सकाळी उठल्यापासून खूप अस्वस्थ वाटत होत. आज २५ नोव्हेंबर, अनिकेत बरोबर १ वर्षांचा झाला. मी स्वतःशीच हसलॊ. म्हणजे माझा अनिकेत आज एक वर्षानी मोठा झाला. कसा असेल तो? वर्षापूर्वी जेव्हा त्याचा जन्म झाला तेव्हा सगळे म्हणत होते त्याच्या आईची कार्बन कॉपी आहे पण मला ते मान्य नव्हतं. अरे वा दिसत असेल त्याच्या आईसारखा थोडाफार म्हणुन मी कुठेच कसा नाहि माझा मुलगा आहे तो. परवा तुषारनं फेसबुकवर त्याचा साधनानी अपलोड केलेला लेटेस्ट फोटो दाखवला आणि म्हणाला "बघ रे बाबा तुझ्या पोरानं पार्टी चेंज केली हा आता अगदी तुझ्यासारखाच दिसतोय." खरच हा तर बराच माझ्यासारखा दिसायला लागला आहे. म्हणजे असं ऐकल होत कि मुलांचा चेहरा मोहरा जसे ते मोठे होतात तसा बदलत जाते पण प्रत्यक्ष पहिल्यांदाच अनुभवत होतो. त्याचा नुसता फोटो पाहुन सुद्धा मनात एक विलक्षण आपलेपणाची भावना निर्माण झाली. हा माझाच अंश आहे ह्या जाणीवेनेच खूप छान वाटल, ते फिलींगच काहि और होत. अनिकेत मस्तपैकी दुपट्यावर पहुडला होता. टोपडाच्या आडून डोकावणारे त्याचे ते भुरभुरीत केस, टपोरे डोळे, गोबरे गाल, आणि त्यावर सुरेख ते खट्याळ हास्य खरच खूपच लोभस वाटत होता. तुषारनी अजुन एक कॉम्ल्पीमेंट दिली "बघ त्याच हसू सुद्धा अगदी तुझ्यासारखाच आहे" मी नुसतच ओशाळलेपणानी त्याला स्मित हास्य दिलं. मला एकदम माझ्या आयुष्यातल्या एका मोठ्या पोकळीची जाणीव झाली. खरच मी जीवनातल्या एका अविस्मरणीय आनंदाला मुकत होतो आणि मन एकदम सुन्न झालं.
काय कराव काहिच सुचत नव्हत. त्याला बर्थडे वीश करण्याकरता फोन करावा? पण फोन केला तरी तो कुठे करायचा अनिकेत तर काहि बोलु शकणार नाहि म्हणजे साधनाशीच बोलाव लागेल. इतक्या महिन्यानंतर आणि एवढ सगळ झाल्यावर तिच्याशी काय बोलणार. बर मी फोन जरी केला तरी ती बोलेल ह्याची काहिच शाश्वती नाहि. मागच्या आमच्या भांडणात मी तिला बरच उलट सुलट बोललो होतो, अर्थात तिनं आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे काहिच प्रत्युत्तर केले नाहि फक्त कोर्टाची नोटिस मात्र पाठवली. मला माहिती आहे सगळी चूक माझीच आहे, ह्या सगळ्याला कारणीभूत माझा चिडका स्वभावच आहे, पण तरी साधना एवढी टोकाची भूमिका घेईल अस वाटल नव्हतं. आधी काय मी तिच्यावर कधी चिडत नव्हतो का? पण ती सगळ अगदी समजूतदार पणे घ्यायची. छे!!! सगळच विचित्र होऊन बसलय. माझी नजर परत एकदा तुशारकडुन घेतलेल्या अनिकेतच्या फोटोवर गेली आणि मन एकदम भरून आल. अस वाटल कि जाव तिच्याकडे, तिची माफि मागावी आणि तिला परत घरी घेऊन याव. खरच खूप सहन केलं तिनं मला. म्हणजे तिचा तो शांत स्वभावच चार वर्ष आम्हाला एकत्र ठेवु शकला. मी चिडलो कि ती काहिच उत्तर देत नसे शांतपणे आपल काम करत बसायची आणि माझा अजूनच संताप संताप व्हायचा. पण हेही तितकच खर माझा राग निवळल्यावर ती पण सगळ विसरून जायची कमीतकमी मला तरी असच वाटायच. पण पंधरा दिवसापूर्वी ती कोर्टाची नोटिस वाचुन एक गोष्ट लक्षात आली ती राग विसरत नव्हती तर ती तो मनात साचवत ठेवत होती आणि बहुतेक तिला ते सगळ असह्य झाल असणार. आता. तिची माफि मागावी तर त्यालाही आता बराच उशीर झाला होता.
