लोकल

आज ऑफिसला जरा लवकर पोहचायच होत म्हणुन भल्या पहाटे ७.०० वाजताच उठलॊ, फटाफ़ट आवरल, घाइतच घरातुन बाहेर पडलो! म्हंटल ८.१२ ची फास्ट पकडु. Thank god रिक्षा पण पटकन मिळाली, नेहेमीप्रमाणे रिक्षावाल्याशी सुट्या पैशांवरुन भांडण करुन स्टेशन कडे धावलो. भरभर ब्रीज चढला आणि समोरच दॄष्य पाहुन मी तिथेच थबकलो. सगळे प्लॅटफॉर्म लोकांनी तुडूंब भरलेले. आता हे काय नवीन? गर्दीतुन वाट काढत कसंतरी चार नंबर वर उतरलो. तोंडानी "Sorry" चा जप सुरू करुन माझ्या रोजच्या डब्याच्या जागी सरकायला लागलो. कसतरी तिथंपर्यंत पोहोचलो तर रोजचा ओळखीचा आवाज आला (अनांऊसमेंट्चा)"सिग्नल यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे सर्व लोकल गाड्यांची वाहतुक पुढील सुचना मिळेपर्यत रद्द करण्यात आली आहे. आपल्याला होत असलेल्या गॆरसोयीबद्दल आम्हि दीलगिर आहोत. धन्यवाद!!!" संपलो आता. तसाच तिथं उभा राहिलो, बरेच लोक आपापल्या मोबाइलला चिकटले होते. आजुबाजुला लोकांच्या एकदम मिक्सडं रीऍक्शन्स होत्या, कोणी चरफडत रेल्वेला शिव्या देत होता (माझ्यासारखा) तर कोणी ‌खुष होत की चला ऑफ़ीसला दांडी मारायला रिझन मिळाल. मी जीवाचा संताप करत तसाच उभा राहिलो, मनात असंख्य विचार चालु होते ’हे आजच व्हायच होतं? आता काय करु? कोणाला फोन करु? आजचा दिवसच बेकार, सकाळी उठुन कोणाचं तोंड पाहिल काय माहित (माझेच हात पाहिले होते)?’. आशातच आजुबाजुचा तो कलकलाट आजुनच त्रासदायक वाटत होता. बराच वेळ गेला मी तसाच उभा राहिलो, जरा इकडे तिकडे नजर फिरवली कि कोणी ऑफ़ीस मधलं ओळखिच भेटत का?

हे अशे प्रसंग म्हणजे मुंबईकरांसाठी एखाद्या गेट्टुगेदर सारखे असतात. त्या प्रचंड गर्दीतुन सुद्धा काहि लोक मस्त फिरत असतात. खुप जुने चेहेरे अचानक समोरा समोर येतात, एकमेकांची चोकशी होते, "so how are u? आजकाल काय करतो आहेस? कुठल्या कंपनीत आहेस? काय जॉब करतो?" सारख्या प्रश्नांपासुन ते आगदी "लग्न झालं का? किती मुलं वगैरे.वगैरे..वगैरे...". अशावेळि महिला वर्ग सुध्दा आपल्या टिपिकल लेडिज स्पेशल गॉसिप करत असतात. साडी, घरं, एखादि रेसिपी, ते अगदि आजचा डब्बा बनवताना तिने कशे कष्ट घेतले... एक मात्र नक्की काही लोक हा अचानक झालेला गेटटूगेदर मस्त एंजॊय करत असतात. अशावेळी प्लॅटफ़ॉर्म वरचे टपरीवाले जाम खुश असतात मस्त बीझीनेस जो होतो. "चल यार एक कटिंग मारते है." करत चहाच्या टपरीवर गर्दी व्हायला लागते. चहाच्या त्या एक एक सीप बरोबर जुन्या आठवणींना उधाण येत, मग पिकनीक चे प्लान ठरतात, एखादि saturday night पार्टि ठरते, पिक्चर, ते अगदि एखाद्याचा जॉब इंटरव्यू पण ऍरेंज होतो.

