आपल्याला एका गोष्टिच नेहमीच आकर्षण आसतं आणि ते म्हणजे ’विंडो सीट’. आपण ’ट्रेन’ असो किंवा ’बस’, ’विंडो सीट’ करता नेहमीच धडपडत असतो. अगदी reservation करताना सुद्धा आपण बुकिंग क्लार्कला आवर्जुन् ’विंडो सीट’ची मागणी करतो. परवा माझ्या मामे भावाच्या लग्नाच्या निमित्ताने नागपुर ला जाण्याचा योग आला. लग्नं नागपुरला असल्यामुळे आम्ही सगळे Volvo बसनी निघालो. बस मध्ये सगळ आमचचं पब्लिक असल्यामुळे ’विंडो सीट’ पटकन मिळाली. वा.. काय सुख, मस्त खिडकितुन बाहेर बघत प्रवास सुरु ज़ाला. समोर टिव्ही वर कुठला तरी पिक्चर लागला होता but I was not interested. मी मस्त बाहेरची मजा बघत होतो.
मला अठवतंय लहान असताना माझी आणि माझ्या भावाची ह्या ’विंडो सीट’ वरुन नेहमीच जुंपायची, मी त्याच्यापेक्षा लहान म्हणुन त्याग हा त्यालाच करायला लागयचा. त्यावेळी हे आतासारखे सीट चॉईस पण मिळायचे नाहित. मग आम्ही वेळ ठरवायचो कि एक तास तु एक तास मी, खुप मजा यायची. आपण एका जागी बसलो आहोत आणि बाहेरच जग मागे मागे पळत आहे, त्यावेळी हि कल्पना पण मजेदार वाटायची. आणि एखाद वेळी जर हि ’विंडो सीट’ नाही मिळाली then mood off. लोकल मध्ये चढलो कि सुद्धा खिडकित जाउन उभं रहायच आणि बाहेरच्या त्या धावणाऱ्या जगाची मजा बघायची. पण आजकालच्या लहान मुलांना खिडकिच फारस आकर्षण दिसत नाही, ते आपले mobile वर गेम खेळण्यात बीझी असतात.
आम्हा मुंबईकरांना तर हि ’विंडो सीट’ म्हणजे जीव की प्राण. सतत घामनी डबलेल्या मुंबईकरांना लोकल मध्ये ’विंडो सीट’ करता काय माकड उड्या मारायला लागतात ते आम्हालाच माहीत. लोकल प्लॅट्फॉर्म मध्ये शिरली की लोक अक्षरशः तुटुन पडतात ते हि ’विंडो सीट’ मिळवण्यासठी. मग त्याच्याबरोबर येणारी ती भांडण, वाद विवाद रोजचेच.
जर तुम्ही विमानानी प्रवास करत आसाल तर हि ’विंडो सीट’ म्हणजे वरदानच. जेव्हा हे विमान टेक ऑफ घेत तेव्हा जे दृष्य खिडकितुन दिसत ते अगदी अप्रतिम असतं. आपण क्षणात जमिनीच्या वर आसत्तो, मग उंचावरुन दिसणार ते जमिनीवरचं जीवन खुप मनोवेधक असत आगदि आपण पक्षी झाल्यासारख वाटत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
प्रतिक्रिया नोंदवा