अनिकेतच्या जन्मानंतर जणू माझ जगच बदलून गेले होतं. ती माहेरी दूर असल्यामुळे जाण तस एक दोन वेळाच झाल पण बाप झाल्याचा तो आनंद शब्दात मांडण्यासारखा नक्कीच नव्हता. आमच ते छोटसं बाळ दोन महिन्याचं कस झालं कोणाला कळलच नाहि. बारसं झाल आणि मी तिला घरी परत नेण्याचा विषय काढला तेव्हा तिच्या घरच्यांनी स्पष्ट नकार दिला. तेव्हापासून आजपर्यंत अनिकेतला भेटलो नाहि. मधल्या काळात दोन्ही बाजूंनी बरच पाणी डोक्यावरून गेले होत या वेळी सुद्धा साधना नेहमीप्रमाणे शांतच होती. असं म्हणतात दोन व्यक्ती मधील सहवास आणि संवाद त्यांच्यामध्ये जवळिक निर्माण करतो पण आम्ही एकमेकांच्या सहवासात असूनही एकमेकांशी ना संवाद साधु शकलो ना जवळिक. साधना, कसं सांगु तुला पण आज परीस्थिती खूप बदलली आहे, परिस्थितीने मला खूप मोठा चटका दिला आहे. माझा राग बर्याच प्रमाणात अटोक्यात आला आहे. गेल्या वर्षभरात त्याकरता मी अगदी मनापासून प्रयत्न केले आहेत. पण मी हे तिला कस समजावु आणि जरी समजावल तरी तिचा ह्यावर विश्वास बसेल? एक ना अनेक मनात विचारांच नुसतं काहूर माजल होत. एकीकडे साधनाचा तो शांत चेहरा आणि अनिकेतच ते खट्याळ हसू तर दुसरीकडे माझा पुरुषी अहंकार. माझ मन सांगत होत जर मी साधनाची माफि मागितली तर ती माझ्याबरोबर नक्की घरी येईल पण माझा अहंकार मला ते करू देत नव्हता. माझा अहंकार माझ्या मनाच्या निश्चयावर हवी होत होता.
मोबाईलची रींग वाजली आणि मी माझ्या विचारांच्या तंद्रीतून बाहेर आलो. फोनच्या डिस्प्लेवर पाहिल तर लिहून आल होत ’Calling... Sadhana' आणि मला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला पण क्षणार्धात भीती पण वाटली. साधना आणि मला फोन करतेय! पण का? सगळ ठिक तर असेल ना? अनिकेतला तर काहि...? आणि मी झटकन फोन रीसिव्ह केला आणि "हॅलो" म्हणालो पण समोरन काहिच उत्तर आल नाहि. मी परत एकदा "हॅलो" म्हटल तर समोरन "ऍ" असा आवाज आला आणि मी लगेच ओळखल तो अनिकेतचा आवाज होता. मला खूप आनंद झाला होता काय बोलु नी काय नाहि असं झाला होत. त्याला मी बर्थडे विश केलं, त्याला मी तुझा बाबा आहे असं सांगायचा प्रयत्न केला, त्याला खूप खेळणी आणायचे प्रॉमिस केले, त्याचे खूप खूप लाड केले. अर्थात त्याला माझ बोलण त्याला किती कळत होत कुणास ठाऊक पण मला त्याची मुळीच पर्वा नव्हती मला फक्त त्याच्याशी बोलायच होत आणि तो पठठ्या समोरून वेगवेगळे आवाज काढुन जणू मी काय बोलत आहे हे त्याला कळत आहे हेच मला सांगत होता. अस आमच बराच वेळ चालु होत मग का कोणास ठाऊक पण तो अचानक रडायला लागला आणि फोन डिस्कनेक्ट झाला. मी एखाद्या हरलेल्या शिपायाप्रमाणे त्या डिस्कनेक्ट झालेल्या फोनकडे नुसताच बघत राहिलो. तेवढ्यात मोबाईलचा डिस्प्ले परत चमकला आणि लिहून आल "New Message". मी मेसेज उघडला तर आत लिहिले होत "थॅक यू बाबा. - अनिकेत" आणि माझ्या डोळ्यातून आश्रुधारा वाहु लागल्या. अनिकेतला आणि साधनाला भेटण्याच्या ऒढिन जीव अगदी कासावीस झाला. मग मनाशी घट्ट निर्धार केला आता साधनाची कितीही वेळा मफि मागायला लागली तरी चालेल पण मी माझ घर असं तुटु देणार नाहि.
