वीक-END - भाग - १

सकाळची वेळ होती, आकाश ढगांनी पूर्णपणे वेढून गेलं होतं. मधेमधे पावसाच्या छोट्या मोठ्या सरी येत होत्या. दस्तुरीला गाडि पार्क करून सागर आणि मीता नाक्यापर्यंत चालत आले, मग टॅक्स भरून दोघांनीही त्या छोट्या खानी गेटमधून आत प्रवेश केला. ते दोघं थोडं पुढे चालत आले तसे घोडेवाले त्यांच्या मागे लागले. पण  कुणाकडेहि लक्ष न देता ते दोघं थोडं अजुन पुढे चालत आले. त्यांना ठरवलेल्या जागेवर एक ठेंगणा माणूस दोन तगडे घोडे घेऊन उभा असलेला दिसला. दोघं आपापल्या खांद्यावरची सॅक सांभाळत त्याच्याकडे गेले.
"हॉटेल माऊंटन व्ह्यू, इर्फ़ान?"
त्या घोडेवाल्याने नुसतीच मान हलवली, मग त्या दोघांनाही घोड्यावर चढवून आणि स्वता त्या घोड्यांना खेचत त्यांच्यापुढे चालु लागला. मीताला त्या माणसाचं वागण थोडसं विचित्र वाटल पण मग तिनं त्याकडे दुर्लक्ष केलं. मीता माथेरानला तशी आधीपण खूपवेळा आली होती पण पावसाळ्यात मात्र पहिल्यांदाच येत होती. तिला खूप छान वाटत होत, वातावरणातला तो गारवा तिला अगदी मोहरुन टाकत होता. सभोवतालचे डोंगर मस्तपैकी हिरव्या शाली पांघरुन जणु थंडीपासून स्वतःचं संरक्षण करत होते. झाडांच्या पानावरून पडणारे पाण्याचे थेंब मोत्यासारखे जमिनीवरच्या डबक्यात पडत होते. सगळि जमिन नुसती लाल मातीच्या चिखलानं सारवून निघाली होती. घोडे तो लाल मातीचा चिखल तुडवत सांभाळून चालत होते त्याहीपेक्षा तो इर्फान त्यांना अगदी व्यवस्थित जपून नेत होता. मीता एकीकडे असं विलोभनीय सृष्टि सौन्दर्य आपल्या नजरेत साठवत होती तर सागर आपल्या कॅमेरात. मीताच लक्ष परत एकदा ईर्फानकडे गेलं तो अगदी सराईतपणे त्या गाड्यांसोबत चालत होता.
"भैया, और कितना दूर है ये हॉटेल?"
त्यानं अजिबात मागे न बघता उत्तर दिलं
"इथून माथेरान अर्धा तास आणि मग तेथून पुढे हॉटेल एक तास."
त्याने मराठीत दिलेल्या उत्तरान मीता एकदम चपापलीच तसे सागर तिच्याकडे मिस्किलपणे बघून हसला. थोड्याच वेळात ते मार्केट रोडवर आले, शनिवार असल्यामुळे तेथे चांगलीच गर्दी होती. दुकान, रेस्टॉरंट सगळ कस एकदम गजबजलेलं होत. मार्केट पार करून घोडे सनसेट पॉईंट्च्या दिशेने जाऊ लागले. जसे ते आत आत जाऊ लागले तसा रस्ता सुनसान होत चालला होता. हवेतला गारवा पण आता जरा जास्तच जाणवु लागला होता. जवळ जवळ अर्ध्या तासाच्या रपेटिनंतर त्यांना एक चहाची टपरी दिसली.
"ईर्फान, आपण थोड इथे थांबु. जरा चहा पिऊन मग पुढे जाऊ."
सागर ईर्फानला म्हणाला आणि त्यान नेहमीप्रमाणे मान हालवली, मग त्यान दोघांनाही घोड्यावरून उतरवल आणि स्वता घोडे घेऊन एका कोपर्‍यात जाऊन उभा राहिला.
"ईर्फान, चहा?"
त्यानं परत एकदा मानेनच नकार दर्शवला. सागरनं टपरीवाल्याला मस्तपैकी दोन कडक चहाची ऑर्डर दिली आणि दोघं बाजूच्या शेडमध्ये ठेवलेल्या बाकड्यावर बसले.
"काय रे सागर अख्ख्या माथेरान मध्ये तुला हेच एक हॉटेल सापडले होत का? केवढं लांब आणि आतमध्ये आहे."
"अगं तूच तर म्हणाली होतीस ना वीकएंड आपण एखाद्या शांत जागी घालवू, कोणीच नको फक्त तू आणि मी. त्या दिवशी लोकलनी घरी येताना राहुलशी अशा एकांत ठिकाणाबद्दल डिस्कस करत होतो तेव्हा समोरच्या सीटवर बसलेल्या एका माणासानी ह्या हॉटेलच खूप कौतुक केल आणि फोन नंबरही दिला. म्हटल चला बघायला काय जातय नाहि पटल तर दुसर्‍या एखाद्या हॉटेलमध्ये जाऊ. माथेरान मध्ये हॉटेलची काहि कमी आहे का."
"तू पण ना! कुठल्याहि अनोळखि माणसावर विश्वास ठेवतोस बघ."
"जाउ देत ग ते सगळ आणि तुला पटल नाहि तर फिरू परत माघारी आपण काहि पैसे भरले नाहियेत तिथे. बघ जरा किती सुंदर हिरवागार वातावरण आहे, सगळ कस एकदम रोमॅन्टिक वाटतय. मला तर अस झालय कधी एकदाच हॉटेलमध्ये जाऊन तुला घट्ट मिठीत घेतोय."
मीताला डोळा मारत आणि आपल्या गालावरच्या खळ्या दाखवत तो म्हणाला.
"चल चावट, अजिबात नाहि आणि अशा अनोळखी ठिकाणी तर मुळीच नाहि. मला खूप भीती वाटते."
"माझ्या मिठीत आलीस कि सगळी भीती दूर होईन तुझी."
मग ती लाजल्यासारखे त्याच्याकडे बघुन हसली, त्याचा हात आपल्या हातात घेत लटक्या स्वरात म्हणाली.
"आपण एवढ्या लांब राहाणार मग शॉपिंग कस काय करणार?"
"अगं ते उद्या जाताना करू"
मग चहावाल्याला पैसे देऊन ते दोघं पुढच्या प्रवासाला निघाले.

