वीक-END

मीताला काहि कळायच्या आतच ती तेथे भोवळ येऊन पडली. थोड्यावेळाने जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हासुद्धा सागरचा तो मृतदेह झाडाला तसाच लटकत होत. तिनं मुदतीकरिता आजूबाजूला पाहिल पण तेथे कोणीच नव्हत, कालपर्यंत गजबजलेले ते हॉटेल आज एकदम शांत होत तिला आश्चर्याचा जबर धक्का बसला. ती तशीच धावत रिसेप्शनमध्ये आली पण तेथे पण कोणीच नव्हत. संपूर्ण हॉटेलमध्ये भयाण शांतता पसरली होती. कुठे हो मनुष्याचा मागमूसही जाणवत नव्हता. ती परत मागे आली आणि झाडाला लटकणार्‍या सागरला खाली उतरवण्याचा प्रयत्न करू लागली पण तिला ते जमत नव्हतं. ती तशीच त्याच्या पायाशी बसून ढसाढसा रडत बसली मग क्षणार्धात तेथून उठली आणि हॉटेलच्या मुख्य दरवाजातून बाहेर आली. ती मिळेल त्या रस्त्यानी तिथुन नुसती पळत होती. मध्येच रस्त्यात तिला काल त्यानी चहा प्यायला होता ती टपरी लागली पण ती टपरी बंद होती. ती तशीच पुढे धावत सुटली, पण आता तिच्यात धावण्याचा सुद्धा त्राण उरलं नव्हत तिची गती मंदावली होती, तिला इतका दम लागला होत कि शेवटि ती तशीच खाली बसून राहिली पण काहि वेळातच एखादा शॉक लागावा तशी ती उठली आणि परत धावु लागली. आता धावताहि येत नव्हत म्हणुन ती शक्य तितक्या जोरात चालु लागली. आता तिला रस्त्यावर तुरळक लोक पण दिसू लागली होते सकाळची वेळ असल्यामुळे रस्ते आजुनही सुनासुनाच होते. कशीबशी ती मार्केटपर्य़ंत आली आणि मार्केटच्या तोंडापाशी असलेल्या एका दुकानासमोर येऊन बेशुद्ध पडली.

दुकानाचा बाहेर झालेला आवाज ऐकुन रत्नाबाई धावतच बाहेर आल्या आणि त्यांनी दुकानाच्या पुढ्यात पडलेल्या मीताला पाहिल. मीताचं संपूर्ण शरीर चिखलानं माखलेलं होतं, तिचा चेहरा भीतीनं पांढरा पडला होता. मग रत्नाबाईनी चार लोकांच्या मदतीनं तिला दुकानाच्या मागे असलेल्या आपल्या घरात नेलं. थोड्याच वेळात मीताला शुद्ध आली. तिला काहिच कळत नव्हत ती कुठे आहे, ती जशी शुद्धीवर आली तशी जोरजोरात किंचाळायला लागली. तसं रत्नाबाई आणि आजूबाजूच्या चार बायकांनी तिला शांत केले, तिला पाणी प्यायला दिलं. पाणी प्यायल्यावर मीताला जरा बरं वाटायला लागलं. 

थोड्याच वेळात तिथे दोन पोलिस आले. त्या दोघा पोलिसांनी बाकीच्या सगळ्या लोकांना तेथून निघुन जायला सांगीतलं. रत्नाबाईंनी तिला चहा दिला, चहा पिऊन मीता जरा शुद्धीवर आल्यासारखी वाटायला लागली. मग त्या दोघा पोलिसां पैकी जी एक लेडिज पोलिस होती तिनं मीताला विचारल.
"बाई, बर वाटतय ना आता?"
मीता नुसतच शुन्यात जाऊन तिच्याकडे पहात राहिली तसं तिनं परत मीताला हटकलं.
"अहो बाई"
मीतान एकदम दचकून तिच्याकडे पाहिल.
"आहो कोण तुम्ही? काय झाल? इतक्या का घाबरल्यात तुम्ही?"
मीतान कालपासून झालेला सगळा प्रकार त्यांना सांगितला, रत्नाबाई पटकन म्हणाली.
"अरे देवा म्हणजे ह्या भूतावळित गेल्या होत्या तर."
"भूतावळि"
मीतानं आश्चर्यानं विचारल, ते दोघं पोलिसही रत्नाबाईकडे पाहु लागले. मग त्यातली जी लेडि कॉन्स्टेबल होती ती रत्नाबाईला म्हणाली.
"भूत? आहो बाई काय म्हणतायत तुम्ही? मी इथे गेले पाच वर्ष काम करतेय पण मी तर असं कधीच ऐकल नव्हत."
"तुम्ही विश्वास ठेवा अगर नका ठेवु त्या जागेत भूत आहे. असं म्हणतात कि साधारण एक चाळिस वर्षापूर्वी हेलिना नावाच्या एका पारसी बाईनं तिथे मागच्या बाजुला आडोश्याच्या डोंगरावर एका गोर्‍यांच्या बंगल्यात एक हॉटेल चालु केल. त्या काळात ते इथलं सगळ्यात चांगलं हॉटेल होत पण अचानक एक दिवस सकाळि तिथे हेलिनासकट हॉटेलच्या सगळ्या लोकांचा खून झाला होता. तेव्हापासून म्हणतात त्या बंगल्यात भूताच वास्तव्य आहे. ज्या लोकांनी हेलिना आणि त्या हॉटेलचा सर्वनाश केला त्यांना हेलिन त्या जागी आणुन मारते."
"आहो पण ह्याचा माझ्या पतीशी काय संबंध?"
"पोरी, हि भूत बदला घेण्याकरता जन्म जन्मी पिछा सोडत नाहित. आत्म्याला आत्मा बरोबर दिसतो."
रत्नाबाईच बोलत होत्या तेवढ्यात ती लेडि कॉन्स्टेबल उठून उभी राहिली आणि म्हणाली.
"रत्नाबाई, काय बोलतायत तुम्ही हे? छे! माझा नाहि असल्या भाकड कथांवर विश्वास. मीताबाई तुम्हाला जर ठिक वाटत असेल तर चला आपण जाऊन बघु तिथे. जा रे गणपत तीन घोडे घेऊन ये आपल्यासाठी".
मीता एकदम गोंधळुन गेली होती ती झपकन उभी राहिली. थोड्याच वेळात गणपत तीन घोडे घेऊन आला. गणपत एका घोड्यावर बसला आणि ती लेडि कॉन्स्टेबल दुसर्‍या घोड्यावर बसली. तिसर्‍या घोड्यावर मीता बसली ज्याची लगाम एका पोराच्या हातात होती.

