होळी

आज सकाळि ऑफिस ला येताना रस्त्याच्या कडेला कचर्यात एक अर्धवट जळलेला झाडाचा बुंधा पहिला आणि खूप वाईट वाटलं. आयुष्यभर फक्त दुसर्याला काहितरी देणार अस हे झाड आज अस अगतीक होऊन अर्धवट मेलेल्या अवस्थेत कचर्याच्या ढिगार्यात पडलं होत. काय वाटत असेन त्या झाडाला, किती वेदना होत असतील त्याला. शारिरिक वेदनांपेक्षा मानसिक वेदनाच जास्त होत असतील त्याला. एके काळी बहारदार आयुष्य जगलेला, असा हा अपला खरा मित्र ज्याची आपणच अशी अवस्था करुन टाकली होती.

अगदि फार पूर्वी पासून आपल्या इथे होळी पेटवली जाते. होळी म्हणजे समाजातील वाईट घटकांचा केलेला अंत, त्यांना त्या होळीत जाळुन टाकुन वाईटावर विजय मिळवण्यासारख आहे. पूर्वापार होळीकरता जी लाकड जाळली जायची ती जंगलातुन आणली जात. सुकलेली किंवा झाडांपासून अलग झालेली लाकड वापरली जायची. त्यात खूपसारे सुकलेले गवत हि असे. होळीची अख्याईका अशी आहे कि, हिरण्यकश्यपूची बहिण होलीका जिला देवांनी वरदान दिल होत कि तिला अग्नी पासून काहि धोका नाहि, पण तिनं ह्या वरदानाचा उपयोग भक्त प्रल्हादाला मारण्यासाठि केला आणि ती त्या अग्नीत दहन झाली. आपण त्या घटनेचे प्रतिक म्हणुन होळी वर्षानु वर्ष साजरी करतो. जेणे करुन आपण आपल्यातील वाइट तत्वांचा त्या होळीत जाळुन नाश करु.

पण आजकाल ह्या होळीच स्वरुप अगदि बदलुन गेल आहे. होळीत जाळण्याकरता आपण चांगल्या डवरलेल्या झाडांचा बळी देतो. अहो होळीच्या आदल्या दिवशीचीच गोष्ट, एक माणूस आमच्याकडे आला, का तर होळीची वर्गणी मागायला. त्यानं त्याच्याजवळ असलेल वर्गणी कलेक्शनच रजीस्टर दाखवल आणि आकडे पाहुन थक्क झलो. अहो लोकांनी अगदि पाचशे रुपयेपर्यंत वर्गणी दिली होती. आता त्या रजिस्टरमधले आकडे किती खरे होते ते त्या माणसालाच ठाऊक. त्या दिवशी पेपरात वाचल वरळीला म्हणे सगळ्यात मोठी म्हणजे १५ फुटांपेक्षा जास्त मोठी होळी रचलि होती. वाचून जीव हळहळला कि ह्या अणि अशा असंख्य होळ्यांमध्ये किती जीवंत झाडं आपली आहुती देणार. अशा अनेक होळ्या शहराच्या प्रत्येक गल्ली, रस्ते, बिल्डिंग... ई. ठिकाणी होत असतात. विचार करा आपण एकाच दिवसात किती झाडांची कत्तल करतो आणि ह्या तोडलेल्या झाडांच्याजागी नवीन झाड पण कोणी लावत नाहित. बर ह्या सगळ्यामध्ये किती प्रदुशण होत ह्याचा विचार तर कधी होतच नाहि.

ह्यावर एक उपाय असा मनात येतो कि, प्रत्येकानी आपल्या गल्लीत किंवा अंगणात अशी स्वतंत्र होळी करण्यापेक्षा एका समुहिक ठिकाणी एकत्र जमून एकच होळि पेटवली तर.. अशानं आपण कितीतरी झाड वाचवु शकु आणि मोठ्या प्रमणावर होणार प्रदुशण पण थांबवु शकु. जस हल्ली अनेक गावांतुन एक गाव एक गणपती हि पध्द्त सुरु झाली आहे तशी होळिच्या बबतीत पण एक शहर एक होळी हे पध्दत चालु केली पाहिजे. प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जे झाड आपल्याला फक्त काहिनाकाहि देतच असत अशा चांगल्या घटकाची होळी होता कामा नये. होळी हि वाईट विचारांची झाली पाहिजे, समाजातील वाईट प्रर्वुत्तिंची झाली पाहिजे. आणि जेव्हा असे घडेल तेव्हा तीच खरी होळी असेन.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिक्रिया नोंदवा