कालचा दिवस

आज दोन दिवस आपल्या मुंबई आणि संपुर्ण देशात जे ’राज’कारण सुरु आहे ते खरच खुप खंत करण्यासारखे आहे. काल दिवसभर एखाद्या मधमाशीसारखी बीझी असलेलि मुंबई शांत होती, दुकानं, बसं, रीक्षा, टॅक्सी पूर्णपणे बंद होत्या. सगळीकडे एकच चर्चा चालु होती, "राज" ठाकरे यांना अटक.. बस.. TV चे प्रत्येक chennel आम्हि ह्या इव्हेंट चा फ़ुटेज किती तत्परतेने दाखवतॊ ह्याच चढाओढित होते. पण ह्या सगळ्या गोंधळात सामान्य माणसाचा किती लोकांनी विचार केला.. त्याचे किती हाल झाले असतील हे दाखवण्याचा साधा प्रयत्नहि कोणी करत नव्हत. ह्या सगळ्या पॉलीटिक्स मध्ये भरडला जातो चिरडला जातो तो सामान्य माणुस. हे अटक सत्र नेमक कामाच्या दिवशीच झालं, किती तरी लोकं आपल्या रोजच्या कामानिमित्त घराबाहेर पडली होती, त्यात वृध्द, स्त्रीया, लहान मुले, गरोदर स्त्रीया हे सगळे होते. अचानक झालेल्या ह्या बंद मुळे त्यांच्या जीवाचे नुसते हाल झाले, आपल्या डेस्टिनेशनला पोहोचण्याकरता भरपूर पायपीट करावी लागत होती. पण हे सगळं लाल दिव्याच्या एसी गाडितुन फिरणाऱ्या पॉलीटिशीयन्सना थोडिच कळणार. ह्या पॉलीटिशीयन्सना अद्ययावत सुरक्षा व्यवस्था आसते, पण सामान्य माणसाला कोण आसतो. सामान्य माणुस हा सामान्य आसतो तो मराठी किवा कोणीहि असु शकतो.. जो सकाळी उठल्या पासुन रात्री झोपेपर्यंत आपल्या कामात बुडालेला आसतो.. आपल्या उराशी काहि स्वप्न ठेवुन ती पूर्ण करण्यासाठी धडपडत आसतो.. त्याच्या ह्या स्वप्नपुर्तीसाठि किती पॉलीटिशीयन्स प्रयत्न करतात...

खर म्हणजे कालचा दिवस आपल्या देशाला एका वेगळ्या कारणानी खूप महत्वाचा होता. काल आपण काहि तासातच आपल पहिलं मानव रहित चंद्रयान आकाशात सोडणार होतो. हि आपल्या देशाची फार मोठि अचीव्हमेंट आहे.. हे आपल्या पैकी किती लोकांना माहित आहे. बुधवारी सकाळी ६.२२ मि. PSLV-C11 हे भारताचं पहिल मानव विरहित यान चंद्रयान-१ घेउन ISRO च्या सतीश धवन स्पेस सेंटर मधुन आकाशात निघाल. सुमारे ४४.४ मीटर लांब असलेल PSLV-C11 यान मोठ्या दिमाखात आकाशाच्या दिशेने झेपावल. ह्या चंद्रयान-१ मध्ये एकूण ११ पेलोड्स आहेत, त्यातिल ५ आपण आपल्या देशात डिसाइन आणि डेव्हलप केले आहेत. बाकिचे ३ युरोप, १ बल्गेरीया, आणि २ अमेरीकेकडुन घेतले आहेत. ह्या मिशनचा मुख्य उद्देश चंद्राच संशोधन करण हा आहे.

बघा इतकि मोठि बातमी ज्यावर आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे, आपल्या मिडियानी सोयीस्करपणे साइड ट्रॅक क्ली आणि नकॊ त्या बातमीला महत्व देउन मोठि पब्लिसीटि कॅश केली. जर एखादा पॉलीटिशीयन भडकाउ भाषणाकरता गुन्हेगार असु शकतो तर हे मिडियावाले सुद्धा लोकांना भडकवण्याच्या बातम्या देउन तितकेच गुन्हेगार ठरतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिक्रिया नोंदवा