चौघेही साधारण वीस ते पंचवीस मिनिटांच्या रपेटिनंतर त्या चहाच्या टपरी जवळ आले, मीताला आता पुढचा रस्ता चांगलाच माहिती होता. थोड्याच वेळात ते त्यांना जाताना आधी जो ब्रिटिशकालीन बंगला लागला होता तिथे आले आणि मग तिथुन आत वळण घेउन त्या चौघांनी हॉटेलच्या दिशेने कुच केली. थोड्याचवेळात ते हॉटेलच्या जागी पोहोचले आणि समोरच ते दृष्य मीता आश्चर्यानं पहातच राहिली. अगदी सकाळपर्यंत असणारी ती हॉटेलची टुमदार ईमारत तिथे नव्हती तर होती एक जीर्ण झालेली पडकि ईमारत. त्या कालच्या बगीचाच्या जागी होत बकालपणे वाढलेल गवत आणि रानटी झाडं.
"बाई, तुम्हाला असं म्हणायचय तुम्ही काल इथं राहिला होतात?"
ती कॉन्स्टेबल मीताला म्हणाली.
"हो! म्हणजे जागा तर हिच होती पण असं काहिच नव्हत! मला काहिच कळत नाहिये काय चाललय ते."
"आहो बाई चला इथून उगाच टाईमपास करताय तुम्ही आमचा."
ती कॉन्स्टेबल थोडि रागातच म्हणाली.
"आहो नाहि हो मी.... मी.....ख...खरच इथे म्हणजे!"
"चल रे गणपत, बाई तुम्हाला पण पोलिस स्टेशनमध्ये याव लागेल आमच्या मोठया साहेबांना पण सांगा जरा तुमची हि गोष्ट."
"एक मिनिट आपण ह्या बंगल्याच्या मागे जाऊन बघुया ना कदाचित सा....सागर आजुनहि असेन तिथे."
"अहो इथे साध कुत्रपण नाहि तर तुमचा नवरा कुठुन असणार"
पण मीता तिच बोलण ऐकायला तिथं थांबलीच नव्हती तिन घोड्यावरून अक्षरशहा उडी मारली आणि बंगल्याच्या आवारात प्रवेश केला. आवारतल अस्ताव्यस्त वाढलेलं गवत तुडवत ती बंगल्याच्या मागच्या बाजुला आली आणि तिच्या मागून ते तिथेसुद्धा आले.

बराच वेळ झाला तरी चौकशीला गेलेले दोघं कॉन्स्टेबल परत आले नहित म्हणून सब इन्स्पेक्टर सूर्वे आपल्या चार साथीदारांसोबत प्रथम रत्नाबाईकडे गेले. रत्नाबाईंनी त्याना झालेला सगळा प्रकार सांगितला तसे ते पाचही जण रत्नाबाईंनी सांगितलेल्या हॉटेलच्या दिशेने निघाले. थोड्याच वेळात ते त्या भकास इमारतीजवळ आले. तिथे भयाण शांतता पसरली होती. ते पाचहीजण घोड्यावरून उतरले आणि आवारातल गवत तुडवत इमारतीच्या दिशेने निघाले. त्यांनी संपूर्ण इमारती पाहिला पण कुठेच कुणी नव्हत. मग ते सगळे इमारतीच्या मागच्या बाजुला आले तसं समोरच दृष्य पाहुन त्या सगळ्यांचे हात पायच गार पडले. एका डेरेदार झाडाच्या फांदीवर चार मृतदेह लटकत होते. गणपत, ती लेडि कॉन्स्टेबल, तो घोडेवाला पोर्‍या आणि सागर आणि त्या झाडाच्या पायथ्याशी एकटक त्या चारही प्रेतांकडे बघत बसलेली मीता....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिक्रिया नोंदवा