बरेच लोक शेवटी कंटाळून आपल्या घराची वाट धरत होते. "आरे आज ट्रेन नही है चल मॉर्निंग शो जाते है" करत काहि लोक रस्त्यातुनच परत जात होते. काहि लोक ऑफिस ला जाण्याचा अल्टरनेटीव शोधण्यात बीझी होते तर काहि ही परीस्थिती ऒफ़िस मध्ये फ़ोन करुन explain करत होते. आशातच माझा फ़ोन वाजला, फ़ोन उचलला तर समोरुन माझा कलिग
"अरे तु कुठे आहेस?"
"स्टेशन. तु?"
"मी घरीच आहे. आरे लोकल आजुन सुरु नाहि झाल्या ना?"
"नाही यार. आता मला इथे येउन पण पाउण तास झाला."
"आरे प्लीझ ट्रेन सुरु झाल्या की मला एक मिस्ड कॊल दे ना"
"ठिक आहे"
"थॅक्स यार"
मी परत वाट पहात उभा राहिलो.
परत अनांउसमेंट झाली कि गाड्यांची वाह्तूक पुन्हा सुरु झाली आहे आणि एक गाडि लवकरच चार नंबर वर येत आहे. मग काय परत गोंधळ सुरु झाला, सगळे जण परत attention मध्ये आले. एक मोठा हॊर्न मारत एक लोकल प्लॅटफॉर्म मध्ये शिरली. गाडीला ऑलरेडि खुप गर्दी होती, पण त्यात सुध्दा लोकांनी धावा बोलला. हार्डली दोन सेकंद आणि ती लोकल इतकि पॅक झाली की मुंगीला पण आतमध्ये जागा मिळ्णार नाहि. लोक अक्षरशाः दारात, खिडकित, आणि टपावर लटकत होते. बापरे!!! मी काहि त्या गाडीत चढण्याच डेरींग केल नाहि. अशा मी जवळ जवळ पाच ते सहा लोकल सोडल्या, जेव्हा थोडि गर्दी आटोक्यात आहे अस वाटल तेव्हा मी थोडा पुढे सरकलो. अजुन एक गाडि हॊर्न वाजवत प्लॅटफॉर्म मध्ये शिरली, आता मी स्वताःला मॉब बरोबर गाडीच्या दिशेने झोकुन दिलं आणि क्षणार्धात मी आतमध्ये पोचलो. .. हुश्शश सुटलो. सर्व अवयव ठिकाणावर आहेत ना तपासुन पहायचा प्रयत्न केला... पण नो चान्स मी इतका पॅक झालो होतो की बोट हलवायला पण जागा नव्हती (वेगळं सांगायला नकॊ की मी सो कॊल्ड First Class मध्ये होतो.). मी तसाच उभा राहीलो, नेहमी प्रमाणे "तुने मेरे को धक्का क्योन मारा" पासुन ते "गाडी क्या तेरे बाप कि है क्या" पर्यंत भांडणाचे आवाज कानावर पडत होते. मला नेहमी एका गोष्टिच आश्चर्य वाटतं कि संकटात सगळ्य़ा जगाला एकता दाखवणारे आम्ही मुंबईकर गर्दीत चुकुन धक्का लागला म्हणुन महाभारत करायला पण मागेपुढे पहात नाहि, आहे कि नहि गंमत. दरवाजावर लोंबकळणारी माणसं आतमध्ये लोकांना शिव्या देत सर्व शक्तिनिशी रेटत होते. मी व्हिडिओ कोच (लोकलच्या एका डब्यात लेडिज फ़र्स्टक्लास आणि जेंन्ट्स फ़र्स्टक्लास एका पार्टीशन ने वेगळे केलेले असतात आणि एक खिडकि त्या पार्टीशन आसते so it is called as व्हिडिओ कोच) मध्ये असल्यामुळे कोकिळांचा सुर पण त्या गोंधळात मिक्स झाला होता. मार्च असल्यामुळे उकाडा पण खुप जाणवत होता, घामाच्या धारा वहात होत्या, त्यात वरचे काहि पंखे चालु नव्हते तर काहि पंखे चालु आहेत ह्या विषयावर एखाद्याचा मस्त रीसर्च होऊ शकेन. जे पंखे बंद होते त्यांना खिशातला कंगवा काढुन हलवुन पहाण्याचा प्रयत्न पण झाला but बॅड लक. मनात विचार आला नरक म्हणजे ह्याच्यापेक्षा काय वेगळा आसेन. जसं जसं स्टेशन्स जायला लागली तसा मी आतमध्ये सरकायला लागलो. आत मध्ये गर्दित सुद्धा दोन सीट च्या मध्ये पत्यांचा गेम चालु होता (लोकलच्या भाषेत ह्याला नॅशनल गेम म्हणतात.). गाडि आता मस्त चालली होती, आणि मी सुद्धा comfortable उभा होतो. ह्या सगळ्या गडबड गोंधळात दादर कधी आले कळलं पण नाही. उतरण्यासाठी "दादर उतरना है क्या" विचारत मी माझे दरवाजा पर्यंतचे मार्गक्रमण सुरु केले. सगळ्यांबरोबर मी धडपडत स्टेशन वर उतरलो. चला एक टप्पा संपला असा विचार करत मी ब्रीज चढणाऱ्या त्या लोकांच्या प्रवाहात मी हि समिल झालो दिवसाच्या पुढच्या चॅलेंज ला सामोरं जायला...

५ टिप्पण्या:

  1. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. I cant believe that u have written this ..........!!!!!!

    I think its very hard to write "Simple"....and u can do this very easily....

    Great...!

    उत्तर द्याहटवा
  3. धन्यवाद केदार..
    एवढ्या भाऊगर्दीतून ब्लॉगला भेट देऊन प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल..

    उत्तर द्याहटवा
  4. Hey KJ,

    It is simple and nice!
    I think you can write well,keep it up!

    Ekhada lekh de na marathi papermadhe.. :)
    Sanjna

    उत्तर द्याहटवा

प्रतिक्रिया नोंदवा