असच काहितरी

मला माहित नाहि हे ब्लॉग वगैरे कसा लिहितात. मला फक्त एवढे माहित आहे की आपण आपल्या मनातलॆ विचार मुक्तपणे विखुरयाचे अणि झाला तुमचा ब्लॉग तयार आहे न सोप? तसा हा मझा पहिलाच प्रयत्न. मी आधि लिहिल वगैरे नव्हत कधि, हो पण शाळेत निबंध लेखन हा जो काहि प्रकार होता त्या वेळेस जे लिहीण व्हायच तेवढच. पण तो प्रकार खुप बोरींग वाटायचा. एखादा विषय दिलेला असायचा आणि आपण त्याच्यावर अपले विचार मांडायचे. वीस ओळींचा निबंध लिहा म्हटले कि कधि त्या वीस ओळी संपतात अस व्हायचं. पण आता ते सगळ आठवल की खूप मजा वाटते. आजकाल लिहिण्याशी सबंध फक्त ऑफीशियल ईमेल लिहिण्या पुरताच येतो, एवढच कशाला हातानि लिहायला गेलो तर मराठी अक्षर सुद्धा सुचत नाहि.

पण मला हे ब्लॉग लिहायच Inspiration माझ्या एका कलिग कडुन मिळाल. जेव्हा त्याने मला त्याचा ब्लॉग दाखवला मला वाटल आपण पण आसच काहि तरी लिहाव. मी धावतच माझ्या पीसी कडे आलो, ब्रावजर ओपन केला आणि ब्लॉगर च्या साइट वर आले. फटाफट रेजिस्ट्रेशन केल आणि मोठ्या उत्साहानी लिहायला घेतल. पुढचा प्रश्न काय लिहायच? विचार सुरु झाला! तशिच पाच ते दहा मिनिटे गेलि, काय लिहायच ते आजिबात सुचेना. मग उत्साह पण कमी व्हायला लागला, रोजच्या पेंडीग कामाची आठवण झाली and then back to work. दुसया दिवशी लंच नंतर खुप झोप येत होति (as usual) आणि एकदम आठवल की ब्लॉग लिहायचा, परत तो उत्साह संचारला झोप विसरलो अणि लगेच ब्लॉगर वर लॉगिन केल. मनाशी ठाम ठरवल की आज मी काहि तरी लिहिणारच. पण काय? काहिच विषय सुचेना तेव्हा मला ह्य़ा लेखक मंड्ळींच खरच खुप अप्रुप वाटल कस सुचत ह्य़ाना कुणास ठाउक. पंधरा ते वीस मिनिट स्क्रिन कडे नुसताच पहात राहिलो आणि मग परत back to work. पुढचे दोन दिवस कामात प्रचंड बिझि होतो, so no blogging.

आज फ्रायडे लास्ट डे ऑफ दि वीक, लंच नंतर ठरवल की अर्धा तास कम्पल्सरी काढायचाच आणि काहि तरी लिहायच. विचार केला आता उगाच विषयाच्या मगे वेळ नाही घालवायचा जे मनात आहे ते टाईप करत सुटायचे. पण ह्य़ा प्रोसेस मध्ये एक गोष्ट कळली की लिहिण्या करीता विषय महत्वाचा नाहि तर मनात विचार असण जास्त जरुरी आसत. एकदा का विचार मांडायला लगलो कि विषय आपोआपच तयार होतो.

५ टिप्पण्या:

 1. आपल्याला खूप छान समजले आहे की ब्लॉग कसा लिहितात. कारण आपले लिखाण फ़ार सुंदर आहे. आपल्याला माझ्याकडून (ब्लॉगिंगसाठी) अनेक शुभेच्छा.

  उत्तर द्याहटवा
 2. I was really shocked to see you writing such blog..You are so good with words..i am zapped...but then they say..people with good heart always have good words to say...keep writing

  उत्तर द्याहटवा
 3. Hi Kedar
  I am seeing you in new form. I was not too sure if you have turned down to writing or its a impact of mumbai blast and tortured life in India... But this is a good start to express your thought..If you are not talking to any one during regular days, this is the best way to release the tention..

  Keep up the good work -:)

  Regards
  Subodh

  उत्तर द्याहटवा

प्रतिक्रिया नोंदवा