कणिकेचा केक

सुट्टी असली म्हणजे हल्ली माझ्याकडे एक काम fixed असतं आणि ते म्हणजे माझ्या मुलीच बेबी सीटिंग. आणि ह्यातुन वेळ मिळाला कि दुसरं काम, किचनमध्ये लुड्बुड. पहिल्या मोहिमेवर माझी बायको बेहद खूष असते पण दुसरी गोष्ट म्हणजे तिच्या कपाळावर आठ्या असतात. किचनमध्ये जबरदस्तीने घुसून नवीन नवीन प्रयोग करायचे हा शनिवार दुपारचा कार्यक्रम. आता ह्या नवीन प्रयोगात चिकनचे प्रकार, अंड्याचे प्रकार, आणि केक हिटलिस्टवर आसतात.

परवा कुठेतरी ऐकलं कि कणिकेचापण केक करतात, आजपर्यंत मी नेहमी मैद्याचा केक ट्राय केलाय तेव्हा कणिकेचा केक माझ्याकरता जरा नवीनच होता. झालं माझ्या डोक्यात भूत शिरल कणिकेचा केक करायचाच. माझी हि कल्पना मी बायकोल सांगीतली तर तिला घामच फुटला. तिन सरळ डिक्लेर केल कणिक संपवलीसतर गहू निवडण्यापासून पुढची कणिक तुला करायला लागेल. मी हो म्हटल (हो म्हणायला काय जातय). मग शनिवारी दुपारी मुलीला जबरदस्तीने झोपवुन (मी घरी असलो कि तिला तसच झोपवाव लागत) मी गुगलच्या महाजालात घुसलो, टाईप केल "wheat flour cake" आणि गुगलनी हि लांबसडक लिस्ट पाठवली. त्यातल्या जरा बर्‍या वाटणार्‍या रेसिपीस कलेक्ट केल्या आणि एक फायनल कंन्सोलोडेटेड रेसिपी मनात तयार केली (What a confidence), चला रेसिपी तर मिळाली आता कामाला लागुया.
बायकोला मस्का मारुन असिस्टंट बनवलं, तिन पण फक्त सामान कुठे आहे ते सांगेन ह्या कबुलीवर असीस्टंटशीप स्वीकारली. कणिक, नॉन सॉल्टेड व्हाईट बटर, पिठिसाखर, खायचा सोडा, बेकींग पावडर, अंडी, आणि इसेंन्स माझी सामानाची लिस्ट मी तिच्यासमोर ठेवली. तिन लगेच उत्तर दिल, नॉन सॉल्टेड व्हाईट बटर, खायचा सोडा, आणि अंडी घरात नाहित पाहिजे तर मार्केट्मधुन आण. उरलेल सामान काढुन ती झोपायला निघुन गेली. आली का पंचाईत, ह्या तीन गोष्टिंशिवाय केक कसा बनणार, आणि बाहेर जाउन विकत आणण्याएवढा वेळ नव्हता. ठिक आहे रेसिपीला थोडि मॉडिफाय करू पण मी कणिकेचा केक आज करणारच.

फुड्प्रोसेसरच्या भांड्यात पीठिसाखर घेऊन छान फिरवुन घेतली. त्यात साजुक तूप टाकल (नॉन सॉल्टेड व्हाईट बटरची रीप्लेसमेंट) आणि परत छान फिरवुन घेतल. सोडा नाहि काय करावच? डोक खाजवत जरा इकडे तिकडे पाहिलं तर ENO ची बाटली दिसली स्वताशीच हासत म्हंटल चला मिळाला सोडा. मिश्रणात थोडा ENO सोडा, इसेंन्स, आणि बेकिंग पावडर टाकली आणि परत मिक्सरमधुन फिरवुन घेतल. आता त्यात कणिक टाकली आणि मिक्सर परत चालु केला तो थोडासा फिरला आणि बंद पडला, बापरे बिघडला कि काय, भांड्याच्या काचेतुन आतमध्ये पाहिल तर आतल मिश्रण खूप घट्ट होऊन बसल होतं. आता काय करायच? परत गुगलकडे धाव घेतली तीनचार रेसिपी पाहिल्यावर कळल कि केकमध्ये दूध पण टाकतात. किचनमध्ये आलो आणि चांगल कपभर दूध त्यात ऒतल आणि थोडं चमच्यानी हलवल, मग मिक्सर चालु केला. पण तरी आजुन मिश्रण घट्टच वाटत होत, विचार केला ह्यात थोडा फ्लेवर ऍड करु, म्हणुन त्यात थोडा स्ट्रॉबेरी क्रश टाकला. पुन्हा चमच्यानी हालवून मिक्सर चालु केला, आता आतल मिश्रण चांगलच फिरायला लागल होत आणि मिश्रणाला छान गुलाबी रंगपण आला होता. मी अस वाचल होत, कणिकेचा केक करताना मिश्रण जेवढ फिरवाल तेवढा केक सॉफ्ट होतो. मी तब्बल पाच मिनिटे नॉनस्टॉप मिक्सर फिरवला, जेव्हा मिक्सरमधुन धूर येऊ लागला आणि काहितरी जळल्याचा वास आला तेव्हा तो बंद केला. मी ते मिक्सरच भांड उतरवल आणि मस्त साजुक तुपाने ग्रीस केलेल्या एका टिनच्या भांड्यात काढल. मिश्रण थोड पातळ वाटत होत पण ठिक आहे. ते भांड मी मायक्रोवेव्हमध्ये २३० डी वर तीस मिनिटाकरता सेट केल. पण वीस मिनिटातच मायक्रोवेव्हमधून थोडा जळण्याचा वास येऊ लागला, काचेतुन पाहिल तर केक फुगला तर नव्हताच पण वरुन मात्र काळा पडला होता. झटपट मायक्रोवेव्ह बंद केला आंणि आतलं भांड बाहेर काढल. मग एका ट्रेमध्ये ते भांड उलटं केल तसा तो सो कॉल्ड केक भांड्यातुन बाहेर आला. सूरीन त्याचा एक पिस कापला तर वरुन कडक असलेला हा केक आतुन मात्र लिबलिबीत होता. मग तो पिस थोडा खाऊन पाहिला तर केक तर व्यवस्थित शिजला होता. मग गडबड कुठे झाली असावी? पण काहिहि असो ह्याला केक नाहि म्हणता येणार.तरी जे काहि होत ते टेस्टी होत.

थोड्यावेळाने आत झोपलेल्या मायलेकि किचनमध्ये आल्या, समोर ट्रेमध्ये ठेवलेल्या पदार्थाकडे पहात बायको म्हणाली अरे तु तर केक करणार होतास ना? कणिकेचा? अणि ती हासायला लगली. मी काहिच न बोलता मख्खपणे तिच्याकडे पहात उभा होतो. मग तिन त्या केकचा एक पिस उचलला आणि छोटासा तुकडा तोंडात टाकला (हा तिचा सगळ्यात चांगला गुण, ती मी केलेला प्रत्येक पदार्थ न घाबरता टेस्ट करते.). मी आणि तिच्या कडेवर असलेली आमची लेक तिचे फेशियल एक्स्प्रेशन्स न्याहाळत होतो. काहिहि एक्स्प्रेशन्स न देता तिन सगळा पीस संपवला. मग म्हणली नॉट बॅड, छान आहे पण ह्याला केक म्हणायच? आणि आम्हि दोघ जोर जोरात हसू लागलो.

परवाच मी एक नविन पदार्थ वाचला "कुळिथाच्या पिठाचा केक" Let's try on this Saturday!!!

1 टिप्पणी:

प्रतिक्रिया नोंदवा