आज खुप दिवसांनी कहि तरी लिहाव अस वाटलं, आणि लगेच सुरुवात केली. नवीन वर्षाचा संकल्पच म्हणा ना कि महिन्यातुन एकदा तरी काहितरी लिहायचच. खर म्हणजे मध्ये काहि दिवस कहि लिहाय अशी इच्छाच होत नव्हती. कदाचित आपल्या आजुबाजुला जे काहि विचित्र घडत होत ते एक कारण असेन आणि मी सुध्दा माझ्या कामात जरा जास्तच बीझी होतो.
पण नोव्हेंबर मध्ये मुंबईत जे काहि घ्डल त्यामुळे मन खुपच विषण्ण झाल, आपल्या देशात येउन कोणीतरी आपल्यावर हल्ला करत, हि वस्तूस्थिती स्वीकारायला मन तयार होत नव्हत. सगळा डिसेंबर हा मुंबई हल्यावरील वाद, विवाद आणि चर्चा यातच गेला. तेच आता जानेवारीत कंटिन्यू होत आहे. पण खरच ह्या देशात आपण किती सुरक्षित आहोत? हि एक विचार करण्यासारखी बाब झाली आहे. असं काही झाल कि आपले नेते मंडळि बोलु लागतात कि ह्या दहशदवादाशी आपण साऱ्यानी मिळुन मुकाबला केला पाहिजे, आपण एक्जुट दाखवली पाहिजे वगैरे... वगैरे... पण खरच आपल्याला एक्जुट करायला हे नेते लोक काय प्रयत्न करतात ह्याचा कोणी कधी विचार केला आहे का? पुष्कळ वेळा हेच दिसतं कि हे लोक स्वताच्या फायद्याकरता जी थोडिफार एकि आहे ती तोडायचाच प्रयत्न करत असतात.
अमेरीकेतल्या World Trade Center वर २००१ साली भयंकर मोठा अतिरेकि हल्ला झाला. प्रचंड जीवित आणि वित्त हानी झाली, पण त्या नंतर तेथे एवढा मोठा तर सोडाच पण एखादा छोटा हल्ला झाल्याचे सुध्दा ऐकिवत नाहि. तेच आपल्या येथे दर चार ते पाच महिन्यांनी असे हल्ले होतच असतात. अहो मुंबई च्या लोकांची तर अशी मेंट्यालीटि झाली आहे कि एखादा हल्ला हौऊन गेला कि ते सुटकेचा निश्वास सोडतात कि चला आता पुढचे चार एक महिने तरी काहि धोका नाहि. हे अस कुठवर चालणार? ह्याला काहिच अंत नाहि का? ह्या अतिरेक्यांवर अंकुश कोण ठेवणार? असे अनेक प्रश्न आपल्या मनात घेउन आपण फिरत असतो. रोज सकाळि जेव्हा आपण घरातुन ओफिस ला जायला निघतो तेव्हा मनात एक विचित्र अशी अनामिक भीती असते, आणि रात्री घरी परतल्यावर चला आजचा दिवस तर गेला ह्या विचारांनी आपण झोपी जातो. मला माहित नाहि यावर उपाय काय पण एवढ मात्र नक्कि हे कुठ तरी थांबलच पाहिजे....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
प्रतिक्रिया नोंदवा