"
"हो झाला ना, कारण इथे फक्त आपण नेहमी तुझाच आनंद साजरा करतो."
"म्हणजे?"
"म्हणजे, तू, तुझं करीयर आणि तुझ्या अचिव्हमेंट."
"ओह... सेम स्टोरी अगेन. आपण दुसर्या कुठल्या तरी विषयावर बोलु शकतच नाहि का?"
"नाहि, कारण आपले सगळे विषय हे फिरून तू आणि तुझं करीयर यातच येऊन अडकतात."
"सुजय, मला माहितीये मी तुला गेले काहि महिने अजिबात वेळ देउ शकले नाहिये पण..."
"पण... काय करणार तुझ्या प्रायोरिटी लिस्टमध्ये मी सगळ्यात शेवटि येतो."
"अरे तसं काहिही नाहि रे. मी ...."
"तू मघाशी म्हणालीस तू मला फोन केलेस, गेल्या चार आठवड्यात तू मला किती असे फोन केलेस गं? एक किंवा दोन आणि एस एम एस म्हणशील तर ते हि दोन शब्दांचे दोन, चार."
आता रीचाचा चेहरा एकदम गंभीर झाला होता.
"तुला काय म्हणायचय मी हे सगळ मुद्दाम करत होते. मी कुठल्यातरी महत्त्वाच्या कामात बिझी होते. आणि एवढच होत तर मग तु का नाहि फोन केलास मला?"
"रीचा गेले दोन वर्ष आपण रिलेशन मध्ये आहोत पण मला सांग तू किती वेळा स्वतःहून असे मला फोन केलास? आठवतय तुला?"
रीचा काहिच बोलली नाहि.
"हे बघ रीचा मला ह्या सगळ्या वादात पडायच नाहिये कारण आपण आधीही ह्या विषयावर बरेच वाद घातलेत. मी गेले काहि दिवस आपल्या रिलेशन बद्दल खूप गांभीर्यान विचार करतोय आणि मी ह्या निर्णयापर्यंत पोहोचलोय कि ईट्स नॉट वर्कींग एनी मोर."
"म्हणजे तुला काय म्हणायचय काय?"
"म्हणजे लेट्स हॅव अ ब्रेक अप."
"ब्रेक अप,"
तिच्या काळजाला एकदम धस्स झालं.
"हो ब्रेक अप, रीचा आपल्या दोघांचे मार्ग खूप वेगळे आहेत. तुझ्या लेखी प्रेम हे दुय्यम स्थानावर येत आणि करीयर हे प्रथम. पण माझ्या दृष्टिने हे दोघेही घटक तितकेच महत्त्वाचे आहेत. तुला कळतय मी काय बोलतोय ते?"
"हो... पण सुजय प्लीज असा कुठलाही निर्णय आपण घाईघाईत घेऊ शकत नाहि. हे बघ सगळ काहि ठिक होईल. मला थोडा वेळ दे"
"किती वेळ? गेले वर्षभर मी तुझी नुसती वाटच पहात आहे पण तू कधी आलीसच नाहि, आणि... आणि ह्या सगळ्याला आता खूपच ऊशीर झालाय."
"ऊशीर झालाय? म्हणजे"
"म्हणजे आय एम इन्व्हॉल्व्ह इन समवन एल्स"
"काय?"
रीचा एकदम सुन्न झाली तिला सुजयन दिलेला हा दुसरा धक्का होता.
"तू असं करू शकत नाहिस सुजय. तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे. सांग तू हे सगळ खोट आहे म्हणून. तू माझी चेष्टा करतोयस ना?"
"नाहि रीचा मी अगदी सीरियस आहे. आपण दोघं एकमेकांबरोबर कधीही सुखी होऊ शकणार नाहि. हे बघ मी तुझ्या करीयरच्या अजिबात विरोधात नाहि पण माझा आणि तुझा आयुष्याकडे बघण्याच दृष्टिकोन भिन्न आहे."
आता मात्र रीचाला रडू फुटलं तिला हे सगळच अनपेक्षित होत.
"रीचा हे बघ रडू नकोस. पण ज्या झाडाला वर्षानुवर्ष पाणी देऊन सुद्धा फळ येतं नसतील तर ते उपटून टाकल तर काय वाईट?"
रीचा स्वतःचे डोळे पुसत म्हणाली
"खर बोलतोयस तू सुजय, पण दोघांनी मिळून लावलेल्या झाडाला कधीच फळ येणार नाहित असं ठरवून उपटून टाकणारा तू एकटा कोण. हो मला कबूल आहे मला तुझ्यासारखं शब्दातून, स्पर्शातून प्रेम व्यक्त करता येत नाहि, पण म्हणून मी तुझ्यावर प्रेम करतच नाहि असा तर अर्थ होत नाहि ना. मी जरी तुझ्यापासून दूर असले तरी माझ्या ह्रदयात तर सदैव फक्त तूच असतोस ना. पण हे तुला कस काय कळणार. तू बरोबर बोललास आपले मार्ग भिन्न आहेत."
असं म्हणत रीचानं टेबलावर ठेवलेली आपली पर्स उचलून तिथून निघून गेली आणि सुजय नुसताच कोर्या चेहर्यानं तिच्या पाठमोर्या आकृतीकडे पहात राहिला.

Hey Kedar.... Kasa aahes ? after so many years I visited ur blog.... Nice post....
उत्तर द्याहटवा