रस्त्याच्या दुतर्फा इतकि दाट झाड होती कि सकाळ असूनही संध्याकाळ झाल्यासारखी वाटत होती त्यात भरीस भर म्हणून पावसाळी वातावरण. मीतान इर्फानला परत विचारल.
"भाईसाहब, अजून किती वेळा लागेल?"
"अजून वीस एक मिनिट तरी लागतिल."
मीता परत आजूबाजूला बघु लागली, तेवढ्यात तिच लक्ष एका पडक्या बंगल्याकडे गेलं, त्या बंगल्याच गेट म्हणजे आता तिथं गेट नव्हतच नुसतेच दोन खांब होते त्यापैकी एका खांबावर एक पांढरी पण खूप मळलेली फरशी लावली होती आणि त्यावर काळ्या अक्षरात नाव कोरल होत "विलियम स्काऊट", तिनं तो बंगला सागरला दाखवला.
"अगं पूर्वी तर असे इथे बरेच बंगले होते म्हणे. ब्रिटिशांनी त्यांच्या काळात ते बांधुन ठेवले होते. पुढे ते निघुन गेले आणि हे बंगले त्यांच्या नोकरांना मिळाले. काहीनी ते नीट मेंटेन केले तर काहींनी दुर्लक्षित केले."
घोड्यांनी त्या बंगल्याच्या बाजूनी वळण घेतल आणि चिखल तुडवत पुढची चढण चढू लागले.
"सागर, कीती भीतिदायक आणि भयाण वाटतोय रे तो बंगला. इथं भूत वगैरे पण असतील."
"हो मग अशा बंगल्यामध्ये भूत असतात तर"
तो परत एकदा मिश्किलपणे मीताकडे बघत म्हणाला, तशी ती त्याला म्हणाली.
"तू मला घाबरवु नकोस हं. नाहीतर मी अशी परत जाइन इथून, मला तुझं ते हॉटेलही नको आणि वीकएन्ड हि नको."
"अगं एवढि काय वैतागते गंमत केली मी तुझी. अशी कधी भूत असतात का? आणि तुझ्याबरोबर माझ्यासारखा भूत असल्यावर कुठल्या दुसर्‍या भूताची तुझ्याजवळ यायची हिंमत तरी होईल का"
तिनं त्याच्याकडे परत एकदा रागाने पाहिल.

पुढिल भाग लवकरच...

1 टिप्पणी:

प्रतिक्रिया नोंदवा