काल रात्री बरोबर बारा वाजता मोबाईलची रींग वाजली तसं मी मोठ्या उत्कंठेने डिस्प्लेवर पाहिलं तर माझी लाडकी बहिण गीताचा फोन होता. थोड ओशाळल्यासारख झाल कारण मला हा फोन अपेक्षित नव्हता. मग गीताशी अगदी मनसोक्त गप्पा मारल्या. तिनं अनिकेतला बर्थडे विश करण्याकरता फोन केला होता पण हा पठठ्या मात्र कधीच झोपला होता. सकाळि उठल्यावर सुद्धा बरेच फोन आले, एस एम एस आले पण विशालकडुन काहिच रिस्पॉन्स नव्हता. मन खूप उदास वाटत होत. वरुन हसरा वाटणारा माझा चेहरा आतुन किती वेदनेने पोखरला आहे हे आईनं बरोबर ऒळखल. तिनं माझ नेहमीप्रमाणे सांत्वन केलं येईल त्याचा पण फोन येईन पण मला शाश्वती वाटत नव्हती कारण मला माहिती आहे तो खूप हट्टी आहे. वर्षभरात जे काहि झाल ते खुपच दुःखद होत.
परवा फेसबुकवर मुद्दाम अनिकेतचा फोटो अपलोड केला आणि फक्त तुषारशी शेअर केला मला खात्री होती तो नक्कीच विशालला दाखवेल. अनिकेतचा फोटो पाहुन विशालला नक्कीच आनंद झाला असेल. वर्षापूर्वी जेव्हा अनिकेत झाला तेव्हा तो किती खूष होता. बाळाच्या आगमनाची बातमी कळताच ताबडतोब मिळेल त्या मार्गानं भेटायला आला होता. दादाचा तर अनिकेतच्या जन्माची बातमी विशालला कळवायला पण विरोध होता पण मग आईच्या सांगण्यावरून फक्त एस एम एस केला. मी विशालच्या स्वभावाबद्दल कधीच घरी बोलले नव्हते. पण जेव्हा बाळंतपणाला इथे आले, आणि सगळ्यांनाच माझ्याकडे पाहुन खूप आश्चर्य वाटल. माझी तब्येत अगदी खालावली होती, डोळ्याखाली काळि वर्तुळ आली होती. तसं घरच्यांना विशालच्या तापट स्वभावाची थोडीफार कल्पना होतीच पण पाणी एवढं डोक्यावरनं गेले असेल असं वाटल नव्हत. माझे माहेरचे लोक तसे जुन्या वळणाचे, लेकीच्या घरचं पाणी पण प्यायचं नाहि ह्या विचारांचे त्यामुळे प्रत्यक्ष भेट फार कमी व्हायची त्यात दोन्ही शहरांमध्ये अंतर पण खूप होत. विशालला सुद्धा मी माहेरी गेलेलं विशेष नाहि आवडायचं. आधी सासू, सासरे होते तेव्हा माहेरी येण होई पण त्यांच्या पश्चात फारच कमी झाल होत.
विशालचा त्याच्या रागावर कंट्रोल नाहि हे एक सोडल तर तो खूप चांगला माणुस आहे. पण अगदी क्षुल्लक गोष्टीवर तो इतका संतापतो कि समोरच्यास काहिच सुचत नाहि. जेव्हा नवीन नवीन लग्न झाल तेव्हा तर मी खूपच घाबरून जायचे मग माझ्या सासुबाईच मध्ये पडुन जरा वातावरण शांत करायच्या. माझा स्वभाव लहानपणापासूनच तसा शांत आणि बुजरा होता. लहानपणी सुद्धा मला कोणी ओरडल कि मी त्याला अजिबात ऊलट उत्तर देत नसे पण मनात मात्र कुढत बसे. विशालच्या बाबतीत माझ तेच होत होतं. मी नुसतीच मनात कुढत बसे आणि त्याचा परिणाम हळुवार माझ्या तब्येतीवर व्हायला लागला होता. विशालचे आई बाबा आजारपणामुळे एकापाठोपाठ गेले तसा विशालचा चिडचिडेपणा अजूनच वाढत गेला. आता तर त्याला कंट्रोल करायला पण कोणीच नव्हत, खूप मानसिक त्रास व्हायचा. मला कळायच हा मनुष्य माझ्यावर अगदी जीवापाड प्रेम करतो आहे पण....
बाळंतपणाला घरी आले आणि माझी तब्येत पुन्हा सुधारू लागली. एकदा भावनेच्या भरात चुकून वहिनीसमोर मनातलं बोलुन गेले आणि जे नको होत तेच झाले. अनिकेतच्या बारशानंतर विशालनं जेव्हा आम्हाला घरी न्यायचा विषय काढला तेव्हा बाबा आणि दादानं त्याला चक्क नकार दिला. मला काहिहि नं विचारता त्यांनी हा निर्णय परस्पर घेतला होता. आईनं तेव्हा बाबांना सुचवल पण होत कि पोरीची इच्छा तरी जाणून घ्या तरी ते दोघं स्वतःच्या निर्णयावर ठाम होते आणि मी, नेहमीप्रमाणेच शांत बसून रडत राहिले. इथे विशालचा मात्र असा समज झाला कि मला त्याच्याकडे यायचय नाहि आणि म्हणुन मीच हे सगळ करते आहे. मी त्यावेळी त्याला फोन करुन सगळ समजावयाचा प्रयत्न केला पण तो इतका चिडला होता कि त्यानं माझा एकही फोन उचलला नव्हता. मग मी पण हट्ट सोडला दिवस जात होते त्यान मधल्या काळात परत माझ्या घरच्यांशी बोलणी करायचा प्रयत्न केला पण सगळ निष्फळ ठरलं. साधारण महिन्याभरापूर्वी तो परत इथे आला होता तेव्हा मी ठरवून त्याच्यासमोर गेले आणि मला बघताच त्याचा पारा पुन्हा सुटला आणि तो सुद्धा आई आणि वहिनी समोर. तो मला रागाच्या भरात बरच काहि बोलला आणि मी नेहमी प्रमाणे सगळ शांतपणे ऐकुन घेतलं पण त्या दोघी मात्र एकदम घाबरून गेल्या. तो तसाच तेथून निघुन गेला आणि पंधरा दिवसातच घरच्यांनी माझ्याकडून एका कागदावर सहि घेतली तो कागद म्हणजे त्याला पाठवलेली घटस्फोटाची नोटिस होती. मी खूप रडले मला कळत होत जे काहि चालल आहे ते ठिक नाहि पण माझी काहि बोलायची हिंमतच झाली नाहि.
अनिकेत रडायला लागला आणि माझी तंद्री तुटली. मी त्याला जवळ घेतल खूप लाडानं कुरवाळले. त्याच्याकडे बघुन मला खूप अपराध्यासारखं वाटत होतं. कुठेतरी आपणच त्याला त्याच्या वडिलांच्या मायेपासून वंचित करत आहोत असं वाटत होतं. मला खूप रडु आलं. मग मनात विचार आला एक बाप म्हणुन विशालची तर किती वाईट अवस्था असेल मुलगा आहे पण... कसा रहात असेल त्याला पण तर अनिकेतशी बोलायची भेटायची इच्छा होत असेल मग तो काय करत असेल. मी तर अनिकेतला सोडून एक सेकंद पण नाहि राहु शकत तिथे हा माणूस एक वर्ष अंतर ठेवुन आहे. नाहि मलाच आता काहि तरी केले पाहिजे. मलाच माझं मन खंबीर केलं पाहिजे. मान्य आहे विशाल खूपच तापट आहे पण वाईट नाहि. त्याच्या कृतीतून हे नेहमीच जाणवत कि त्याच माझ्यावर खूप प्रेम आहे. पण हे मात्र नक्की जर विशालकडे परत जायच असेल तर मला त्याच्या तापट स्व भावाकडे पूर्ण दुर्लक्ष केले पाहिजे. त्याची कुठलिहि गोष्ट अजिबात मनाला लावुन नाहि घ्यायची. आधी थोड जड जाईल पण होईल हळूहळू सवय. मी थोडि स्वतःशीच खजील झाले कि जर हा विचार मी आधीच केला असता तर... चार वर्ष त्याच्याबरोबर संसार करुनहि मी हि बाब समजु शकले नव्हते. पण त्यावेळची परिस्थितीच वेगळी होती. मी मनाचा ठाम निश्चय करुन फोन हातात उचलला, त्याचा नंबर लावला आणि फोन अनिकेत समोर ठेवला तसं अनिकेतनी तो उचलला आणि स्वतःच्या कानाला लावला. पुढे बराच वेळ तो वेगवेगळे आवाज काढत हसतं होता जणू त्याला कळल होत कि समोर त्याचा बापच बोलत आहे. मला खूप बर वाटल. मग थोड्यावेळानं जसा अनिकेत रडायला लागला तसं मी फोनवर काहिच न बोलता फोन डिस्कनेक्ट केला आणि विशालला थॅंक्यू एस एम एस पाठवला अनिकेतच्या नावानं. त्यावर विशालचा प्रत्युत्तरार्थ एस एम एस आला "I am eager to welcome you at our home. will you?" मी क्षणाचाही विलंब न करता त्याला रीप्लाय केला "Yes". मग त्याच सुद्धा प्रत्युत्तर आलं "See you soon... Love you...". मी खूप खूष झाले आणि मनाचा निर्धार कायम केला. आता विशाल आला कि मी कोणाचहि पर्वा नाहि करणार, मी बोलणार, मी त्याच्या बरोबर घरी जाणार माझ्या घरी, माझ्या अनिकेतच्या घरी...

***

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
प्रतिक्रिया नोंदवा